11/02/2020
बदलापुरात तरुणीचा लोकलसमोर आत्महत्येचा प्रयत्न
मोटरमनने प्रसंगावधान राखत वाचवले तरुणीचे प्राण
बदलापूर: तरुणीने लोकलसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बदलापूर रेल्वे स्थानकात घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बदलापूर रेल्वे स्थानकात बदलापूर लोकल शिरत असताना अचानक रक मुलगी ट्रॅकवर आली. यावेळी मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक मारले, मात्र तरुणीला लोकलची हलकीशी धडक बसली आणि ती खाली पडली. यानंतर मोटरमनने या मुलीला बाहेर काढत पाणी पाजून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. तिच्या चौकशीत ही तरुणी अल्पवयीन असल्याचं समोर आल्यानं रेल्वे पोलिसांनी तरुणीच्या पालकांना बोलावून समजूत काढून मुलीला त्यांच्या ताब्यात दिलं. याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
-------------------------------------