Bolmaharastra.com

Bolmaharastra.com आपल्या महाराष्ट्रचे लोकप्रिय फेसबुक

जगाला भगवान गौतम बुद्ध व भगवान महावीर यांच्या विचारांची गरज…! -
15/03/2026

जगाला भगवान गौतम बुद्ध व भगवान महावीर यांच्या विचारांची गरज…! -

आजची स्थिती पहिली तर जगाच्या पाठीवर अमेरिकी इस्रायल इराण युद्ध सुरू आहे याआधी रशिया व युक्रेन युद्ध झाले त्याचा .....

आर्णीत इतिहास घडणार, भक्तांच्या गर्दी चा रेकॉर्ड होणार…! -
15/03/2026

आर्णीत इतिहास घडणार, भक्तांच्या गर्दी चा रेकॉर्ड होणार…! -

जग प्रसिद्ध शिव कथा वाचक पूज्य पंडित प्रदिपजी मिश्रा (शिहोरवाले) यांच्या अमृतवानीतून आर्णी जिल्हा यवतमाळ येथे आय...

08/03/2026

अखेर तिरंगा फडकला..!
अभिनंदन टीम इंडिया

08/03/2026

अद्विता-अर्बन मध्ये जागतिक महिला दीना निमित्य विविध क्षेत्रामंध्ये काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

07/03/2026
हजारो रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालणारा मंत्र्या च्या बंगला *मुक्तागिरी*मोघे साहेब सामाजिक न्याय  कॅबिनेट मंत्री झालेत्य...
07/03/2026

हजारो रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालणारा मंत्र्या च्या बंगला *मुक्तागिरी*
मोघे साहेब सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री झाले
त्यांना मुंबईत मलबार हिल येथे मुक्तागिरी नावाचा शासकीय बंगला मिळाला होता.
तेव्हा मी मुंबई गेलो
राज्याभारतातून आलेल्या कार्यकर्ते,पदाधिकारी सर्वाना एकच भोजन चहा फराळ येथे व्हायचा
इतर मंत्र्यांच्या बंगल्यात देखील तो होत असावा
पण येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या रहाण्याची भोजनाची व्यवस्था नीट झाली की नाही यावर मोघे साहेब स्वतः लक्ष ठेवत...
मी ही मुंबईत गेलो पहिल्यांदा मंत्र्या चा बंगला पाहला...
नवल एक दिसले बंगल्यात दोन हॉल बेड लावलेले होते अतिशय स्वच्छ पुरेपूर वीज व्यवस्था पंखा अन बेड वर झोपलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक.. मी सकाळी उठलो तेव्हा साहेब कुठं आहेत शोधू लागलो
तर मोघे साहेब रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांची चौकशी व आस्थेने विचार पूस करत होते...
अगदी कधी आहे इलाज तारीख कोणती रुग्णालय कोणते,सर्व आपल्या डायरीत नोंदवत होते...
