27/08/2022
महाराष्ट्र-मध्य प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई,
26 ठिकाणच्या हातभट्टीच्या दारूसह 26 लाख 80 हजार किमतीचा माल केला नष्ट
कासिम मिर्झा
चांदूर बाजार
तालुक्यातील शिरजगाव कसबा व ब्राह्मणवाडा थडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टीच्या दारूची तस्करी जोरात सुरू असून, हे दोन्ही पोलिस ठाणे हद्दी मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असल्याने हातभट्टीच्या दारूची महाराष्ट्रात अगदी सहज तस्करी होते. त्याचा फायदा घेऊन दारू तस्कर निर्भयपणे याची तस्करी करत आहेत.
या तस्करांमुळे दोन्ही राज्यांचे पोलीस चांगलेच हैराण झाले होते, त्यामुळेच आज शनिवार 27 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांनी या हातभट्ट्यांवर कारवाई करत या हातभट्ट्यांवर छापे टाकून 26 ठिकाणी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. दारू बनवताना 26 लाख 80 हजारांचा माल नष्ट करण्यात आला
ब्राह्मणवाडा, शिरजगाव कसबा पोलिसां व्यतिरिक्त मध्य प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी अतुलकुमार नवगिरे, ग्रामीण गुन्हे शाखेचे एपीआय रामेश्वर धोंडगे, शिरजगाव कसबाचे ठाणेदार प्रशांत गीते, ब्राह्मणवाडा थडीचे ठाण्याचे ठाणेदार पंकज दाभाडे , पीएसआय मूळचंद भांबूरकर आणि मध्य प्रदेश पोलिसांनि केली आहे