
06/02/2023
ऑटोमोबाईल्समध्ये आपल्या मुलांना इंटरेस्ट वाटतोय?
------------------------------------------------------
निश्चितच आपण त्यांच्यासाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील संधी एक्स्प्लोर करू इच्छित असाल. मात्र आता या सेक्टरमधील आणखी एका नव्या स्ट्रीमकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.ते क्षेत्र आहे इलेक्ट्रिकल व्हीकल्स.
इव्हीचे डिझाईन, मॅन्यूफॅक्चरिंग आणि मेन्टेनन्स यात अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. इलेक्ट्रिक व्हीकल्समध्ये आयसी इंजिनसारखे महत्वाचे आणि मोठे भाग नसतात. त्याऐवजी मोठ्या बॅटरीसारखे भाग समाविष्ट असतात. त्यांच्या चार्जिंगची स्टेशन्स आणि त्यांची टेक्नॉलॉजी विकसित होत आहे. त्यासंबंधीचे कोर्सेसकडे तयार झाले आहेत.
आपण नवीनच इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असाल आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात कामालासुरूवात केली असेल तर आपणही या क्षेत्राकडे लक्ष ठेवून त्यासंबंधी शॉर्ट टर्म कोर्सेस, टेनिंग इत्यादी उपलब्ध झाल्यास ते करण्याचा विचार करू शकता.