मुक्ता गिरी बंगल्याने तेव्हा अनेक रुग्णांचे दुःख पाहिले तिथल्या भिंतीने व मोघे साहेबांची दुःखावर फुंकर घालण्याची त्यांना मायेने आर्थिक पासून सर्व मदत करण्याची पद्धत मी जवळून पहिली
मुक्ता गिरी पासून मग ते मुंबईत असलेले टाटा, कोळीलाबेन,रिलायन्स, लीलावती हॉस्पिटल असो तेथे रुग्णांना नेण्याची व्यवस्था होती त्यासाठी एक नव्हे अनेक रुग्ण सेवक होते त्यांना आर्थिक मानधन साहेब वयक्तिक देत असत....
असाच एक किस्सा मुंबईत मनोरा आमदार निवास ला गेलो तेथे माझ्या सोबत साहेबांचे पुतणे राजू भाऊ मोघे सोबत होते
अन आमदार निवासात होते साहेबांचे बंधू स्व.आनंदराव मोघे त्याच्या घुटण्या ची शस्त्रक्रिया होती (घुटना रिप्लेस मेंट ची)
आम्ही त्यांच्या सोबत लीलावती हॉस्पिटल ला गेलो
वेटिंग ला थांबलो मी कारण विचारले तर बेड शिल्लक नव्हता
घाटंजी च्या एका रुग्णास सुट्टी होणार होती मग तो बेड आनंदराव मोघे यांना मिळणार होता...
स्वतःचा भाऊ आमदार निवासात इतर रुग्ण मात्र मुक्ता गिरी बंगल्यात... जेव्हा बेड उपलब्ध झाला तेव्हा मग साहेबांच्या भावास मिळाला
मी आल्याचे साहेबांना कळाले त्यानी मला फराळ करण्यास त्यांच्या डायनिंग वर बसण्यास सांगितले
जेवण करून घ्या म्हणाले इतकी आस्था मी पहिल्यांदा अनुभवली
साहेब मंत्रालयात जात होते
का कोणास ठाऊक ते गाडी जवळून परत आले आणि प्रमोद असा आवाज दिला
मी धावत गेलो अन साहेबांनी मुंबई फिरून या म्हणून काही रक्कम हातावर ठेवली मी नकार देऊ शकलो नाही..
दुसऱ्या दिवशी साहेब मंत्रालय जाणार होते मलाही गाडीत बसवले
अन मंत्रालय गेलो
साहेबांची बैठक होती आदिवासी उपाय योजना विकास कामांची मोठे मोठे अधिकारी होते साहेबांनी त्या बैठकीत मला बसायला सांगितले मी धन्य झालो
दुपार झाली जेवणाची वेळ झाली साहेबांचा टिफिन सोबत होता अँटी चेंबर ला साहेबांचे ताट वाढले मी हॉल मध्ये होतो शिपायाने आवाज दिला प्रमोद कोण आहे मी म्हंटल अन मला बोलावले आत गेलो तर माझे ही ताट होते मी जेवत नाही म्हणालो तरी आग्रह करून साहेबांनी मला जेवायला सांगितले
तेव्हा मी त्यांच्यातली काळजी करणारा माणूस पाहिला अन साहेबांना तीर्थस्वरूप म्हणू लागलो.
मी मुंबईत अनेक आमदार मंत्री नंतर च्या काळात रुग्णसेवेत पाहिले त्याचा अनुभव कथन करीनच
पण मी अनुभलेला मुक्ता गिरी बंगल्या चा अनुभव विसरू शकत नाही हजारो रुग्ण त्या भिंतीचे साक्षीदार ठरले...
(आठवणी च्या हिंदोळ्यावर)
प्रमोद कुदळे

