Sasanniti

Sasanniti शासन द्वारा उपलब्ध जनकल्याण संबधी अभ? Weekly News Paper for the Awareness of Basic Governmental Scheme Run In India for All.

II (Hindi) Sasan Dwara Chalai Jane Wali Nitionki Margadarshak Patrika II

30/07/2025

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
मंत्रिमंडळ निर्णय (एकूण ७)
मंगळवार, दि.२९ जुलै, २०२५

ग्राम विकास विभाग
*राज्यात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' राबविणार*
राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' हे पुरस्कार अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच या अभियानातील पुरस्कारांकरिता दरवर्षी 290 कोटी 33 लाख रुपयांची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली.
या अभियानात 1 हजार 902 पुरस्कार दिले जाणार असून अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर, ते 31 डिसेंबर, 2025 असा राहणार आहे. ग्रामपंचायतीसाठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी 5 कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3 कोटी रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 2 कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर विभागस्तरीय पुरस्कारात विभागनिहाय पहिल्या 3 ग्रामपंचायती अशा एकूण 18 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 1 कोटी, 80 लाख आणि 60 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. जिल्हास्तरासाठी 34 जिल्ह्यातील एकूण 102 ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी 50 लाख, द्वितीयसाठी 30 लाख आणि तृतीयसाठी 20 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर (1053 पुरस्कार) ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकासाठी 15 लाख, द्वितीय क्रमांकासाठी 12 लाख, तृतीय क्रमांकासाठी 8 लाख रुपये अशा एकूण 1 हजार 53 ग्रामपंचायती आणि 5 लाख रुपयांचे दोन विशेष पुरस्कार (702 पुरस्कार) देण्यात येणार आहेत.
पंचायत समितीसाठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी 2 कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी दीड कोटी रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 1 कोटी 25 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर विभागस्तरावर (18 पुरस्कार) प्रथम क्रमांकासाठी 1 कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 75 लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 60 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेसाठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी 5 कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3 कोटी रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 2 कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
या अभियानाच्या अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी राज्यस्तरावर ग्रामविकास व पंचायतराज मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 16 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या अभियानाची पूर्वतयारी 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या अभियान पुरस्कारासाठी निवड करण्याकरिता तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर मूल्यमापनासाठी समित्या स्थापन करण्यात येतील. तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी विभाग, जिल्हा व पंचायत समिती स्तरावर संनियंत्रण व मूल्यमापन यंत्रणा समिती काम करणार आहे. या अभियांनाच्या प्रत्येक टप्प्यावरील मूल्यमापनासाठी कार्यपध्दती व वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
या अभियानात सात मुख्य घटक आहेत. यात सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांची सांगड, गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण, उपजिविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ अशा घटकांचा समावेश आहे. या घटकांच्या आधारे गुणांकन करुन पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.
*****

ग्राम विकास विभाग
*महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’*
*ग्रामीण महिलांच्या सबळीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल, २०० कोटींचा निधी*
ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’अंतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षतेस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. योजनेसाठी एकूण २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील महिलांतील उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी सुरू झालेल्या स्वयं सहाय्यता समूहांच्या (SHG) विविध उत्पादनांना स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हे केंद्र उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांमध्ये हे मॉल कार्यान्वित करण्यात येणार असून, नंतर टप्प्याटप्प्याने ही योजना इतर जिल्ह्यात विस्तारली जाणार आहे.
प्रत्येक उमेद मॉलसाठी कमाल २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, हे मॉल जिल्हा परिषदेच्या जमिनीवर उभारण्यात येतील. मॉलमध्ये प्रत्येक गटाला चक्राकार पद्धतीने गाळे उपलब्ध करून दिले जातील. महिलांना संवाद आणि प्रशिक्षणासाठी स्वतंत्र हॉलची सुविधा देखील असेल.
उमेद मॉलसाठी जिल्हा परिषदांकडून प्रस्ताव मागवले जातील. ज्या जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलसाठी जमीन उपलब्ध असेल आणि ती मध्यवर्ती ठिकाणी असेल, त्या जिल्ह्यांची निवड केली जाईल.”
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत निविदा प्रक्रिया, आराखडे तयार करणे, कामाची अंमलबजावणी केली जाईल. उमेद मॉलची देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषदेमार्फत केली जाणार आहे.
*****

