UCHIT Media

UCHIT Media UCHIT Media Services is a PR agency which provides all services regarding media and publicity. Our goal is to provide services to every noble cause.

UCHIT Media Services is a Pune based Public Relations firm that was
founded by Jivraj Chole and Reshma Chole in 2015. Uchit Media Services provides all kinds of services in the field of media and advertisements. Today, Uchit Media have expanded itself all over Maharashtra to become one of the most result-oriented public relation companies in the state. With the help of our clients and love we rece

ive from them we have achieved many milestones. Our aim is to become one of the top-rated PR companies in India. Our performance and your love will definitely take us there. By Our brand name Uchit, we mean, we are Relevant for strategic communications in today’s competitive world, Fair with our clients, Apt and best Suited PR firm to businesses, institutions or to the individuals who are working towards the betterment of the society, Moral in our ways of delivering what we have promised. We will always have the Honest Advisements for the precise positioning of your brand in the market. And also we have the most Justified tariffs for our services.

पुण्याचा विचारमंच, पत्रकारिता, शिक्षण आणि सामाजिक कार्य या सर्वच क्षेत्रांत आपली ठसठशीत ओळख निर्माण करणारे ‘केसरी’चे विश...
16/07/2025

पुण्याचा विचारमंच, पत्रकारिता, शिक्षण आणि सामाजिक कार्य या सर्वच क्षेत्रांत आपली ठसठशीत ओळख निर्माण करणारे ‘केसरी’चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू आणि लोकमान्यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

10/07/2025

आपल्या लेखनाने, कथा-कादंबऱ्यांनी आणि विचारांनी आम्हा सर्वांवर गोड ठसा उमटवणारे आमचे प्रिय मित्र आणि मार्गदर्शक लेखक श्री...
25/06/2025

आपल्या लेखनाने, कथा-कादंबऱ्यांनी आणि विचारांनी आम्हा सर्वांवर गोड ठसा उमटवणारे आमचे प्रिय मित्र आणि मार्गदर्शक लेखक श्री. ज्ञानेश्वर जाधवर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Dnyaneshwar Jadhawar
Jivraj Chole
Vijay Jadhav
Sachin Jaybhaye सचिन जायभाये
Dinkar Veer
Sarjansheel
WebRelier Software Solutions Pvt. Ltd.

मुळशी खोरे स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी लढणारी प्रेरणाभूमी- ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार; सह्याद्री प्रतिष्ठा...
18/06/2025

मुळशी खोरे स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी लढणारी प्रेरणाभूमी

- ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार; सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे साळुंखे, पवार यांना 'शिवस्वराज्यभूषण पुरस्कार'

पुणे: "तथाकथित अभ्यासक राज्याच्या इतिहासाची मोडतोड करत असताना डॉ. आ. ह. साळुंखे व डॉ. जयसिंगराव पवार या विचारवंतांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला," असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी बुधवारी भूगांव येथील कार्यक्रमात बोलताना येथे काढले. मुळशी खोरे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत आणि स्वातंत्र्य चळवळीतही प्रेरणा देणारी एकमेव भूमी होती, असेही पवार यांनी नमूद केले.

सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीच्या वतीने ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे व इतिहास संशोधक, विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांना शरद पवार यांच्या हस्ते 'शिवस्वराज्यभूषण पुरस्कार' प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, मेघडंबरीतील शिवरायांची मूर्ती आणि मावळा पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती श्री शाहु महाराज होते. खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, सौ. वसुधा जयसिंगराव पवार, प्रविण गायकवाड, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रशांत जगताप, डॉ. श्रीमंत कोकाटे, रविकांत वर्पे, शांताराम इंगवले, महादेव कोंढरे, आयोजक सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, "महाराष्ट्राचा इतिहास मांडला जात असताना काही तथाकथीत विचारवंतांकडून मोडतोड होत होती. अशावेळी काहीजण वास्तव इतिहास मांडण्याचे काम करत होते. त्यामध्ये आजच्या दोन्ही सत्कारमूर्तींचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर ठेवला. त्यांचा सन्मान शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून व तोही स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असलेल्या मुळशीच्या भूमीत ही फार मोठी गोष्ट आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे काम करत असताना मुळशी सत्याग्रहाचे स्मरण ठेवले हे चांगले आहे."

स्वराज्याच्या धामधुमीत हेच मुळशी खोरे अग्रेसर होते, अगदी सेनापती बापटांच्या मुळशी सत्याग्रहापर्यंत स्वातंत्र्याच्या चळवळीशीही ही भूमी जोडली गेली आहे, असे त्यांनी सांगितले. पवार यांनी आपल्या भाषणात छत्रपतींचे स्वराज्य हे भोसल्यांचे नव्हते किंवा महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या विविध सुलतानांसारखे एका व्यक्तींचे नव्हते, तर ते रयतेचे राज्य होते, असे मत व्यक्त केले. राजे रजवाडे अनेक होऊन गेले, लोक आता त्यांना विसरले. पण हिंदवी स्वराज्य लोकांच्या हृदयावर आजही राज्य करीत आहे, असेही पवार म्हणाले.

डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, "हे स्वराज्य फक्त हिंदुंचे आहे, असे छत्रपती शिवाजी महाराज कधीही म्हणाले नाहीत. ते सर्वांचे आहे, असेच ते म्हणत. तत्कालीन काळातील जगात सर्वत्र धार्मिकतेवर आधारित राज्य होती हे लक्षात घेतल्यावर शिवाजी महाराजांच्या 'हे राज्य रयतेचे' या विचारांचे महत्व लक्षात येते. म्हणूनच शिवाजी महाराजांचे, म्हणजेच राजेशाहीचे नाव आपण लोकशाहीतही घेतो. कारण त्यांनी दाखवलेला सर्वधर्मसमभाव हा आपल्या घटनेचा प्राण आहे." देशाला सध्या धर्मवादाचा धोका आहे, अशा परिस्थितीत सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला गरजेचा आहे, असेही त्यांनी नमूद केले. शाहू महाराजांविषयीच्या चरित्रग्रंथाचा जगभरातील २५ पैकी १२ भाषांत अनुवाद करण्यात यश आले आहे, अशी माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, "हा पुरस्कार म्हणजे मोठी जबाबदारी आहे. ती आम्ही पार पाडू. हा क्षण गौरवाचा आहे." शिवरायांनी राज्यभिषेकानंतर केलेल्या दक्षिण स्वारीत डच लोकांशी स्थानिक लोकांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री न करण्याच्या केलेल्या कराराची आठवण आपल्या भाषणात करुन देताना साळुंखे यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचे गुणगान केले.

अध्यक्षीय भाषणात शाहु महाराज म्हणाले, "अशा कार्यक्रमांमधून राज्यातील देशातील युवकांना स्फूर्ती मिळेल. शिवरायांपासून स्फूर्ती घेऊन सह्याद्री प्रतिष्ठान काम करत आहेत. आजच्या एकूण परिस्थितीला दिशा देण्याचे काम हा कार्यक्रम करेल. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे पुरोगमित्त्व राखण्यासाठी अशा विचारवंतांचा गौरव होणे गरजेचे आहे." खासदार सुळे नुकत्याच परदेशाचा दौरा करून आल्या. तिथे त्यांनी भारताची बाजू प्रभावीपणे मांडली. त्या आता पक्षाचे नेतृत्व करतील, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, अशा शब्दांमध्ये शाहु महाराज यांनी खासदार सुळे यांचे कौतुक केले.

शिवविचारांचा जागर करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा चित्रफीतीद्वारे घेण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अनिल पवार यांनी प्रास्ताविक केले. दोन्ही सत्कारमूर्तींच्या मानपत्राचे वाचन व सूत्रसंचालन चेतन कोळी यांनी केले. महेश मालुसरे यांनी आभार मानले.
--------------------
भूगाव: सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे डॉ. आ. ह. साळुंखे व डॉ. जयसिंगराव पवार यांना 'शिवस्वराज्यभूषण पुरस्कार प्रदान करतेवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार व छत्रपती शाहू महाराज. प्रसंगी आयोजक अनिल पवार.

'कूस', वास्तव मांडणारी कलाकृती पूर्णत्वाकडे... टेक्निकल प्रीव्ह्यू पाहून झाल्यावर साऊंड डिझाईनर दर्शन शिवले, कार्यकारी न...
07/06/2025

'कूस', वास्तव मांडणारी कलाकृती पूर्णत्वाकडे...
टेक्निकल प्रीव्ह्यू पाहून झाल्यावर साऊंड डिझाईनर दर्शन शिवले, कार्यकारी निर्मिती तेजस्विनी थिटे, निर्माता जीवराज चोले, दिग्दर्शक ज्ञानेश्वर जाधवर, सिनेमॅटोग्राफर गिरीश जांभळीकर, संपादक नीलेश रसाळ व सहदिग्दर्शक शिवाजी करडे. Jivraj Chole

Great meeting with renowned writer, entrepreneur Sharad Tandale ji, and Tree Man of India Vishnu Lamba ji at Green Solut...
24/05/2025

Great meeting with renowned writer, entrepreneur Sharad Tandale ji, and Tree Man of India Vishnu Lamba ji at Green Solutions 13th foundation day!

12/05/2025
Uchit Media Services
01/04/2025

Uchit Media Services

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🎉
29/03/2025

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🎉

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
14/01/2025

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जागतिक किर्तीचे अर्थशास्त्रज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्री, भारताचे १४ वे पंतप्रधान     डॉ मनमोह...
26/12/2024

जागतिक किर्तीचे अर्थशास्त्रज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्री, भारताचे १४ वे पंतप्रधान
डॉ मनमोहनसिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

16/12/2024

सर्जनशील न्यूज या मराठी युट्यूब चॅनेलसाठी व्हिडीओ एडिटर हवा आहे. इच्छूकांनी संपर्क साधावा. १४६८ सदाशिव पेठ, टिळक रोड पुणे.
Mob- ९७६७७८९५२९, Email- [email protected]

Address

Ambegaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when UCHIT Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to UCHIT Media:

Share