शब्द मनातले

शब्द मनातले Incredible, Spiritual, Motivational, Entertaining Videos all in one channel

ज़िंदगी में कई बार ऐसे क्षण आते हैं,जब भीतर से उफनती आग हमें उकसाती है कि हम पलटकर वही वार करें। हर कटु शब्द का उत्तर दे...
30/08/2025

ज़िंदगी में कई बार ऐसे क्षण आते हैं,जब भीतर से उफनती आग हमें उकसाती है कि हम पलटकर वही वार करें। हर कटु शब्द का उत्तर दें, हर अपमानजनक इशारे का प्रत्युत्तर उसी तीखेपन से दें। मन करता है कि जैसे चोट मिली है, वैसी ही चोट लौटाई जाए।

लेकिन फिर मैं ठहर जाती हूँ। मैं चुपचाप देखती हूँ उनकी आँखों के पीछे छिपे खालीपन को, उनके जीवन की उलझनों को,उन संघर्षों को जो वे अपने भीतर ढो रहे होते हैं और उस क्षण समझ में आता है कि दुनिया ने उन्हें पहले ही काफ़ी सज़ाएँ दे रखी हैं। उनके अपने बोझ ही उन्हें तोड़ रहे हैं।

कुछ युद्ध ऐसे होते हैं जिन्हें तलवार या शब्दों से नहीं जीता जाता बल्कि गहन ख़ामोशी से लड़ा जाता है।
क्योंकि मौन कई बार सबसे बड़ा उत्तर होता है।

आख़िरकार हम वही बाँटते हैं जो हमारे भीतर भरा होता है। जिसके मन में द्वेष है, वह द्वेष ही फैलाएगा।
जिसके भीतर पीड़ा है, वही पीड़ा बाँटेगा। पर जिसने अपने भीतर प्रेम, करुणा और शांति संजोई है,वह आहत होने पर भी वही आगे बढ़ाकर देगा।

मैंने तय किया है कि आघात का प्रतिदान आघात से नहीं दूँगी। मैं बदले की आग में खुद को नहीं झोंकूँगी।
मैं आगे बढ़ना चुनूँगी क्योंकि यही मेरे आत्मसम्मान, मेरी शांति और मेरे प्रेम का असली परिचय है।"

©️®️ Vanita Banerjee ❤️

पालकांचा सन्मान 🌸सुरेशराव निवृत्त झालेले. वयामुळे औषधं जास्त होती. एक दिवस ते हॉलमध्ये औषधं मांडून बसले होते. तेवढ्यात स...
27/08/2025

पालकांचा सन्मान 🌸

सुरेशराव निवृत्त झालेले. वयामुळे औषधं जास्त होती. एक दिवस ते हॉलमध्ये औषधं मांडून बसले होते. तेवढ्यात सून, स्वाती चिडून म्हणाली —

"बाबा, हे काय सगळं? हॉलमध्येच औषधाचा पसारा लावलाय! पाहुणा आला तर काय म्हणेल? खोली आहे ना तुमची तिथे बसत जा ?"

अचानक झोपेतून दचकून उठलेले सुरेशराव औषधं गोळा करू लागले. तेवढ्यात मुलगा अमित संतापून म्हणाला —
"स्वाती, कशी बोलतेस बाबांशी अस ? बाबा कुठेही बसले तरी चालेल!"

बापाच्या डोळ्यांत आनंद चमकला. मुलाच्या शब्दांनी थोड्यावेळापूर्वी सुनेने केलेला अपमान विसरला.

नंतर सुरेशरावांच्या पत्नी शारदा देवळावरून आल्या. नवऱ्याच्या चेहऱ्यावर हसू पाहून विचारलं —
"काय झालं? एवढं आनंदात का दिसताय?"
ते हसून म्हणाले —
"पालकांना काय हवं असतं? मुलांचं प्रेम आणि आदर. आज ते मिळालं."

काही दिवसांनी मात्र सत्य समोर आलं. शारदा जेव्हा मुलाच्या दारात गेल्या, तेव्हा अमित आणि स्वाती यांचं बोलणं ऐकून थबकल्या.

अमित म्हणत होता —
"पप्पा इथे असतील तर पेन्शनचे पैसे आपल्याकडे राहतात. वडिलांचा खर्च कितीसा असतो? बाकीचे पैसे आपल्या जीवनासाठी उपयोगी पडतात. मावसभाऊ विनोद सतत गावाला बोलावतो, पण जर बाबा तिकडे गेले तर आपलं ४० हजाराचं नुकसान होईल!"

स्वाती त्याला साथ देत होती —
"हो, ना सगळीकडे नुसते औषधं, नुसता त्रास… माझ्या मैत्रिणी मोकळ्या राहतात. फक्त पैशांसाठी त्यांना इथे ठेवावे लागते,नसते तर केव्हाच गावाला पाठवलं असतं."

हे ऐकून शारदाच्या पायाखालची जमीन सरकली. मुलगा पैशासाठीच त्यांना थांबवत होता!

त्या खोलीत शिरल्या आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या —
"अमित, आता ठरवलंय. बाबांची पेन्शन आम्ही वृद्धाश्रमाला दान करणार आहोत. ज्यांना गरज आहे त्यांना उपयोग होईल."

मुलगा घाबरून म्हणाला —
"आई, हे काय बोलतीये ? इतके पैसे दान करायचे म्हणजे आपल नुकसान आहे!"

शारदा डोळ्यातले पाणी आवरत म्हणाल्या —
"बाळा, तू आमच्यासाठी नाही, पैशांसाठी सहन करतोस हे मी ऐकलं. आम्ही तुला वाढवलं तेव्हा स्वतःच्या इच्छा मारल्या, पैसा पाहिला नाही. आज तुझ्या वागणुकीनं सगळं स्पष्ट झालं."

दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेशराव आणि शारदा गावाला निघाले.
"आता आयुष्य कठीण जाईल, पण अपमान सहन करत राहायचं नाही. उरलेलं आयुष्य सन्मानाने जगायचं."