सहकार व पणन विभाग

*शेलमालास रास्त भाव मिळण्यासाठी राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करणे सुलभ होणार*
*‘ई-नाम’ योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी अधिनियमात सुधारणेस मान्यता*

राज्यातील शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त व वाजवी भाव मिळावा यासाठी ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करणे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
केंद्र व राज्य शासन, कृषि उत्पन्न बाजार समितीतील कृषि उत्पन्नाच्या व्यापारामधील अडसर कमी व्हावे यासाठी राज्यातील १३३ कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ई-नाम योजना राबवित आहे. कृषि उत्पन्नाच्या व्यापारासाठी ऑनलाईन पद्धती कार्यान्वित करीत आहे. पण अजूनही राज्यात ई-नाम अंतर्गत "सिंगल युनिफाइड लायसन्स" ची तरतूद नसल्याने, इंटरमंडी व इंटर स्टेट ट्रेड सुरु होऊ शकलेले नाहीत. दरम्यान, केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाने कृषि उत्पन्न आणि पशुधन पणन (प्रचालन व सुविधा) अधिनियम, २०१७ (मॉडेल अॅक्ट) प्रकाशित केला आहे. या अनुषंगाने राज्याच्या महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यासाठी सन २०१८ च्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात आले होते. विधेयकातील तरतुदींबाबत सुधारणांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती. या उपसमितीने सुधारणांची शिफारस केली आहे. त्यानुसार केंद्राच्या मॉडेल अॅक्ट मधील तरतुदीनुसार राज्यातील ज्या मोठ्या बाजार समित्यांकडे अन्य किमान २ राज्यांतून शेतमाल येतो, अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय नामांकित बाजार समित्या घोषित करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. अशा बाजार समित्या राष्ट्रीय नामांकित बाजार समित्या घोषित केल्यानंतर या बाजार समित्यांवर शासनाचे थेट नियंत्रण होऊन निर्णय प्रक्रिया व पणन प्रक्रिया सुलभतेने व वेगाने होणार आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या सदर मॉडेल अॅक्ट २०१७ नुसार "सिंगल युनिफाइड लायसन्स" संदर्भातील तरतुदींचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
तसेच कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या सचिवांचे केडर तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जेणेकरून सचिव हा या कार्यालयाच्या थेट नियंत्रणाखाली येऊन शासन व बाजार समिती यामधील दुवा म्हणून तो काम करेल, तसेच कृषि उत्पन्न बाजार समित्यांवर देखील प्रभाव नियंत्रण ठेवता येईल. यासाठी सचिवाला पर्यवेक्षणाबाबतचे कामकाज सोपविले जाणार आहे सदर सचिवांचे पगार देखरेख शुल्कामधून जमा होणाऱ्या रकमेमधून करण्यात येणार आहे. याकरिता कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडून आकारण्यात येणारी देखरेख शुल्काची रक्कम शासनाऐवजी पणन विभागाला सुपूर्द करावी, अशी सुधारणाही अधिनियमात करण्यात येणार आहे. या अधिनियमातील सुधारणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक स्तरावर सनिंयत्रण समिती स्थापन करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
*****

विधि व न्याय विभाग
*महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी, वाशिम येथे विशेष न्यायालये*

