30/07/2024
जि प प्रा शा वडनेरगाव केंद्र वडनेर येथे शिक्षण सप्ताह साजरा
औरंगाबाद दि 30 जुलै (प्राथीनिधि )
दिनांक- 22 ते 28 जुलै2024 या आठवड्यात जि. प.प्रा.शा.वडनेरगाव येथे शिक्षण सप्ताह निमित्त पहिल्या दिवशीअध्ययन अध्यापन साहित्य दिवस , विविध भित्तिपत्रके शैक्षणिक साहित्य प्रदर्शन हस्तलिखित सराव विविध तरंग चित्र बाहुल्या प्रतिकृती विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, याप्रसंगी गणितीय साहित्य विविध मूलभूत क्रियांचा सराव तसेच निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली.तिसऱ्या दिवशी क्रीडा दिवस, याप्रसंगी विविध देशी खेळ घेण्यात आले.चौथा दिवस सांस्कृतिक दिवस, विविध वेशभूषा लावणी गायन ,नृत्य स्पर्धा , पथनाट्य, एकांकिका घेण्यात आल्या. पाचव्या दिवशी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मातीकाम, बांबू काम कला कार्यशाळा प्रथमोपचार कार्यशाळा, घरगुती काम कापडी पिशवी निर्मिती, शेती व निसर्ग माहिती, व्यवसाय मार्गदर्शन इत्यादी उपक्रम घेण्यात आले. सहाव्या दिवशी मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम, शालेय पोषण आहार दिवस वृक्षारोपण ,वृक्ष संवर्धनासाठी नावाचे फलक इत्यादी उपक्रम घेण्यात आले.
दिनांक .-28 /07 /24 या दिवशी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी पोस्टर मेकिंग घोषवाक्य, विद्यांजली कार्यक्रम घेण्यात आला.तसेच समुदाय सहभाग दिवस यातून विद्यार्थ्यांना गावातील अन्नदात्यांकडून श्री संजय रघुनाथ शिरोळे, श्री कलीम चांद शहा, लक्ष्मण गंगाधर गांगुर्डे, श्री गोकुळ सुखदेव राठोड, सागर रमेश सोनवणे ,श्री सुनील गोरख शिरोळे, यांचा भाचा कृष्णा देविदास साळुंखे, यांच्याकडून विद्यार्थ्यांना मसालेभात, जिलेबी ,फरसाण असे मिस्टांअन्न भोजन देण्यात आले. या प्रसंगी शा. व्य. स. चे अध्यक्ष लक्ष्मण गंगाधर गांगुर्डे सर्व सदस्य पो.पाटील गावातील पालक वर्ग , माता पालक ,लीडर माता , ,ग्रामपंचायत सदस्य आबेदा चांद शहा, संजय रघुनाथ शिरोळे ,पोलीस पाटील बाळू रामराव पवार, शा .स.माजी अध्यक्ष प्रवीण रघुनाथ शिरोळे ,संतोष गांगुर्डे, केदारनाथ बोराळे, लताबाई शिरोळे, चंद्रकलाबाई शिरोळे, हिराबाई गांगुर्डे, कलीम चांद शहा, अमिन शहा, जावेद शहा, पुंडलिक पाटणकर, अश्फाक शहा ,रोहिदास सोनवणे, देविदास गायकवाड , गोकुळ वाघ, सोन्या बापू गांगुर्डे . शिवाजी सोनवणे . मुस्ताक शहा यांनी ही जेवणाचा स्वाद घेतला.तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.आहिरे आर.एन.व श्री साबळे आर.एन., केंद्रप्रमुख श्री राजपूत डी एस. उपस्थित होते.