कार निघाली, मागे उभा राहून अमित रडत राहिला. पण पालकांनी एकदाही मागे वळून पाहिलं नाही.
Cp

संसार सांभाळणं म्हणजे स्वतःला विसरून बाकी सगळ्यांना आठवणं.घरातील प्रत्येकाचा मूड, प्रत्येकाची गरज, प्रत्येकाचं सुख–दुःख ...
23/08/2025

संसार सांभाळणं म्हणजे स्वतःला विसरून बाकी सगळ्यांना आठवणं.
घरातील प्रत्येकाचा मूड, प्रत्येकाची गरज, प्रत्येकाचं सुख–दुःख सगळं ती आपल्या मनाच्या वहीत नोंदवून ठेवते.
पण त्या वहीत एक पान मात्र रिकामं राहतं… कारण तिथे तिच्या स्वतःच्या इच्छा, स्वप्नं, थकवा आणि तक्रारी लिहिलेल्याच नसतात.

आपण म्हणतो पुरुष आणि स्त्री हे संसाराच्या गाडीची दोन चाकं आहेत.
पण अनेकदा ही गाडी चालवताना एक चाक ओझ्याने, जबाबदाऱ्यांनी आणि न संपणाऱ्या अपेक्षांनी थकून जाते…
आणि दुसरं चाक, नकळत का होईना, तिच्या गतीचा विसर पडतं.

स्त्रीला नवऱ्याकडून मिळणारा सर्वात सुंदर दागिना कोणता?
तो हिरे, सोने, मोती नाही…
तो आहे स्वातंत्र्य
मनाचं स्वातंत्र्य, विचाराचं स्वातंत्र्य आणि जगण्याचं स्वातंत्र्य.

स्वातंत्र्य म्हणजे फक्त घराबाहेर नोकरी करण्याची परवानगी नव्हे,
स्वातंत्र्य म्हणजे तिने बोलावं, हसायचं, रडायचं, चुकावं आणि शिकावं तेही अपराधी न वाटता.
स्वातंत्र्य म्हणजे तिच्या मताला घरात वजन असणं.
स्वातंत्र्य म्हणजे ती स्वतःच्या आवडीनिवडींना वेळ देणं आणि त्यासाठी तिला "कुणाला पटवावं" लागू नये.

ज्या स्त्रीकडे हे स्वातंत्र्य असतं,
तिच्याकडे सोनं-चांदी नसतानाही ती श्रीमंत असते.
कारण हिऱ्याच्या खाणींनाही तिच्या मनाच्या उंचीचं मोल नाही.
आणि ज्या घरात पुरुष हा दागिना आपल्या पत्नीला देतो, तिथे प्रेम हे हक्काने जगतं… भीतीने नाही.

पण आजही आपल्या समाजात अनेक ठिकाणी हा दागिना दिला जात नाही
दिलं जातं ते फक्त सुरक्षिततेचं नाव घेऊन नियंत्रण.
स्वातंत्र्याच्या नावाखाली लपवलेली अटी.
"तुला जे हवं ते कर" म्हणत असताना मनात "पण माझ्या म्हणण्याप्रमाणेच" अशी अपेक्षा.

संसार फक्त पोट भरण्याने नाही,
तो मनं भरण्याने चालतो.
आणि स्त्रीचं मन भरायचं असेल, तर तिला हक्काचा मान, विश्वास आणि मोकळा श्वास द्यावा लागेल.
हा दागिना तिला एकदा मिळाला की
ती संसाराची गाडी फक्त चालवणार नाही, तर तिला जीवनाच्या सुंदर रस्त्यांवर घेऊन जा
❤️ प्रेम द्या, साथ द्या! 🍁

"आम्ही दोघं वेगळं राहतो"संध्याकाळची वेळ होती. रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या बागेतील बाकावर एक वृद्ध बसले होते. हातात एक छोटी...
11/08/2025

"आम्ही दोघं वेगळं राहतो"

संध्याकाळची वेळ होती. रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या बागेतील बाकावर एक वृद्ध बसले होते. हातात एक छोटी पिशवी, आत औषधांच्या पट्ट्या आणि काही फळं होती. नजर रस्त्यावर होती, जणू कोणाची वाट पाहत होते.

मी जवळ गेलो आणि विचारलं, "काका, कुणाची वाट पाहताय?"

ते हसले आणि म्हणाले,
"मुलगा यायचं म्हणाला होता, आज पगार झालाय ना त्याचा… औषधं आणून देईन म्हणाला होता. पण फोन करून सांगितलं, 'बाबा, पगारातून EMI, बिलं, आणि बाकी खर्च झालाय… पुढच्या महिन्यात बघू.'
मग मी स्वतःच आलो, थोडं थोडं साठवलेलं होतं."

मी शांत झालो. त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना लपलेल्या होत्या ते स्पष्ट दिसत होतं.

त्यांनी पुढे सांगितलं,
"मोबाईलचा रिचार्ज मीच केला, त्याचे कपडे मीच घेतले, कॉलेजची फी मीच भरली… त्याची प्रत्येक मौजमजा माझ्या खिशातून गेली. पण माझ्यावर खर्च करण्याची वेळ आली, तर त्याला आठवलं — आम्ही दोघं वेगळं राहतो."

त्यांच्या डोळ्यातलं पाणी आणि ओठांवरचं हसू दोन्ही मला घायाळ करून गेलं.
ते निघून गेले… पण मला मात्र असं वाटलं,

"पालकांवर केलेला खर्च कधीच उधारी नसते…
तो तर आपल्या जन्माचा, संगोपनाचा आणि संस्कारांचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न असतो.
पैसे परत करता येतील, पण पालकांची साथ नाही."

सकाळीच तिची लगबग सुरू झाली.मुलांना शाळेत पाठवून ती तयार झाली. पिशवीत काहीतरी कोंबून ती बाहेर पडायला निघालीच की आतून आवाज...
10/08/2025

