27/11/2025
हाँगकाँगच्या ताई पो येथील 'वांग फुक कोर्ट' गृहसंकुलात लागलेल्या भीषण आगीने रौद्र रूप धारण केले असून, ही घटना हाँगकाँगच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक ठरण्याची भीती आहे. या दुर्घटनेत दुर्दैवाने मृतांचा अधिकृत आकडा ४४ पर्यंत वाढला आहे, ज्यात कर्तव्यावर असलेल्या एका ३७ वर्षीय अग्निशमन जवानाचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, अजूनही २७९ नागरिक बेपत्ता असून त्यांना शोधण्याचे व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ही आग 'फाइव्ह-अलार्म' म्हणून घोषित करण्यात आली असून, गृहसंकुलातील आठपैकी सात उंच इमारतींना याचा मोठा फटका बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या बाहेरील बाजूला नूतनीकरणासाठीलावलेले बांबूचे काम (Bamboo Scaffolding) आणि ज्वलनशील साहित्य यामुळे आग अत्यंत वेगाने पसरली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याच्या संशयावरून पोलिसांनी बांधकाम कंपनीच्या तीन लोकांना अटक केली आहे. सध्या ७६० हून अधिक जवान बचावकार्यात गुंतले आहेत.
Follow: .in
.in