25/06/2024
दिव्यांग कर्मचारी सुनीता मेश्राम यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी अमरावती जिल्हा परिषद समोर मंगळवार 25 जून पासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आरोग्य सेविका सुनीता मेश्राम ज
यांचे दिव्यांगाचे मागील नऊ महिन्याचे 2015 ते 16 मधील दिव्यांगचे शेड्युल धुळघाट रेल्वेचे कनिष्ठ लिपिक पाठवीत नाहीत. वारंवार त्यांना विनंती करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अपंग दिव्यांग कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद समोर बेमुदत धरणे आंदोलन मंगळवारी 25 जून रोजी सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा संघटनेचे विभागीय अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी दिला आहे.