सकाळीच तिची लगबग सुरू झाली.
मुलांना शाळेत पाठवून ती तयार झाली. पिशवीत काहीतरी कोंबून ती बाहेर पडायला निघालीच की आतून आवाज आला "कुठं मरायला चालली?".
रात्रीची ढोसून पडलेला तिचा नवरा अजूनही खाटेवरच होता.
शेजाऱ्यांसोबत कालच भांडण झाले होते याच्या धिंगाण्यामुळे. मार सुद्धा खाल्ला होता.
आज कामावर जाणार नव्हता तो. हिने सुद्धा आज मालकीणीला सुट्टी मागितली होती. हिने दारातूनच आत डोकावले. "जाऊन येते जरा कामावर, मालकीण ने लवकर यायला सांगितले आज. जेवण तयार करून आहे. सायंकाळी येईल लवकर". तो तसाच ऐकून पुन्हा तंगड्या वर करुन पडला.
ही पिशवी घेऊन निघाली. बस स्टँड वर आली. बस लागली. सुटायला वेळ होती. तेव्हढ्यात बस स्टँड वरील दुकानाकडे तिचे लक्ष गेले.
खोबर्याचे लाडू दिसले. तिने पर्स उघडली. आतील संपत्ती मोजली. पुन्हा विचार केला. बस चे येण्या जाण्याचा खर्च वगळता, 10 रु शिल्लक राहणार होते. आतून समाधान झाले तिचे.
तशीच दुकानात जाऊन तिने 1 लाडू कागदात गुंडाळून पिशिवीत कोंबला. बस सुरू झाली. मागे पडणारे गाव आता तिला अनोळखी वाटू लागले.
रस्ता परिचयाचा होता. मनातील ओढ वाढत चालली होती. धकधक वाढत चालली होती.
फार दिवसांनी तिने तो रस्ता मापला होता. डोळ्यांत पाणी जमा व्हायला लागले की ती पदराने पुसून काढत होती. त्यातच तिला तंद्री लागली.
दोन तास गाढ झोपी गेली.
तेव्हड्यात कानावर आवाज पडला, "बाई, आलं तुमचं गावं".
दचकून उठली आणि खाली उतरली.
धुळीचे लोट उठवत बस निघून गेली. मात्र हिच्या मनातील धूळ आज न्याहून निघाली होती. तो वास तिला परिचयाचा होता. नाक्यावरचे डोळे जणू तिला कशी आहेस हे विचारत होते. ती निघाली.
गावाच्या वेशीपाशी आली पण कुठे जायचे या विचारात पडली.
तिने तसाच मार्ग बदलला. झपझप चालू लागली. शेतीचे बांधे नजरेत पडले. एक एक शेत ओलांडत ती पुढे निघाली. श्वासाची अधीरता वाढतच चालली होती.
एका शेतीजवळ ती येऊन थांबली. एक माणूस विहिरीची मोट धरून होता. अंगाची काडी झालेला होता तो. ती त्याच्याकडे बघतच राहिली.
हळूहळू चालत ती मागे येऊन उभी राहिली. "दादा" एवढेच शब्द फुटले.
त्याने वळून बघितले. डोळे पाणावले. अनेक वर्षांनी बहीण आलेली. काय बोलू काय नको असे झाले दोघ्यांना. पण सध्या फक्त बघतच राहिले.
"चल घराकडे तिकडेच बोलूया" तो पुटपुटला.
"नको दादा. घाईने आलोय. सायंकाळ पर्यन्त घरी पोहोचायला हवे. मुलं येईल शाळेतून. म्हणुन सरळ इकडे आले".
"बर, बस इथेच. बाकी येणे कसे झाले?".

तिने पिशवीत हात टाकून एक पाकीट काढले. ते उघडून लाल धाग्याची एक राखी बाहेर काढली.

"अरेच्या, आज राखी होय"

गेली अनेक वर्षे हा सणच विसरायला झाला होता. आई वडील गेले. मागे कर्जाचे डोंगर. त्यात हाती असलेली शेती विकावी लागली. त्यातही बहिणीच्या नवऱ्याने मागितलेला हिस्सा, आपल्या बायकोने घातलेला धिंगाणा. यात कुणाच्याच हाती काही लागले नाही. ताटातूट मात्र झाली. कर्ज फेडून शिल्लक एवढी सुद्धा उरली नाही की वाटणी करून दोघांचे समाधान होईल. त्यानंतर आज दोघे एकमेकांना बघत होते.
त्याने हात पुढे केला. तिने राखी बांधली. आरतीचे ताट नव्हते मात्र तिच्या भरल्या डोळ्यांनी भावाचे औक्षण होत होते. बस स्टँड वरील दुकानातून आणलेला भावाच्या आवडीचा खोबर्याचा लाडू तिने भरवला. त्याचे सुद्धा डोळे भरून आले नवे जुने सर्व बाहेर पडले. सुख दुःखांच्या गप्पा रंगात आल्या. आज दोघेही लहान झाले होते. तुटलेली नाळ पुन्हा जुडली होती. दुपार उलटून गेली होती.
तिने विहिरीवर जाऊन चेहऱ्यावर पाणी मारले. अनेक दिवसांपासून मनावर साचलेली धूळ धुवून निघाली होती.
पदराने चेहरा पुसतच ती म्हणाली "येतो दादा आता, बस मिळाली की सायंकाळआधी घरी असणार".

राहून जा आज असे त्याला म्हणायचे होते. पण त्याला माहित होते. ही घरी येणार नाही आणि परत गेली नाही तर हिचा नवरा धिंगाणा घालणार.

"बर, सांभाळून जा"

"नमस्कार करतो" म्हणत तिने त्याच्या पायाला हात लावले.
तिला वर उचलताना त्याची नजर तिच्या फाटल्या ब्लाउजमधून डोकावणाऱ्या तिच्या पाठीकडे गेली.
तिला ते कळले, तसेच तिने लगबगीने ते दारिद्र्य झाकण्याचा प्रयत्न केला.
त्याचे डोळे डबडबले. तिने मान खाली टाकली. भरून आलेले डोळे भाऊ बघू नये म्हणून तशीच चालायला निघाली.
हा मात्र स्तब्ध उभा होता. तिच्या पाठमोऱ्या देहाचे दूर जाण्याचे ते क्षण त्याला असह्य होत होते.
थोडे दूर जाताच तीने मागे वळून बघितले.
त्याचे डोळे भरून आले होते.
दोन्ही हात त्याने पायजमाच्या दोन्ही खिशात घातले.
तसेच रिकामे खिशे बहिणीला दाखवले.
ती हसली आणि तशीच पुढे चालायला लागली. त्याला तिचे हसणे कळलेच नाही.
ती नाक्यावर आली.
बस मध्ये बसली. बस चालायला लागली. तिच्या नेहमीच्या जीवनाकडे तिचा पुन्हा प्रवास सुरु झाला.
बस मध्ये शेजारची बाई सुद्धा माहेरी जाऊन येत होती.
"काय ग, भावाने काय दिले राखीला?"

ती फक्त हसली.

आज तिला तिचा भाऊ परत भेटला होता.

