Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती, News & Media Website, Pune.
(1221)
👉 स्टार्टअपसाठी सर्व मदत- .co
📚 उद्योगविषयक पुस्तकं
👉 मोफत व्यवसाय मार्गदर्शन
🎯 मिशन : १ लाख उद्योजक
👇 पुस्तकं, वेबसाईट, WhatsApp ग्रुप
heylink.me/Naviarthkranti नवी अर्थक्रांती हे एक प्रकाशन आहे. या अंतर्गत उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. तसेच उद्योगात येणाऱ्या सर्व समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. साक्षर, संपन्न व समृध्द महाराष्ट्र घडवण्यासाठी
व महाराष्ट्राची ही ओळख जगभर पोहोचवण्यासाठी नवी अर्थक्रांतीची सुरुवात २०१५ मध्ये झाली. समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे हे ध्येय घेऊन उद्योगविषयक माहिती, आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान, चालू घडामोडी तसेच प्रेरणादायक गोष्टींनी परिपूर्ण केवळ चांगल्या आणि उत्कृष्ट ज्ञानाचा शोध घेणे व त्याला प्रकाशित करणे, हे काम फेसबुक आणि इतर समाज माध्यमांतून करत आहोत. लाखो तरुणांच्या पंखांमध्ये स्वप्नांचं बळ भरून विकासाची अवकाशझेप घ्यायला उद्युक्त करणे आणि त्यातून समाजात नवा आचार आणि विचार रुजवून देशाला विकासाच्या राजस्त्यावर आणणे हा ‘नवी अर्थक्रांतीचा उद्देश आहे. स्मार्टअप या उपक्रमाअंतर्गत कोणत्याही व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व सेवा एका छताखाली उत्तम दर्जा व वाजवी दरात या सेवा उद्योजकांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
18/07/2025
अशाच पोस्टसाठी फॉलो करा.
------------------------------------------------------------
👥 | मित्रांसोबत शेअर करा.
✌️ | पोस्ट कशी होती कमेंट करून नक्की कळवा.
⏺️ | नंतर साठी सेव्ह करून ठेवा.
📢 | पोस्टच नोटिफिकेशन चालू करा
------------------------------------------------------------
(Navi Arthkranti, Marathi Motivation, Marathi quotes, Inspiration Quotes, Marathi Status, Business Status)
10/07/2025
गुरुपोर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा!
------------------------------------------------------------
👥 | मित्रांसोबत शेअर करा.
✌️ | पोस्ट कशी होती कमेंट करून नक्की कळवा.
⏺️ | नंतर साठी सेव्ह करून ठेवा.
📢 | पोस्टच नोटिफिकेशन चालू करा
------------------------------------------------------------
#गुरुपौर्णिमा
06/07/2025
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#वारी #आषाढीएकादशी #पंढरपूर #वारी२०२५
(Navi Arthkranti, Marathi Motivation, Marathi quotes, Inspiration Quotes, Marathi Status, Business Status)
Be the first to know and let us send you an email when Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Business
Send a message to Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती:
नवी अर्थक्रांती हे एक प्रकाशन आहे. या अंतर्गत उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. तसेच उद्योगात येणाऱ्या सर्व समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. साक्षर, संपन्न व समृध्द महाराष्ट्र घडवण्यासाठी व महाराष्ट्राची ही ओळख जगभर पोहोचवण्यासाठी स्वामी विवेकानंद, बाबा आमटे आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन १५ ऑगस्ट २०१५ रोजी नवी अर्थक्रांतीची सुरुवात झाली. समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे हे ध्येय घेऊन आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, स्टार्टअप, शेती, तंत्रज्ञान, करिअर या विषयांवरील उपयुक्त माहिती तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे काम अविरतपणे चालू आहे. युवकांना प्रेरणा देणारे विचार नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून अखंडितपणे जगभरातील लाखो (१० लाखांपेक्षा अधिक) लोकांपर्यंत पोहोचत आहेत. या विचारांनी प्रेरित होऊन आणि उपयोग करून आजवर शेकडो लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे, वाढवला आहे.
कोणतीही गोष्ट, काम, जबाबदारी सरकारवर किंवा राज्यकर्त्यांवर न ढकलता परस्पर सहकार्याने ‘आलात तर तुमच्यासोबत नाहीतर, तुमच्याशिवाय’ या तत्त्वावर नवी अर्थक्रांतीचे काम सुरू आहे. नवी अर्थक्रांतीने सर्वसामान्य मराठी तरुणाला चाकोरीतून बाहेर पडण्याची हिंमत दिली. आपल्या पाठीमागे कोणीतरी भक्कमपणे उभं आहे, कितीही अडचण आली तरी मार्ग काढत पुढे जायचं, पण मागे हटायचं नाही ही जिद्द त्यांच्यात निर्माण केली. जगात कोणीही आपली समस्या सोडवली नाही, तरी नवी अर्थक्रांती सोडवेल हा विश्वास लोकांच्या मनात जागवला. ९-१० वर्ष व्यवसाय करायचा फक्त विचार करणारे लोक नोकरी सोडून बिझनेसमध्ये उतरू लागले आहेत. सोशल मिडीयाचा सकारात्मक गोष्टींसाठी कसा वापर केला जाऊ शकतो आणि त्यातून किती मोठा बदल घडवला जाऊ शकतो हे नवी अर्थक्रांतीने सिद्ध करून दाखवले आहे.
पुढील १० वर्षांत १० लाख तरुणांना रोजगार मिळवून देणे, १ लाख उद्योजक घडवणे ह्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने आम्ही कार्यरत आहोत. यासाठी महाराष्ट्राच्या अनेक भागात व्याख्याने, मार्गदर्शनपर सेमिनार राबवले गेले आहेत. तसेच भाषांतरीत पुस्तके, स्टार्टअप महाराष्ट्र, थेट परदेशी गुंतवणूक यासारखे नवीन उपक्रम घेऊन लोकांच्या सेवेत उपयुक्त ठरण्याची भूमिका चालू आहे. अनेक प्रकल्पावर नवी अर्थक्रांतीचे काम चालू आहे.
त्याचबरोबर ‘स्मार्टअप 100’ या उपक्रमाअंतर्गत कोणत्याही व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व सेवा (सोशल मीडिया मार्केटिंग, वेबसाईट, कंपनी रजिस्ट्रेशन, इत्यादी) एका छताखाली उत्तम दर्जा व वाजवी दरात या सेवा उद्योजकांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. तसेच NavBiz.in या ऑनलाईन बिझनेस डिरेक्टरीच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय फक्त महाराष्ट्रभर नाही, तर जगभर पोहोचवू शकता.
हे सर्व अविरत चालू राहावे यासाठी आम्हाला आपल्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशिर्वादाची साथ हवी आहे. आपल्याला जगासोबत अपडेटेड ठेवण्यासाठी उपयुक्त माहिती आणि ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून देण्यासाठी ‘नवी अर्थक्रांती’ सदैव तत्पर आणि कटिबद्ध आहे.
‘नवी अर्थक्रांती’ला अधिक प्रभावी आणि परिपूर्ण करण्यासाठी आपल्या प्रतिक्रियांचे कायमच स्वागत आहे. कृपया आपली प्रतिक्रिया [email protected] या मेलआयडीवर किंवा 8898794864 या व्हॉटस अॅप क्रमांकावर कळवा.