
19/06/2025
दर्यापूरच्या वारसा वृक्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल एकही झाड तोडू नका सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.
जलवृक्ष चळवळीच्या प्रयत्नांना घवघवीत यश -विजय विल्हेकर
जलवृक्ष चळवळीचे संकल्पक विजय विल्हेकर व तमाम जलवृक्ष प्रेमींच्या पुढाकाराने गेल्या आठ वर्षापासून एसटी डेपो ते शिवाजीनगर रोडवरील ब्रिटिश कालीन झाडे.जपल्या गेली पाहिजे.यासाठी जलवृक्ष चळवळीने निकराचा लढा दिला. सावली देणारी झाडे जगली पाहिजे.हा प्रामाणिक हेतू ठेवून. हा निसर्ग लढा अभिनव सत्याग्रहातून लढवण्यात आला. ही झाडे पाडू नका असे 80 /90 वर्षाच्या वृद्ध नागरिकांपासून तरुणांपर्यंत सर्वांची मागणी असताना. रोड करा अशी कोणतीच मागणी नसताना. तत्कालीन नगरपालिका प्रशासक नंदू परळकरांनी विनाकारण आठ वारसा झाडे बेकायदेशीर कापली. त्या विरोधात आम्ही न्यायालयीन लढा उभा केला. हा न्यायालयीन लढा मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची जलवृक्ष प्रेमी चातकासारखी वाट पाहत होते. मा.सर्वोच्च न्यायालयाने एकही झाड तोडू नका असा मनाई हुकूम दिला. सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने परखड भूमिका दिल्लीचे सर्वोच्च न्यायालयाचे ख्यातनाम वकील अँड अमोल एन.सूर्यवंशी व ऍड.राहुल जे. शिंदे यांनी जबरदस्त युक्तीवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने आपले म्हणणे ऐकून घेऊन एकही वृक्ष तोडू नका असे निर्देश दिले. असे विजय विल्हेकर यांनी सांगितले.
दर्यापूर ही भूमी वेदना संत गाडगेबाबा,डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची भूमी आहे. संत गाडगेबाबांनी कित्येकदा झाडाखालचा रस्ता झाडून काढला असेल. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या कित्येक सभा या झाडांच्या सावलीत घेतल्या असतील. हा या झाडांच्या सावलीचा इतिहास आहे. दर्यापूरकरांना सार्थ अभिमान असलेले.याच दर्यापूर भूमितील विधी विद्वान सुपुत्र,सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषणजी गवई सर. रा. सू. गवईकाका,कमलआई यांचे बोट धरून या झाडांच्या सावलीतून चालले असतील कदाचित. अशी भावना विजय विल्हेकर यांनी या प्रसंगी व्यक्त केली. सर्वोच्चन्यायालयाच्या निर्णयामुळे दर्यापूरकरांनी प्रचंड आनंद व्यक्त केला.
या समग्र निसर्ग लढ्यात बंडू शर्मा,एड. विद्यासागर वानखडे, विजय लाजूरकरअनिरुद्ध वानखडे, दर्शन दीपक गवई,मालिनी पाटील, वर्षा अग्रवाल,संगीता पुंडे,अँड सुजाता वानखडे, वर्षा अग्रवाल, सिंधू विल्हेकर,जयश्री चव्हाण,सुनीता मांडवे, मनोज रेखे,मनोज तायडे, अनिल गवई, शेखर रेखे,नरेश मोहता,डॉ. कांबळे,यश कांबळे, माणिकराव मानकर,गणेश लाजूरकर, गजानन देशमुख, ,गजानन देवके,शरद रोहनकर,रमेश भले,सदानंद तिडके,सुभाष कीटे, अँड मुकुंद नळकांडे अशा असंख्य निसर्गप्रेमींनी सहभाग दिला.