सून म्हणाली, "आई, मी राखी आणायला बाजारात जातीये."सासू म्हणाली, "तुझ्याकडे पैसे आहेत ना?"सूनेने मुठीत घट्ट पकडलेले पैसे स...
10/08/2025

सून म्हणाली, "आई, मी राखी आणायला बाजारात जातीये."
सासू म्हणाली, "तुझ्याकडे पैसे आहेत ना?"
सूनेने मुठीत घट्ट पकडलेले पैसे सासूला दाखवले. सासूने ते पैसे हातात घेतले, चुरगळलेल्या नोटा मोजल्या – एकूण तीनशे चाळीस रुपये होते.

सासू म्हणाली, "पाच भावांसाठी राखी घेणार आहेस? एवढ्या पैशांत पाच राख्याही येणार नाहीत. त्यात मिठाई आणि नारळही आणायचे आहेत. सुरेशकडून अजून पैसे मागशील का?"

सून उदास आवाजात म्हणाली, "पाच दिवसांपासून पाऊस पडतोय, कामाला गेले नाहीत ते. घरीच बसलेत. जेवढे पैसे होते ते सगळे त्यांनी मला दिले."

सासू म्हणाली, "उदास का होतेस गं मुली, मी आहे ना." मग सासूने आपली सगळी बचत काढली. मोजली – एकूण नऊशे रुपये होते. ते सारे सुनेला देत म्हणाली, "मी तुझ्या आईसारखीच आहे. त्रास लपवू नको, सांगत जा."

सून सासूच्या कुशीत शिरून रडू लागली आणि म्हणाली, "तुम्ही फक्त आईच राहा. या प्रेमाच्या जोरावर मी सगळे त्रास सहन करेन आई."

अशा सासूचे म्हातारपण खूप सुखात जातं, कारण जी सून मुलगी बनते, ती आईला कधीच दुःखात पाहू शकत नाही.✍️💯❤️

@ज्योति निंबाळकर

#प्रेमाच्यागोष्टी #आईबाबा #नातेसंबंध

मायेची छायाप्रेमळ कायासर्वांची लाडकीबहिण माझी..........निर्मळ मनाचीसुंदर स्वभावाचीआपुलकीने वागतेबहिण माझी.........आई-बाब...
08/08/2025

मायेची छाया
प्रेमळ काया
सर्वांची लाडकी
बहिण माझी..........
निर्मळ मनाची
सुंदर स्वभावाची
आपुलकीने वागते
बहिण माझी.........
आई-बाबांची काळजी
भावंडांची चिंता
मनी धरून जगते
बहिण माझी.........
सर्वांची लाडकी
आनंदी सावली
माझ्या हृदयी राहिली
बहिण माझी................
राखी पौर्णिमेच्या हार्दिक
शुभेच्छा..!!

"लोकांत आणि एकांत ह्यांचा समतोल म्हणजेच आयुष्य.."माणूस एक सामाजिक प्राणी आहे असं शाळेत शिकवतात, पण तो एकांतप्रियही असतो ...
06/08/2025

"लोकांत आणि एकांत ह्यांचा समतोल म्हणजेच आयुष्य.."

माणूस एक सामाजिक प्राणी आहे असं शाळेत शिकवतात, पण तो एकांतप्रियही असतो हे आयुष्य शिकवतं. आयुष्य म्हणजे सतत चालणारी द्वंद्वयात्रा — कधी माणसांत राहण्याची गरज, तर कधी स्वतःत हरवण्याची ओढ.

लोकांत असण्याचं महत्त्व आपण सगळेच ओळखतो. माणसं, संवाद, सहवास, हास्यविनोद, साजरेपणा, मदत, आधार — या साऱ्या गोष्टी समाजात राहूनच मिळतात. समाज आपल्याला ओळख देतो, अस्तित्वाला किंमत देतो.
माणसांत रमणं म्हणजे अनुभव समृद्ध करणं. प्रत्येकाशी संवाद साधताना आपण कितीतरी गोष्टी शिकतो. भावनिक उब मिळते, नात्यांचं जाळं घट्ट होतं, आणि आयुष्य भरतं, फुलतं.

पण...

एकांत सुद्धा तेवढाच आवश्यक आहे. कारण माणूस जेव्हा लोकांत हरवतो, तेव्हा तो स्वतःला विसरतो. आणि म्हणूनच, वेळोवेळी स्वतःशी संवाद साधणं महत्त्वाचं असतं. एकांत म्हणजे आत्मपरीक्षणाचं दार.
तो क्षण असतो जेव्हा आपण आपली खरी ओळख पाहतो. कोण होतो, कोण झालोय, आणि कुठे जायचंय हे कळतं. एकांतात मिळते खरी शांती, खरी बैठक आपल्या मनाशी.

समस्या तिथेच निर्माण होते जिथे आपण या दोघांपैकी एकाचा अतिरेक करतो.
फार लोकांत रमलो, तर थकल्यासारखं वाटतं. खोट्या गोंधळात स्वतः हरवून बसतो.
फार एकांतात गेलो, तर एकटेपणा कुरतडू लागतो. मन निरस होतं.

म्हणूनच, यांच्यातला समतोल म्हणजेच खरं आयुष्य.

सकाळी माणसांत राहावं — काम, जबाबदाऱ्या, नाती आणि कर्तव्यं निभावावीत.

संध्याकाळी स्वतःसाठी वेळ द्यावा — एक कप चहा, शांत संगीत, आठवणींच्या गल्लीत फिरकावं.

उत्सव साजरे करावेत, पण दर दिवशी थाट नको.

नात्यांना वेळ द्यावा, पण स्वतःलाही विसरू नये.

हा समतोल ज्याने साधला, त्याने आयुष्याचा गोडवा खरा अनुभवला. कारण बाहेरचं जग आपल्याला अनुभव देतं, आणि अंतःकरणातलं जग आपल्याला अर्थ देतं.

