27/09/2025
दिवाळीत सर्वात आधी संपणारा पदार्थ म्हणजे करंजी.😋
या पद्धतीने तुम्ही एकदा करंजी करून पहा तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडेल✌️ आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा.
चला तर मग पाहूया खोबऱ्याची खुसखुशीत खमंग करंजी.
करंजी
साहित्य:
3 वाट्या सुके खोबरे किसून
1 वाटी पिठीसाखर
1टीस्पून वेलची पूड
2 टेबलस्पून खसखस
आवडीनुसार सुके मेवे (काजू, बदाम)
आवडीनुसार मनुका
3 वाट्या मैदा
४ टेबलस्पून तूप
चिमूटभर मीठ
पाणी – आवश्यकतेनुसार
तेल – तळण्यासाठी
कृती:
प्रथम कढई गरम करून त्यात सुके खोबरे व खसखस ३–४ मिनिटे परतून घ्या आणि परातीत काढा.
थोड्या तुपात सुके मेवे भाजून घ्या. आता सर्व मिश्रण (खोबरे, मेवा, मनुका) एका मोठ्या परातीत घेऊन त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड मिसळा. हेच करंजीचं सारण तयार.
दुसऱ्या भांड्यात मैदा चालून घ्या. त्यात ४ टेबलस्पून गरम तूप घालून हाताने छान मिक्स करा, नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पीठ मळा. अर्धा तास झाकून ठेवा.
पीठ पुन्हा मळून छोटे गोळे करून पोळ्या लाटा. मध्ये तयार सारण ठेवा, कडे पाण्याने चिकटवून करंजी साचा लावून बंद करा.
कढईत तेल तापवून करंज्या कमी आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
करंजी थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.
👉 खमंग, सुगंधी आणि कुरकुरीत करंज्या सणातल्या गोड आठवणी जागवतात.
Tips
करंजी करताना जर खोबरे भाजून घेतले तर करंजी ही खूप दिवस टिकते.
करंजीच्या बाहेर चपातीचा मैदा भिजवताना नेहमी तुपाचे मोहन कडकडीत द्यावे त्याने करंज्या या खमंग आणि खुसखुशीत होतात.
करंजा या तुपात तळल्या तरी सुद्धा त्या खूप छान चवीला लागतात.