आपली मातृभूमि - Apli Matrubhumi

आपली मातृभूमि - Apli Matrubhumi विशेषतः महाराष्ट्रातील लोकांसाठी

20/11/2025
"आगामी मुंबई महापौर हिंदूच होणार असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांचे विधान चर्चेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभ...
20/11/2025

"आगामी मुंबई महापौर हिंदूच होणार असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांचे विधान चर्चेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कडून महत्त्वाचा दावा!"

20/11/2025

‘बाबा मला मारलं....’ उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने महायुतीत अंतर्गत मतभेद आणि शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा जोरात सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर अप्रत्यक्ष टोला लगावला. “बाबा मला मारलं म्हणत कुणीतरी दिल्लीला गेले,” अशा शब्दांत त्यांनी चिमटा काढत शिंदेंची खिल्ली उडवली. शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते.
# uddhavthackeray

20/11/2025

20/11/2025

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात क्रुर मुख्यमंत्री - यशोमती ठाकुर
चिखलदरा नगरपरिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती हे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अमरावतीतील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. निकाल जाहीर होताच काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी फडणवीस यांच्यावर थेट गंभीर आरोपांची सरबत्ती करत भाजपला चांगलेच धारेवर धरले.

पुन्हा उसळले Gen Z आंदोलन! नेपाळमधील वातावरण अत्यंत तणावपूर्ण. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बारा जिल्ह्यांच्या परिसरा...
20/11/2025

पुन्हा उसळले Gen Z आंदोलन! नेपाळमधील वातावरण अत्यंत तणावपूर्ण. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बारा जिल्ह्यांच्या परिसरात कर्फ्यू, तर विमानतळावरील सेवा तात्काळ थांबवण्यात आल्या.

20/11/2025

20/11/2025

शिंदे नाराज नाहीत, एनडीए परंपरेनुसार शिंदे–शाह भेट :चंद्रशेखर बावनकुळे
एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या बातम्यांदरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजीचे वृत्त फेटाळले.
ते म्हणाले, "एकनाथ शिंदे यांना परवा भेटलो होतो, ते अजिबात नाराज नव्हते. काल ते अमित शाह यांना भेटले. नगर विकास खातं आणि केंद्र सरकारसोबतच्या समन्वयाचे विषय यावर चर्चा करण्यासाठी एनडीएचे नेते म्हणून त्यांनी ही भेट घेतली. एनडीएची परंपरा आहे की विशिष्ट कालावधीनंतर नेते एकमेकांना भेटत असतात. महाराष्ट्रात महायुतीला 51 टक्के मतांनी विजयी होता यावं, यासाठीच त्यांनी ही भेट घेतली होती. तीच त्यांची भूमिका आहे.
maharashtranews

20/11/2025

लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक? अमरावती मनपा निवडणूक मतदार यादीवर काँग्रेसचा आक्षेप
अमरावती महापालिका निवडणुकीपूर्वी मतदारयादीत मोठी विसंगती आढळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तयार करण्यात आलेल्या यादीत अनेक प्रभागांमध्ये लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त दाखवण्यात आल्याचे काँग्रेसचे माजी नगरसेवक मुन्ना राठोड आणि पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

19/11/2025

चळवळीतील शेतकऱ्यांची धरपकड, पोलिसांवर राजू शेट्टींचा प्रहार
गोध्रा प्रकरणावरून पोलिसांवर टीका आणि शेतकरी कार्यकर्त्यांच्या धरपकडीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आणि निवेदनातून पोलिसांच्या कारवाईवर थेट हल्लाबोल केला.

Address

1st Floor, Rawade Complex, West Side, Near Irwin Square, Khaparde Bagicha
Amravati
444602

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपली मातृभूमि - Apli Matrubhumi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आपली मातृभूमि - Apli Matrubhumi:

Share