---

शेवटी, आयुष्य म्हणजे बाहेरच्या गर्दीत हरवलेली ओळख, आणि एकांतात सापडलेलं अस्तित्व…!
🍂🍃❤️

कधी तरी आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं की परिस्थिती खूप कठीण आहे आणि आपल्याला ते पेलवणं अशक्य आहे. पण जेव...
03/08/2025

कधी तरी आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं की परिस्थिती खूप कठीण आहे आणि आपल्याला ते पेलवणं अशक्य आहे. पण जेव्हा आपल्याला त्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याची इच्छाशक्ती असते, तेव्हा आपल्या आतल्या सामर्थ्याची जाणीव होऊ लागते. काही दिवसांनी, जेव्हा सर्व काही पार करून पुढे जातो, तेव्हा आपण स्वतःला म्हणतो, "हे खूप कठीण होतं, पण मी करून दाखवलं." अशा क्षणात मिळालेल्या आत्मविश्वासामुळे आयुष्य कधीही जिंकता येतं...✍️

आजकालच्या नालायक मुलांवर उपाय..आता ५० वर्षांवरील पिढीने खूप शहाणपण दाखवण्याची गरज आहे. असे प्रसंग आज जवळपास प्रत्येक दुस...
03/08/2025

आजकालच्या नालायक मुलांवर उपाय..
आता ५० वर्षांवरील पिढीने खूप शहाणपण दाखवण्याची गरज आहे. असे प्रसंग आज जवळपास प्रत्येक दुसऱ्या घरात पाहायला मिळतात.

एक खरी घटना सांगते. कृपया पूर्ण वाचा आणि इतर ज्येष्ठांना नक्की शेअर करा.

माझ्या एका मित्राचे आई-वडील फारच शांत आणि संयमी स्वभावाचे होते. तो मित्र त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे लग्न झाले होते आणि दोन मुलेही होती. अचानक त्याच्या आईचे निधन झाले.

एक दिवस तो मित्र आपल्या वडिलांना म्हणतो,
"पप्पा, तुम्ही गॅरेजमध्ये शिफ्ट व्हा, कारण तुमच्यामुळे तुमच्या सुनेला अडचण होतीये. आई गेल्यावर सगळं घरकाम तिलाच करावं लागतं. तुमच्या समोर तिला साडी नेसून काम करायला अवघड जातं."

वडील काहीही न बोलता गॅरेजमध्ये राहायला जातात.

सुमारे पंधरा दिवसांनी त्यांनी आपल्या मुलाला बोलावलं आणि त्याच्या कुटुंबासाठी दहा दिवसांचा विदेश दौऱ्याचा पास दिला. म्हणाले,
"जा बेटा, सगळ्यांना फिरवून आण. सर्वांचं मन हलकं होईल."

मुलगा व कुटुंब विदेशात गेले. त्यांच्या गैरहजेरीत वडिलांनी सहा कोटींचा बंगला त्वरित तीन कोटींना विकला. स्वतःसाठी एका चांगल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला आणि मुलाचं सामान एका वेगळ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट करून त्या घराचं एक वर्षाचं भाडं भरून टाकलं.

मुलगा परत आल्यानंतर त्याला घरात एक वेगळाच माणूस बसलेला दिसतो. तो विचारतो,
"हे घर कुणाचं आहे?"
तो म्हणतो,
"हे घर आता विकलं गेलं आहे."

मुलगा वडिलांना फोन करतो, पण नंबर बंद येतो. तो नवीन घरमालक विचारतो,
"का हो, जुन्या मालकांना फोन करताय का?"
नवीन घर मालक आपला फोन मुलाला देतो आणि त्याच्या वडिलांचा नवीन नंबर लावतो.

फोनवर वडील म्हणतात,
"थांब, येतोच."

थोड्याच वेळात ते कारमधून येतात. मुलाला त्या दुसऱ्या फ्लॅटची चावी देतात आणि म्हणतात,
"ही तुझ्या फ्लॅटची चावी. एक वर्षाचं भाडं भरलेलं आहे. तुझी इच्छा असेल तर पत्नीला ठेव, नाहीतर बघ."

आणि वडील तिथून निघून जातात… मुलगा पाहतच राहतो.

म्हणूनच आता वृद्धांनी आपल्या अशा नालायक मुलांना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे "आम्ही तुमच्यासोबत राहत नाही. तुम्हाला आमच्यासोबत राहायचं असेल तर राहा, नाहीतर स्वतःची व्यवस्था स्वतः करा."✍️🙏

@ज्योति निंबाळकर

#मराठीकथा

कुठून आणायची मम्मी?🪷सासूबाईंना एकटे ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती म्हणून सुमेधानी नोकरी सोडून दिली. कायम व्यस्त असण्याची...
31/07/2025

कुठून आणायची मम्मी?🪷

सासूबाईंना एकटे ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती म्हणून सुमेधानी नोकरी सोडून दिली. कायम व्यस्त असण्याची सवय असल्याने घरात वेळ जाईना.मग बिल्डिंग मधील मुलांना स्तोत्र शिकवायला सुरुवात केली. त्यातून संस्कार वर्ग सुरू झाले.कधी कोणी संस्कृत मधील अडचणी विचारायला येऊ लागले.मग काही मुलांच्या आया ,काकू पहिली ,दुसरीतच आहे तुम्हीच बघाना शिकवून सगळे विषय दुसरीकडे नकोच पाठवायला असे म्हणू लागल्या.
होता होता पहिली ते चौथी पर्यंत शिकवण्या सुरू झाल्या. साधारण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ती मोकळी होई.छोट्या मुलांचे ते जग तिला फार आवडायचे. त्यांच्या शाळेतील गमती जमती,छोटीमोठी भांडणे ,त्यांच्या आयांच तक्रार सांगणं तिला परत तिच्या मुलाचे ईशानचे बालपण आठवून देई.
बघता बघता ईशान शिकून नोकरीला पण लागला. संध्याकाळी तो आणि त्याचे बाबा परत येई पर्यंत काही मुल कधी कधी काही होमवर्क केलं नाही म्हणून किंवा काही परीक्षा असेल तर थांबून असायची.दादा आला की मस्ती करायचा त्यांच्या बरोबर कधी चॉकलेट द्यायचा कधी गणित सोडवायचे शॉर्टकट सांगायचा त्यामुळे दादा फार लाडका असायचा.
एकदा संध्याकाळी एक आजोबा आजी आणि त्यांचा तीन वर्षाचा नातू असे शिकवणीची चौकशी करायला आले होते. आजोबा आणि आजी एकूण कपडे ,बोलण्याची पद्धत बघता गावाकडचे असावेत वाटलं नातवाचे नाव यश होते. थोडा भेदरलेला सावळा पण तरतरीत सरळ नाकाचा मोठ्या मोठ्या बोलक्या डोळ्यांचा यश आजी आजोबा यांच्यामध्ये त्यांचा एकेक हात घट्ट धरून बसला होता.
ज्युनियर केजी मध्ये होता .मोठ्या नामवंत शाळेत घातलं होत .पण तो रुळत नाहीये. काही येत नाहीये त्याला. शाळेत शिक्षकांशी काहीच बोलत नाही, ऐकत नाही. आजोबा सांगत होते. आजी शांतपणे त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती.यश मोठ्या मोठ्या डोळ्यांनी सगळी कडे भिरभिर पाहत होता.
“काका फारच छोटा आहे हो हा. आणि फक्त आठच मुलं एका वेळी घेऊ शकते,जागाही नाही , सगळ्यांकडे नीट लक्ष पण देता येत नाही मुलं खूप असली तर.मला नाही जमणार पण मी सांगते तुम्हाला दुसरं कुणी असेल तर.” सुमेधानी त्यांचा फोन नंबर घेतला.
यशला काही खाऊ दिला आणि त्याच्या गालावरून हात फिरवला. थोडे नाराज होऊनच आजी आजोबा उठले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कामे आवरली आणि सासूबाईंना चहा नाश्ता देऊन मुलांच्या वह्या तपासायला बसली तेव्हढ्यात बेल वाजली . दार उघडलं तर परत दारात आजोबा.
येऊ का म्हणत आत आले.
म्हणाले ,” यशला शाळेत सोडून तुमच्या कडे लगेच आलो.तुम्हाला तुमच्या कामात अडथळा आणला का ? माफ करा ताई.आम्ही तन्मयच्या शेजारी राहतो त्यांनी तुमचं नाव सुचवलं म्हणून आलो, काल तुम्हाला भेटल्यावर ही पण म्हणाली मॅडमना परत विचारू, नकोच दुसरी कडे पाठवायला. म्हणून सकाळी तुम्हाला त्रास द्यायला परत आलो.

