Marathi Manoranjan

Marathi Manoranjan Marathi Manoranjan

04/07/2025

छत्रपती संभाजीनगर शहरात झाला भयानक अपघात #आपघात #छत्रपति #संभाजिनगर #औरंगाबाद

07/06/2025

भारत मशिनरी सिल्लोड अंधारी

30/01/2025

१० करोड भिड कुंभमेळा #कुंभमेळा #हरिद्वार #वायरलवीडियोシ

17/08/2024

आबेलोहळ येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने तणावपूर्ण शांतता असून वाळूज एमआयडीसी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णकांत शिंदे यांनी परिसरात तिला नागरिक काना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे #कॉलनी

03/08/2024

तिसगाव म्हाडा कॉलनी 2005 साली ग्रामपंचायत तिसगाव अंतर्गत गट नंबर 104 /1 मह्डा निवासी योजना झाली परंतु आजपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा सोसायटीमध्ये हस्तांतरित झाली नाही. त्यामुळे कॉलनीचा विकास होत नव्हता परंतु आज मह्डा कृती समिती अंतर्गत कॉलनीतील 200 ते 300 मोठ्या संख्येने गाळेधारक एकत्र येऊन बहु मताने ग्रामपंचायत तिसगाव मध्ये हस्तांतरित होण्याचा ठराव मंजुर करण्यात आल आहे. बैठक झाल्यानंतर तिसगाव ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी श्री आंधळे साहेब यांना भेटून साहेबांनी एक महिन्यात बैठक घेऊन कायदेशीर हस्तांतर करून घेऊ असे मान्य केले .ग्रामपंचायत पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज लाईन, रस्ते यांची देखभाल व दुरुस्ती करेल त्या बदल्यात कॉलनीतील रहिवासी प्रॉपर्टी टॅक्स भरेल असे ठरले आहे #म्हाडा #कॉलनी

30/07/2024

तिसगाव म्हाडा कॉलनी सिमेंट रस्त्यांचे उदघाटन झाले आहे
आमदार निधीतून चाळीस लक्ष निधि मंजुरी देण्यात आली आमदार संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा ताई संजय शिरसाट यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, याप्रसंगी नगरसेविका वाडेकर ताई, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र कसुरे अंकल, सरपंच शकुंतला तर कसुरे,उपसरपंच प्रवीण हांडे, ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब बुटे, संजय जाधव, कृष्णा गायकवाड, गणेश बिरगंळ, राजेश भैय्या कसुरे, शिवसेना विभाग प्रमुख शिवाजी हिवाळे पाटील, शाखाप्रमुख रावसाहेब कदम, बाबासाहेब गायकवाड, संजय अनपट, मिनीनाथ आम्रित, अशोक काळे, चंद्रशेखर कलशेट्टी, डॉक्टर विष्णू काकडे ,कृष्णा वाघ ,सावळीराम जोगदंड, मीठू घोरपडे ,अजित पाटील ,अजय कासुरे ,अजय जिरे, अधिक साहेब, आणि माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली हिवाळे, कुबेर ताई, अमृत ताई शेलार ताई, गांजुर्डे ताई, कसाने ताई, जयस्वाल भाभी, कुटे ताई , दुर्गा पाटील ताई, धस ताई,तायडे ताई, लिंबारे ताई,मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पब्लिक सिटी न्यूज छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी संदीप शहाणे

28/07/2024

जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्षपदी ऍड. विलास पठारे वडगावकर यांची नियुक्ती... संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र अहिरे, प्रदेश अध्यक्ष श्री यशवंत शिरसाठ, राष्ट्रीय संघटक श्री राम घरत,राष्ट्रीयविधी मार्गदर्शक ॲड. गजानन ठाकरे, राष्ट्रीय सचिव ह.भ.प. वाल्मीक महाराज जाधव, राष्ट्रीय संघटक अर्जुन आदमाने पाटील, ज्येष्ठ उद्योगपती साहेबराव पाथरीकर साहेब यांच्या हस्ते व मा.जि प स अनिल भैय्या चोरडिया, मराठवाडा नेते कैलासजी भोकरे, पोपटरावजी आदिक , काकासाहेब चेळेकर, रामदास शेठ पैठण पगारे, राजूभाऊ पवार, विजुभाऊ जाधव, सतीश हिवाळे यांच्यासह राज्यभरातून आलेल्या मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये समारंभपूर्वक हॉटेल राजयोग एम.आय.डी.सी वाळूज छत्रपती संभाजीनगर येथे प्रदान... #

03/07/2024

ज्याचे खाल्ले मीठ... त्याच्यावरच उलटला.. लक्ष्मी मिल्कच्या मालकावर कामगाराचा साथीदारांसोबत मिळून जीवघेणा हल्ला!!, वाळूज MIDC पुन्हा हादरले....

28/06/2024

ताकीद देऊनही कार न थांबवल्याच्या रागातून तीन वाहतूक पोलिसांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून गाडी ढकलून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वाळज येथील एका चौकात ही घटना घडली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, चौकात इशारा देऊनही वाहन न थांबवल्याने एका तरुण चालकाला तीन पोलिसांनी बेदम मारहाण केली आणि गाडी ढकलून पळवून नेली. छत्रपती संभाजीनगरातील वाळज येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरून पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
वालज इंडस्ट्रियल एरियातील एनआरबी चौकात 26 जून रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास टाटा एस कार चालक थांबला नाही आणि पोलिसांनी धाड टाकली. त्यामुळे तीन पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चालकाची चूक तरुणाची असेल तर पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले पाहिजे होते. मात्र तीन पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. शिवाय वाळज एमआयडीसी पोलिस ठाण्यात या तक्रारीची दखल न घेता तरुणाची गाडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही


26/06/2024

सिडको वाळूज महानगरात १३ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ
वाळूज महानगर - सिडको वाळूज महानगर १ मधील म्हाडा कॉलनी जवळील भारत नगर येथे एका १३ वर्षीय शाळकरी मुलीचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दि २५ जून रोजी सायंकाळ घडली, आज पोलीस अधिकारी यांनी पाहणी केली. अनुष्का पांडुरंग पदमाने वय १३ वर्ष रा भारतनगर तिसगाव, जि छत्रपती संभाजीनगर असे मयत मुलीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार अनुष्काला तिचे वडील पांडुरंग यांनी बेशुद्ध अवस्थेत दि २५ जून रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. परंतु मृत्यू कशाने झाला हे कळू शकले नाही पुढील अहवाल आल्यानंतर मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट होईल. घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्यासह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, प्रवीण पथरकर, कामटे, अंमलदार यशवंत गोबाडे, हनुमंत ठोके, बाळासाहेब आंधळे घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात अली असून नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहे. पब्लिक सिटी न्यूज साठी छत्रपती संभाजी नगर संदीप शहाणे यांचा पेशल रिपोर्ट

Address

Mahada Colony Thsgao
Aurangabad
431136

Telephone

+919511625563

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Manoranjan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi Manoranjan:

Share