17/10/2025
वाळूज एमआयडीसीत ऑईल टँकरचा भीषण स्फोट; हॉटेल चालक गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर – वाळूज एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील डी-42 प्लॉटसमोर उभ्या असलेल्या ऑईल टँकरमध्ये वेल्डिंगदरम्यान भीषण स्फोट झाला. या स्फोटात शेजारील हॉटेलमधील चालक गंभीर जखमी झाला असून त्याचा एक पाय निकामी झाला आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात अफरातफर माजली.
घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला. स्फोटामुळे टँकरचे तसेच आसपासच्या परिसराचेही मोठे नुकसान झाले असून पुढील तपास वाळूज पोलिसांकडून सुरू आहे.