प्रमोद महाजन तेव्हा बोलले होते...जे होते चांगल्या साठी होते...केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते स्व.अटल बिहारी वाज...
07/03/2026

प्रमोद महाजन तेव्हा बोलले होते...जे होते चांगल्या साठी होते...
केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते स्व.अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते
अन सरकार वर अविश्वास आला अटलजी चे सरकार १ मताने कोसळले होते...
त्यानंतर झालेल्या निवडणुकीत प्रचार सभेला प्रमोदजी यवतमाळ आझाद मैदानात यवतमाळ आले होते
तेव्हा त्यांनी सांगितले अटलजीच्या माघे मी होतो अटलजी च्या चेहऱ्यावर अजिबात दुःख नव्हते...
मी म्हणालो
जे होते चांगल्या साठी होते,देव करतो बरोबर करतो...
मग प्रमोद जी ने एक उदाहरण दिले
एक राजा होता त्याचा एक प्रधान होता अत्यन्त विश्वासू
त्याला सवय होती नेहमी तो म्हणायचा जे होते चांगल्या साठी होते...देव करतो बरोबर करतो...
एकदा राजा आपल्या तलवारीला धार लावत असतांना चुकून तलवार अंगठ्या वर चालली व अंगठा तुटला रक्त वाहू लागले
शेजारी प्रधान उभा होता तो नेहमी प्रमाणे म्हणाला जे होते भल्या साठी होते देव बरोबर करतो
राज्याला राग आला माझा अंगठा तुटला रक्त वाहत आहे आणि प्रधान हे काय बोलतो
म्हणून राज्याने आदेश दिले या प्रधानाला १ महिना तुरुंगात टाका...
प्रधानास तुरुंगात टाकले..
इकडे राज्याची जखम सुखली तो शिकारी ला गेला..
राजाचा घोडा वेगवान सुसाट जंगलात पुढे गेला
सैन्य पाठीमागे राहिले...
त्या घनदाट वनात पूजा चालली होती
त्या पूजेसाठी एक नर बळी द्यायचा होता
त्या ठिकाणी जो कोणी पहिला येईल प्राणी त्याचा बळी देण्याची प्रथा होती...
राजा त्या ठिकाणी आला
राजबिंडा बळी मिळाला म्हणून सर्व खुश त्यानी राजाला पकडले...
सर्व वस्त्र व अलंकार काढले पण एक पद्धत होती ती बळी देण्या पूर्वी त्यास अभ्यंग स्नान घालायचे
राजाला स्नान घालताना त्याचे अंगठा तुटलेला दिसला...
एक जण म्हंटला हा पूर्ण नर नाही...तेव्हा राजाला सोडून दिले
वस्त्र अलंकार घालून राजा परतला...
आता राजाला प्रधानाचे शब्द आठवले
जे होते भल्यासाठी,देव करतो...
राजा परत आला अन प्रधानाला कैदेतून मुक्त केले
अन म्हणाला तू बरोबर बोलला आज माझा अंगठा शाबीत असता तर माझा बळी गेला असता..
पण प्रधाना मला एक सांग माझा जीव वाचला पण तुझे काय भले झाले
प्रधान हसून म्हणाला
राजे तुमच्या घोड्या सोबत माझा घोडा वेगात सोबत असता तेव्हा तुम्हाला सोडले असते अन माझा बळी देण्यात आला असता...
म्हणून म्हणतो देव बरोबर करतो,देव भले करतो...
एका मताने सरकार पडले पण पुन्हा अटलजी चे सरकार आले अन आज सतत १० वर्ष भाजप चे सरकार आहे.
त्या भाषणाची आठवण आज होते...!
कोणाचे राजकिय मते भिन्न असू शकतात
पण स्व.शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,प्रमोद जी महाजन,स्व.गोपीनाथ मुंडे,स्व.विलासराव देशमुख, स्व.आर आर आबा यांच्या भाषण शैलीला जोड नव्हती..!
प्रमोद कुदळे
(आठवनी च्या हिंदोळ्या वरून)

लालकृष्ण अडवाणी....भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनविण्यात ज्यांचा सिंहा चा वाटा आहे ते कणखर नेतृत्व ओजस्वी लढवय्या...
07/03/2026

लालकृष्ण अडवाणी....
भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनविण्यात ज्यांचा सिंहा चा वाटा आहे ते कणखर नेतृत्व ओजस्वी लढवय्या नेता म्हणून त्यांच्या कडे पाहिल्या जाते.
या नेत्याने आयोध्या राम मंदिर आंदोलना साठी रथ यात्रा काढली होती...
त्यांची एक प्रचार सभा यवतमाळ आझाद मैदानात झाली
तेव्हा त्यांनी एक गंमतीशिर उदाहरण दिले
लालू (प्रसाद यादव)
एकदा विदेशी शिस्टमंडळाच्या सोबत चर्चेला बसले
तेव्हा जापान, अमेरिका म्हणाले तुम्ही पाच वर्षे भारत आम्हाला द्या आम्ही भारताला जापान अमेरिका करून दाखवतो
आपले लालू त्यांना म्हणाले तुमचे देश आमच्या ताब्यात ५ दिवस द्या मी तुमच्या देशाला बिहार करून दाखवतो...
स्व.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची व त्यांची मैत्री घट्ट होती हे सर्वश्रुत आहे. भारत सरकारने त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले.
प्रमोद कुदळे
(आठवणीतील भाषण)

लोकप्रतिनिधीनी आरोग्य सेवेचे प्रशिक्षण घ्यावे...लोकप्रतिनिधी मग तो ग्रामपंचायत सदस्य असो की आमदार खासदार मंत्रीलोकसेवा क...
07/03/2026

