AYS Cinema Production

AYS Cinema Production Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AYS Cinema Production, Film/Television studio, Amravati.

Dear Filmmakers...आपल्या कल्पना शक्तीला धार लावून एक अर्थपूर्ण कलाकृती निर्माण करण्यास सज्ज व्हा ..आणि सामील व्हा...*आपल...
15/09/2025

Dear Filmmakers...
आपल्या कल्पना शक्तीला धार लावून एक अर्थपूर्ण कलाकृती निर्माण करण्यास सज्ज व्हा ..आणि सामील व्हा...*आपल्या भारतीय संविधानावर आधारित* या अतिशय अर्थपूर्ण उपक्रमात ...

"अमरावती स्पंदन परिवार"
आयोजित ..

*राष्ट्रीय संविधान जागृती लघुपट स्पर्धा व महोत्सव 2025*

मग ? 🤷🏻‍♂️ लागा कामाला 😊

एक पाऊल...
आपल्या संविधानाला समजून घेण्याच्या दिशेने .....
एक सुशिक्षित, शहाणा आणि जबाबदार भारतीय नागरिक बनण्याच्या दिशेने..

*लघु चित्रपट खालील विषयांवर आधारित असले पाहिजेत*

१. आपल्या संविधानाची मूलभूत तत्त्वे आणि त्यांचे अर्थ: न्याय, समानता, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, बंधुता, व्यक्तिगत प्रतिष्ठा, एकता आणि अखंडता.

२. भारतीय म्हणून आपले मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये.

३. संविधानाने काय आणि कोणाला दिले आहे?. (शेतकरी, महिला, कामगार, वंचित आणि शोषित समाज )

४. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणजे काय? अर्थ.

५. आपण आणि आपले संविधान

*आवश्यक कागदपत्रे.*

१. अर्जदाराचा पासपोर्ट फोटो - प्रतिमा

२. चित्रपट पोस्टर (उंची ६ इंच * रुंदी ४ इंच) - प्रतिमा

३. कलाकार आणि तंत्रज्ञ यादी/क्रेडिट यादी - PDF

४. सारांश (चित्रपटाचा लघु सारांश) - PDF

*महत्वाची माहिती*

१. चित्रपट सादर करण्याची अंतिम तारीख: १६ नोव्हेंबर २०२५

२. लघुपटाचा कालावधी २० मिनिटांच्या आत असावा.

३. कोणत्याही भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपट इंग्रजी उपशीर्षकांसह स्वीकारले जातात.

४. स्पर्धेसाठी प्रवेश मोफत: फक्त ५०० रुपये

५. बक्षिसे - प्रथम: १०,०००/, द्वितीय: ७,०००/, तृतीय: ५,०००/.

६. आपला प्रवेश गुगल फॉर्मद्वारे निश्चित करावा .
लिंक : https://forms.gle/nZqvSEDkrSgiE3Jz9

७. सर्व महोत्सव आणि स्पर्धा आयोजन व्यवस्थापनाचे अधिकार आयोजकांकडे राखीव आहेत.
----------------------------------------

17/06/2025

Last Date for Admission : 30th June 2025

03/06/2025

Hurry up...👍😊

21/05/2025
*शनिवार 03 मे ....**राजा हरिश्चंद्र* या मूकपटाच्या प्रदर्शनाने भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारा दिवस ...*शनिवा...
03/05/2025

*शनिवार 03 मे ....*
*राजा हरिश्चंद्र* या मूकपटाच्या प्रदर्शनाने भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारा दिवस ...