“काका अहो लहान वर्गाचा अभ्यास इतका काही कठीण नसतो, त्याची आई अर्धा एक तास वेळ काढू शकली तरी होईल. “सुमेधा वही तपासता तपासता म्हणाली.
अर्धा एक मिनिट काही उत्तर आले नाही तर तिनी मान वर करून बघितलं तर आजोबांचे डोळे भरून आले होते, मोठ्या प्रयासाने ते हुंदका आवरत होते.
“काल त्या लेकरा समोर काही जास्तीच सांगता येईना झालं ताई, आमची सूनबाई ,यश सहा महिन्याचा असतानाच गेली. मेलेल माणूस गुणाच म्हणायचं म्हणून नाहीं हो चांगुलपणा सांगत ,फार जीव लावणारी होती पोरगी.एव्हढी शिकलेली डॉक्टर पण कधी उलट उत्तर दिलं नाही की आमच्या गावाकडच्या बोलण्याला राहण्यासरण्याला कधी नाक मुरडली नाहीत प्रेमविवाह होता दोघांचा ती गेली आणि पोरगं पण पार कोसळून गेलं होत.याच्या कडे बघत सावरलं माझ्या लेकानी स्वतःला . संध्याकाळी,रात्री दवाखान्यातून आला की पूर्णवेळ यश ला देतो, खेळतो ,त्याचा अभ्यास घेतो. आम्ही असतो आजूबाजूला पण तो आला की संध्याकाळी त्या दोघांचीच एक दुनिया बनते. यश कुठे खेळायला जात नाही, तो नर्सरी मध्ये पण नाही गेला आता या शाळेत घातलं त्याला पण तो तिथेही मुलांमध्ये मिसळत नाही. इथे तुमच्या कडे त्याच्या ओळखीची मुलं येतात , त्यांच्यात राहील तर थोडा खुलेल, बाकी मुलासारखा खेळेल ,भांडेल, रडेल,हट्ट करेल .प्लीज नाही म्हणू नका हो.”

सुमेधाला नाही म्हणताच आल नाही, बावरून आजी आजोबांना घट्ट धरून बसलेलं ते मोठ्या डोळ्यांच कोकरू तिला आठवलं. म्हणाली.,.
“पाठवा काका आज पासून येऊ दे त्याला,” सुमेधा म्हणाली. “थोड उशिरा पाठवा म्हणजे बाकीच्यांच्या अभ्यासात थोड लक्ष घालून झालं की याला बघता येईल.”

संध्याकाळी यश आला.काही दिवस बावरल्या सारखा झाला पण मग खुलू लागला. सुरुवातीला खूप सावकाश लिहायचा त्यामुळे जास्त वेळ थांबायचा. तो पर्यंत ईशान यायची वेळ होत असे .ईशान कामावरून आला की त्याच्या बरोबर यालाही काही च्याऊ म्याऊ खायला दिलं की आधी नाही म्हणायचा . ईशान दादा ये रे यशू म्हणाला की मग यायचा. सुमेधानी इशू आणि यशु अशी हाक मारली की यश खुदूखुदु हसायचा. सारखी कार्टून बघणं आणि शाळेत हिंदी बोलणारे असल्यामुळे बहुतेकदा हिंदीतच बोलायचा. शाळेत कोणाच्या वाढदिवसाला मिळालेला खाऊ, चॉकलेट सुमेधासाठी ईशान साठी सांभाळून आणायचा.कधी फुल कधी शाळेत शिकवेलल क्राफ्ट घेऊन यायचा. उशिरा आला तरी बाकीच्यांना बाजूला करून त्याचाच अधिकार असल्या सारखा सुमेधाला चिकटून बसायचा. काही चुकलं आणि समजावून सागितलं की ऐकायचा. होता होईतो याला खूप समजून घ्यायचं आईची जागा कोणी घेऊ शकत नाही पण आपल्याला जितकी जमेल तितकी माया या लेकराला द्यायची ही खूण गाठ सूमेधच्या मनात पक्की झाली होती.

एकेकदा आजी न्यायला आली तरी निघायचे नावच नाही घ्यायचा.तू अभी जा मैं बैठ रहा हुं म्हणायचा.
कधी ईशान च तिच्याशी वाद घालणं, लाड करून घेणं, हसणं त्यांच्या गप्पा ऐकणं त्याला खूप आवडायचं.तोही तसाच मिसळून जायचा. अगदी संध्याकाळी दिवेलागणीला देवां समोरची नैवेद्याची छोटी दूध साखरेची वाटी त्याचीच असायची

तिला विचारायचा
“भैया भी पढाई नहीं करते थे तो आप उसे भी मारती थी क्या? उनको भी पानिशमेंट मिलती थी क्या?”