लोकप्रतिनिधीनी आरोग्य सेवेचे प्रशिक्षण घ्यावे...
लोकप्रतिनिधी मग तो ग्रामपंचायत सदस्य असो की आमदार खासदार मंत्री
लोकसेवा करण्यासाठी जसे रस्ते नाल्या व मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी कटिबद्ध असतात तसेच अनेक लोकप्रतिनिधी आता आरोग्य सेवेला देखील महत्व देतांना दिसत आहेत ही आनंदाची बाब आहे.
गरीब गरजू अडचणीत असलेल्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन त्यांची मोफत तपासणी त्यांचे वर मोफत उपचार मिळवून देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी आपली स्वतंत्र व्यवस्था निर्माण करतात.
त्यात मतदारसंघात कार्यकर्ते पदाधिकारी आरोग्य सेवक म्हणून महत्वाची भूमिका बजावतात.
मात्र केवळ औचित्य प्रसंगी आरोग्य शिबीर घेऊन आपले कर्तव्य समाप्त झाले असे अजिबात नाही.
कारण आरोग्य शिबिरात तपासणी झाल्या वर रुग्णांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी रुग्णांना रुग्णालयात पाठवणे त्यांची विचारपूस करणे देखभाल व्यवस्था करणे देखील गरजेचे असते.
अशा प्रकारच्या रुग्ण सेवेत माजी मंत्री वंदनीय बच्चू भाऊ कडू यांचे काम मोठे आहे मतदार संघ किंवा जात भेद पंथ कसलीच विचारपूस नाही रुग्णास कितीही मोठी कितीही रकमेची शस्त्रक्रिया करायची असल्यास मुंबई सारख्या ठिकाणी मोफत उपचार मिळवून देण्यासाठी बच्चू भाऊ यांची विशेष यंत्रणा काम करते हे सेवेचे काम एक माणुसकीचा अखंड झरा आहे.प्रताप तायडे व त्यांचे सहकारी हे प्रहार रुग्ण सेवा समिती च्या माध्यमातून काम पाहतात.
अचलपूर विधानसभा मतदारसंघात लोकांना नवी दृष्टी देण्यासाठी नेत्र शिबीर सतत घेत असतात
रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण भरती करण्या पासून त्यांची रहाण्याची भोजनाची अल्पोपहार चहा ची सगळी व्यवस्था कार्यकर्ते जातीने लक्ष देऊन पाहतात.
मी दुसरे जवळून पाहिलेले लोकप्रतिनिधी म्हणजे ना.संजय भाऊ राठोड त्यांनी तर यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णाला मदत मिळावी म्हणून आपली शिवसेनेतील सुरवात आरोग्य सेवा करत यवतमाळ येथिल स्व.वसंतराव नाईक शासकीय जिल्हा रुग्णालया समोर एका झाडा खाली उभे राहून रुग्ण सेवा केली.आज रुग्णवाहिका, शव वाहिका सेवेत आहेत तर रुग्णांना रक्त मिळावे म्हणून रक्तदान शिबिर घेत 'मातोश्री' आरोग्य मंदिर उभारले येथे ३६५ दिवस २४ तास संजय भाऊ राठोड यांची आरोग्य यंत्रणा काम करत असते.
गरीब गरजू रुग्णास मुंबईत सर्व आरोग्य मार्गदर्शन करणारी व्यवस्था त्यांचीही आहे.
तिसरे एक भाजप चे संकट मोचक समजल्या जाणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांचेही मोठे काम आरोग्य सेवेत आहे.
मुंबईत रुग्णास व त्याच्या नातेवाइका ची चांगली भोजन व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी स्वतंत्र किचन निर्माण केले आहे.
राज्यात अनेक लोकप्रतिनिधी आरोग्य सेवा करत असतील त्यांचे पदाधिकारी सेवेत असतील सुद्धा पण शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक आरोग्य सेवा कशी करावी याचे प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे.
केलेल्या आरोग्य सेवेस फळ यावे ही इच्छा व सर्व आरोग्य सेवक जे निस्पृह निस्वार्थ सेवा करतात त्यांना मानाचा मुजरा...!

Address

Chintawar Lay Out Arni
Arni
445103

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bolmaharastra.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bolmaharastra.com:

Share