*शनिवार ३ मे १९१३...*

आजचा दिवस भारतीय चित्रपट सृष्टीसाठी एक सुवर्णदिनच म्हणावा लागेल. कारण आजच्याच दिवशी भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा 'राजा हरीशचंद्र' हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. हा मूकपट जरी असला तरी या चित्रपटाने भल्या भल्यांना बोलतं केलं. तसंच व्यावसायिक दृष्ट्या देखील हा चित्रपट यशस्वी ठरला आणि चलचित्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. दादासाहेब फाळके यांनी या चित्रपटाची फक्त निर्मितीच नाही तर दिग्दर्शन, लेखन, संकलन, चित्रीकरण, कला-दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टी केल्या होत्या. पूर्वी स्त्रिया चित्रपटांमध्ये काम करत नसत, चित्रपटात काम करणं म्हणजे कमीपणाचं समजलं जात असे. अशावेळी काय करायचं हा देखील प्रश्नच होता. पण या सगळ्या संकटांवर मात करून दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरीशचंद्र' प्रदर्शित केला. पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर १९१३ ते १९१८ या कालखंडात त्यांनी जवळजवळ २३ चित्रपटांची निर्मिती केली.

त्या काळातील चित्रपटाचं तंत्र अतिशय किचकट आणि मेहेनतीचं होतं. प्रत्येक वस्तू प्रचंड खर्चिक आणि मर्यादित असल्यामुळे सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक कराव्या लागत असत. एखादी फ्रेम चुकली किंवा एखादा सिन चुकला की त्याचं पुन्हा चित्रीकरण करणं म्हणजे तोट्याचं आणि तितकंच जिकिरीचं होतं. अशावेळी प्रत्येक गोष्ट तेवढ्याच परिपूर्णतेने होणं अत्यावश्यक होतं. कालांतराने १९३१ साली चित्रपटांबद्दल लोकांना माहिती व्हायला लागली आणि त्याचवर्षी 'आलम आरा' हा भारतातील पहिला बोलपट प्रदर्शित झाला. मग काही काळानंतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. १९४७ मध्ये सत्यजित राय यांच्या 'पाथेर पांचाली' या चित्रपटापासून एका नवीन युगाचा प्रारंभ झाला ते युग ७० च्या दशकातील वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.

*...आणि आता*

शेवटी चित्रपट म्हणजे समाजाची एक प्रतिमा, अशी सारासार व्याख्या आहे असं आपण म्हणू शकतो. सध्या सोशल मीडियाच्या जगात, डिजिटल भारताच्या युगात सगळ्याच गोष्टी आधुनिक आणि कल्पनेपलिकडच्या आहेत. सगळ्या प्रकारची साहित्य, सोयी,सुविधा, मनुष्यबळ या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध आहेत. मात्र त्याची किंमत ठेवायला आपण विसरत चाललो आहोत का असा प्रश्न आज मनात आला. आजकाल सगळं जग एका बोटाच्या क्लिक एवढं जवळ येऊन ठेपलंय. इतकं सगळं सुखकर असताना आपल्याकडून पूर्वीसारख्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत आहेत का? आजकाल आपल्याकडच्या तांत्रिक गोष्टी अतिशय आधुनिक आहेत. दरदिवशी एखादा व्हिडिओ आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेला बघतो. मग त्याचा दर्जा वाईट आहे की चांगला याकडे बरेचदा दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतं.

फक्त वाईट गोष्टी असं नाही पण सध्या खूप वेगवेगळ्या प्रकारचे विषय चित्रपटांमध्ये हाताळले जात आहेत. स्त्री पुरुष समानतेचा असो, तत्कालीन सरकारने केलेल्या घोटाळ्यांचा असो, असे अनेक विषय जे या आधी तितक्या उघडपणे बोलले गेले नाहीत. मात्र एक नक्की की, चित्रपटांइतकेच कलाकार आणि प्रेक्षक वर्ग सजग आणि प्रगल्भ झाला आहे. आणि म्हणूनच शनिवार ३ मे १९१३ हा दिवस आणि आजचा दिवस यामध्ये कित्येक वर्षांचा फरक असला तरी सुद्धा चित्रपटकर्त्यांमध्ये तीच उमेद, तोच उत्साह आणि तीच जिद्द कायम आहे की जाता जाता आपल्याला काहीतरी घडवायचंय...आणि ही खटपट अखंड सुरूच राहील.

Address

Amravati
444604

Alerts

Be the first to know and let us send you an email when AYS Cinema Production posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share