मग ईशान सांगायचा ,”मुझे तो स्टंप से मारती थी’

“सच्ची क्या भैय्या”? हा मोठे डोळे अजूनच मोठे करत विचाराचा .
हा रे, अस ईशान म्हणाल्यावर दोघेही खळखळून हसायचे.
मैं तो पढता हुं हैं ना? अस म्हणून कौतुक करून घ्यायचा

त्याच्या अस रेंगाळण्याची ईशान ,त्याचे बाबा ,सासूबाई सगळ्यांनाच सवय होऊ लागली होती. यालाही ईशान ला कधी उशीर झाला की बेचैन वाटायचे मग गॅलरीत आत बाहेर सुरू व्ह्यायच.कंटाळून शेवटी घरी जायचा. चार दिवस सुट्टी झाली कधी तर आल्या आल्या धावत येऊन सूमेधाच्या गळ्यात पडायचा. चार दिवसातली सगळी मजा ,गाऱ्हाणी तिला सांगायची असायची ना? मग अश्या दिवशी अभ्यासाची सुट्टी.

एखाद्या दिवशी त्याचे बाबा सोडायला यायचे तेव्हा मनापासून आभार मानायचे. म्हणायचे,” मॅडम कसे उपकार फेडू तुमचे !!!आम्हाला कळतच नव्हतं याला कस सांभाळायचं?
त्याला काही कळत नव्हतं तेव्हा ती गेली. त्याला तर तिचा चेहरा फोटोत आहे तोच माहिती आहे. सुरुवातीला थोडा खेळायला जात असे पण परत घरी येऊन चुपचाप बसे. होम ट्युशन लावून बघितली, डे केअर ला ठेऊन बघितलं कुठे कुणाकडून इतक्या अजाण वयात दुखावला होता का काय झालं होत कळलच नाही.”
सुमेधा विचारात पडायची की आपण तर फक्त थोडी माया लावली
आपण अस काय इतकं केलं सुमेधाला खरचं कळायचं नाही.

कधी आजी पण गप्पा मारायच्या .कधी सुनेच्या आठवणी सांगायच्या.कधी म्हणायच्या ,आम्ही किती दिवस पुरणार काही तरी बघायला नको काहो ?मुलगा ऐकतच नाही दुसरं लग्न करायला. तो म्हणतो लग्न प्रेम हा विषय माझ्यासाठी संपलाय .आता जे आयुष्य आहे ते यश साठी. तो मोठा झालं की मी सुटलो…अस असत का हो? या लेकराच काय होणार? आणि हा मोठा झाला की बाहेर पडला घरातून की त्याचा बाबा एकटा नाही का पडणार? याला आई मिळेल, आईच प्रेम मिळेल , घराला आधार होईल. या वर्षी मी ऐकणार नाही. त्याची ताई आली दिवाळीला की तिला विषय काढायला लावते.”

दिवस असेच जात होते. दिवाळीच्या सुट्ट्या झाल्या.
शिकवणी सुरू झाली.
यश परत थोडा गप्प गप्प वाटत होतं.नेमका ईशान ऑफिसच्या कामासाठी बाहेर गावी गेला होता . यश नी एक दिवस वाट बघितली, दुसऱ्या दिवशी बधितली.

"काssकू ईशान भैया कभी आयेंगे?"यश विचारत होता.

सुमेधा म्हणाली काम के लिये गये है ना भैय्या आ जायेंगे एक दो दिन मे.
परत दुसऱ्या दिवशी तेच काही अभ्यास नाही काही नाही यश तेव्हढच डोक्यात घेऊन बसलेला भैया कब आयेंगा?

आता मात्र सुमेधा म्हणाली ,” आज येणार आहे येईल इतक्यात उद्या टेस्ट आहे अभ्यास करणार आहेस का आणू तुझ्यासाठी पण स्टंप?”

सुमेधाचा आवाजातला कडक पणा पहिल्यांदाच अनुभवलेला यश थोडा मागे आला
पण तरीही, बताओ ना कब आ जाएंगे?

डबडबलेले डोळे आणि व्याकूळ चेहरा. सुमेधानी पटकन जवळ ओढल त्याला. त्याचे भरू आलेले डोळे पुसले . विचारलं
क्यू चाहिए भैय्या? क्या काम हैं?

बताऊ?? फिर डाटोंगे नहीं?

नाही, बोल रे पटपट आणि आपण अभ्यासाला बसू.सुमेधा म्हणली .

भैया को पूछना था? एक बात हैं! …यश

क्या?क्या बात पूछना हैं?

आपको कहासे लाये भैया? ये पुछना था, आजीआजोबा बोल रहे है की मेरे लिये मम्मी लायेंगे. जहासे आपको ले आये भैया, मेरे को भी वहासे ही से लानी हैं मम्मी!
बताओ ना…

दार उघडून आत आलेला ईशान आणि सुमेधा दोघांचेही डोळे पाणावले होते. आणि सुमेधाच ते निरागस कोकरू दोघांकडे आळीपाळीने बघत होत…..

सौ. आसावरी प्रदीप बहिरट
चिंचवड पुणे

" स्वतःसाठी लढणारा माणूसच खरी दुनिया जिंकतो. " जगाच्या गर्दीत, हजारो चेहऱ्यांच्या कोलाहलात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी ल...
31/07/2025

" स्वतःसाठी लढणारा माणूसच खरी दुनिया जिंकतो. "

जगाच्या गर्दीत, हजारो चेहऱ्यांच्या कोलाहलात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते..आपल्या अस्तित्वाची किंमत दुसरा कोणी ठरवत नाही,तर ती आपण ठरवतो, ती आपण घडवतो, आणि हो ती आपण लढून कमावतो.

“स्वतःसाठी लढणारा माणूसच खरी दुनिया जिंकतो”
हे वाक्य ऐकताना साधं वाटेल, पण यामागे काळाचा गहिरा अनुभव आणि संघर्षाची सगळी कहाणी दडलेली आहे.

लढाईची सुरुवात आतूनच होते..

लढाई नेहमी तलवारीने होत नाही; कधी ती मनाच्या किल्ल्यात उभी राहते. कुणीतरी साथ देईल, हात धरून पुढे नेईल..हा भ्रम आहे.
खरं पाहता आयुष्यातली सर्वात मोठी लढाई हीं आपल्या स्वतःच्या कमकुवतपणाशी, भीतीशी आणि आळशीपणाशी असते.

असहाय्यतेच्या वाळवंटात,आपणच स्वतःसाठी झऱ्यासारखे वाहायला शिकतो. आपल्या स्वप्नांचा, आपल्याच हातांनी बांधलेला पूल आपल्याला वादळातून बाहेर काढतो.

लोकांनी नाही तर स्वतःने आपल्याला परिभाषित करावं..

जगाचं एक नियम आहे – तुझ्या यशाआधी कोणीच तुला गंभीरपणे घेत नाही. तुझ्या अपयशाला तर सगळे हसतात.त्याचसाठी जर तू स्वतःच्या किमतीवर विश्वास ठेवायला शिकलास, तर बाकीचं जग नकळत तुला मानायला लागतं.

लोकांनी टाकलेली टीका, टोमणे आणि निरुत्साही शब्द हे सगळं वाऱ्यासारखं असतं. त्या वाऱ्याचा उपयोग तू पतंग उडवायला करू शकतोस, किंवा त्या वाऱ्याने उडून जाऊन कोसळू शकतोस –
निवड तुझी..!

आव्हानं – हीच खरी शाळा..

आयुष्याचा मार्ग गुळगुळीत नसतो. तो काट्यांनी, खाचखळग्यांनी भरलेला असतो. कधी अपयश पाय अडवतो, कधी परिस्थिती छातीवर दगड ठेवते...पण या सगळ्याच्या पलीकडे आव्हानांचं स्वागत करणं हेच मोठेपणाचं चिन्ह आहे.

सिंह कधीही सहज शिकार करत नाही,.तो धावताना स्वतःच्या ताकदीची कमाल गाठतो..तसंच, जो माणूस संयमाने लढायला शिकतो, त्याचं प्रत्येक पाऊल जिंकण्याकडे जातं.

स्वतःसाठी लढणं म्हणजे स्वार्थी होणं नाही..

काही लोकांना वाटतं, "स्वतःसाठी लढणं म्हणजे फक्त स्वतःपुरतं विचार करणं." पण खरा अर्थ यापेक्षा खूप मोठा आहे.

स्वतःसाठी लढणं म्हणजे –.आपल्या स्वप्नांसाठी धावणं,.आपल्या जबाबदाऱ्यांना निभावणं, आणि स्वतःला इतकं सक्षम करणं
की नंतर आपण इतरांना हात द्यावा.

जो स्वतः उभा राहतो, तोच इतरांसाठी आधारस्तंभ होऊ शकतो.

धैर्य हीच खरी ताकद..

युद्ध जिंकायला तलवार लागत नाही, धैर्य लागतं. आणि हे धैर्य म्हणजे – अंधारातही आशेचा दिवा घेऊन चालण्याची ताकद.

कधी परिस्थिती अशी येते.की चारही बाजूने अंधार असतो.
त्यावेळी जो माणूस स्वतःसाठी उभा राहतो, त्याचं मन किल्ल्याप्रमाणे अभेद्य होतं. त्याच्या डोळ्यातील ज्योत इतरांसाठी मार्गदर्शक ठरते.

विजयाचं रहस्य – आत्मविश्वास

जगातली सर्वात मोठी जित...ही सोनं-चांदी मिळवणं नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवणं आहे.

"मी हे करू शकतो"
हा विचारच लढाईत तलवारीसारखा असतो. आणि ही तलवार तू जेव्हा हाती धरतोस, तेव्हा कोणतंही अडथळं पर्वतासारखं राहात नाही.

इतिहास साक्ष आहे...

इतिहासाची सुवर्णपाने पलटून पाहा...

सह्याद्रीच्या कडेकपारीतून सिंह गर्जला – छत्रपती शिवाजी महाराज..!
फक्त एका चादरीत, अहिंसेच्या अस्त्राने साम्राज्याला गुडघे
टेकवणारा महात्मा गांधी..!

आणि किनाऱ्यावरच्या छोट्याशा गावातून ज्ञानाच्या पंखांनी आकाश जिंकणारा – डॉ. अब्दुल कलाम!

त्यांच्याकडे सुरुवातीला कोणी साथ नव्हती, पण एक गोष्ट होती – स्वतःसाठी लढण्याची हिंमत...

हिंमत असेल तरच क्रांती घडते; बाकी फक्त तक्रारी केल्या जातात.

लढण्याची कला शिका..

मग आज स्वतःला एक प्रश्न विचारां..
तू कोणासाठी लढतोस? इतरांना खूश करण्यासाठी?
की स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी?

तू जर स्वतःच्या स्वप्नांसाठी, स्वतःच्या प्रामाणिक मेहनतीसाठी लढायला लागलास, तर ही दुनिया तुला थांबवू शकत नाही.

पाण्याचा थेंब जेव्हा खडकाला छेदतो, तेव्हा तो बळाने नाही तर सातत्याने छेदतो. तसंच स्वतःसाठी लढणारा माणूस सातत्याने जिंकत राहतो.

आयुष्य आपल्याला नेहमीच एक निवड देते – किंवा हार मान, किंवा लढ.

लोक काय म्हणतील, परिस्थिती कशी आहे, याचा विचार करत बसलास तर जग तुला विसरून जाईल. पण एकदा तरी मनापासून स्वतःच्या अस्तित्वासाठी उभा राहून बघ, तुझं आयुष्यचं एक वेगळं रूप घेईल.

मग लक्षात ठेव..✍️

"स्वतःसाठी लढणारा माणूसच खरी दुनिया जिंकतो."
हे फक्त वाक्य नाही, ही एक जीवनशैली आहे,
एक युद्धघोष आहे, आणि खऱ्या अर्थाने जगण्याची कला आहे.

धन्यवाद मित्रांनो..!

लेख आवडला असेल, तर आपल्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा.

सकारात्मक विचार शेअर करणे हीच मानसिक आणि सामाजिक शक्ती वाढवण्याची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आपण प्रेरणादायक विचार इतरांसोबत वाटतो, तेव्हा ती ऊर्जा द्विगुणित होते आणि आपले जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध बनते. त्यामुळे, चांगल्या गोष्टी शेअर करत राहा आणि एकमेकांना पुढे जाण्यास प्रेरित करा मित्रांनो..!

-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
-एक पुस्तकप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शब्द मनातले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share