महिला अत्याचाराची प्रकरणे गतीने निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालये स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या या तीन न्यायालयांसाठी प्रत्येकी ५ नियमित पदे (१ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, १ लघुलेखक, १ अधीक्षक, १ वरिष्ठ लिपिक, १ कनिष्ठ लिपिक) व प्रत्येकी २ मनुष्यबळ सेवा (१ हवालदार, १ शिपाई) बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे त्वरेने निकाली काढण्यासाठी आतापर्यंत २७ ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. या न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे निकाली निघाली आहेत. या न्यायालयांची उपयुक्तता विचारात घेता अत्याचारांच्या घटनांमुळे पीडित महिलांना त्वरेने न्याय मिळण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम या ठिकाणी देखील विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या न्यायालयांसाठी २ कोटी ३९ लाख ७८ हजार रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
*****

विधि व न्याय विभाग
*पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना*
पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या दोन्ही न्यायालयांसाठी आवश्यक पदांनाही मान्यता देण्यात आली.
या निर्णयानुसार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी 43 नियमित पदे मंजूर करण्यात आली असून 11 मनुष्यबळांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरसाठी 20 नियमित पदे मंजूर करण्यात आली असून 4 मनुष्यबळांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी पुणे न्यायालयाचे अंतर दूर पडत असल्याने, शिवाय न्यायदान कक्षाची उपलब्धता, प्रलंबित प्रकरणांची संख्या, निवासस्थानांची उपलब्धता विचारात घेता या नवीन न्यायालयांची स्थापन करणे गरजेचे होते. नव्याने स्थापन झालेल्या या न्यायालयांमुळे पिंपरी-चिंचवड येथील प्रलंबित प्रकरणे जलद गतीने चालविणे सुलभ होईल व नागरिकांची व पक्षकारांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
*****

जलसंपदा विभाग
*वर्धा जिल्ह्यातील 'बोर', 'धाम' सिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी ४२८ कोटी ९६ लाख*

वर्धा जिल्ह्यातील दोन महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प-बोर मोठा प्रकल्प (ता. सेलू) आणि धाम मध्यम प्रकल्प (ता. आर्वी) यांच्या नुतनीकरणासाठी सुमारे ४२८ कोटी ९६ लाख रुपयांच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षतेस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
बोर मोठा प्रकल्पासाठी २३१.६९ कोटी
हा प्रकल्प वर्धा नदीवर १९६७ मध्ये बांधण्यात आला आहे. बोरी गावाजवळील या धरणाचा साठा १३४.५४२ द.ल.घ.मी असून उपयुक्त पाणी साठा १२३.२१२ द.ल.घ.मी आहे. यामुळे सुमारे १६ हजार १९४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्याचा सेलू व समुद्रपूर तालुक्यातील ७७ गावांना सिंचन लाभ होतो. या प्रकल्पाची २४० किमीची कालवा व वितरण व्यवस्था दीर्घकालीन वापरामुळे तसेच वारंवारच्या अतिवृष्टीमुळे जीर्ण झाली आहे. प्रकल्पाची विसर्गक्षमता घटली असून पाणीगळतीत वाढ झाली आहे. त्यामुळे या वितरण प्रणालीचे नुतनीकरण करणे अत्यावश्यक आहे.
या दुरुस्तीअंतर्गत मुख्य कालवा, वितरीका, उपवितरिका, लघुकालवे, तसेच धरणाचे काटछेद, सांडवा, ड्रेन्स व पोहोच रस्त्यांचे पुनर्बांधकाम किंवा योग्य दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी २३१ कोटी ६९ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.
धाम मध्यम प्रकल्पासाठी १९७.२७ कोटी मंजूर
धाम प्रकल्पाचे बांधकाम १९८६ मध्ये पूर्ण झाले असून जुने कालवे, वितरिका, लघुकालवे आता जीर्ण अवस्थेत आहेत. गोदावरी खोऱ्यातील वर्धा जिल्ह्यातील महाकाळी गावाजवळील धाम नदीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून याद्वारे ७ हजार ९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते.
धरणाची एकूण लांबी १ हजार ६६३ मीटर असून, मुख्य कालवा व उपवितरिका, लघुकालव्यासह वितरण व्यवस्था २३० किमी आहे. या प्रकल्पातून विसर्गक्षमता घटली असून, संरचनांमधून पाणीगळती होऊ लागली आहे. त्यामुळे
धरण, सांडवा, कालवे, बांधकाम संरचना, धरण माथा रस्ता आणि धरणाकडे जाणारा पोहोच रस्ता यांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी १९७ कोटी २७ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. ही दोन्ही कामे विशेष दुरुस्ती योजनेंतर्गत होणार आहे.
*****
महसूल विभाग

*महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेस ॲडव्होकेट अकॅडमीसाठी ठाण्यातील जमीन*
महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद, मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
या निर्णयानुसार मौजे कळवा, ता.जि. ठाणे येथील स.नं. 226, क्षेत्र 1-01-90 हे.आर. ही जमीन महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेस ॲडव्होकेट अकॅडमीसाठी दिली जाणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सुमारे दोन लाख वकीलांसाठी ही संस्था काम करते. वकील वर्गासाठी विविध कल्याणकारी राबविणे, कायद्यातील सुधारणांना उत्तेजन देणे, वकीलांसाठी प्रशिक्षण वर्ग, चर्चासत्र, परिसंवाद आणि परिषदा या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन करणे, महिलांसाठी कायदेविषयक शिबिरे आयोजित करणे असे अनेक उपक्रम ही संस्था राबविते. सध्या ही संस्था मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील छोट्याशा जागेत कार्यरत आहे. या संस्थेने मागणी केल्यानुसार कळवा येथील जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
*****

मिशन निर्भया अंतर्गत सखोल जनजागृतीसुरक्षित आणि सजग समाजासाठी नांदेड पोलिसांचा पुढाकार!नांदेड पोलीस दलातर्फे शांकुतल स्कू...
29/07/2025

मिशन निर्भया अंतर्गत सखोल जनजागृती
सुरक्षित आणि सजग समाजासाठी नांदेड पोलिसांचा पुढाकार!

नांदेड पोलीस दलातर्फे शांकुतल स्कूल फॉर एक्सलन्स पासदगाव, नांदेड येथे विद्यार्थ्यांसाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शनाचे मुख्य विषय:
सायबर सुरक्षितता व सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर
वाहतूक नियमांची माहिती व पालनाचे महत्त्व
सेल्फ डिफेन्स व आत्मविश्वास वाढविण्याचे उपाय
कायदे विषयक जनजागृती – मुला-मुलींसाठी आवश्यक माहिती
गुड टच – बॅड टच याविषयी जागरूकता
अंमली पदार्थांचे दुष्परिणाम व व्यसनमुक्तीबाबत समुपदेशन
नैतिकतेचे महत्त्व आणि जबाबदार नागरिकत्व

ऑनलाइन तक्रार नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना QR कोडचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे ते कोणताही गैरप्रकार सहजपणे पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतील.

मिशन निर्भया हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जागरूकता वाढवण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना बळकट करत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! #नागपंचमी    #छत्रपतीसंभाजीनगरपोलीस  ...
29/07/2025

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

#नागपंचमी #छत्रपतीसंभाजीनगरपोलीस

छत्रपती संभाजीनगर वाहतूक शाखेच्या वतीने वाहन चालविण्याच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन. सुरक्षिततेसाठी विशेष तपासणी मोह...
29/12/2024

छत्रपती संभाजीनगर वाहतूक शाखेच्या वतीने वाहन चालविण्याच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन. सुरक्षिततेसाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

27/12/2024
पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे.
19/09/2024

पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्या...
02/07/2024

नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम, एजेंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
डॉ. राजकुमार शिंदे भा.पो.से.
पोलीस अधीक्षक
अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड
मोबाईल क्र. 9623999944
श्री प्रशांत पवार, ,पोलीस उप अधीक्षक
अँटी करप्शन ब्युरो,नांदेड
मोबाईल क्र. 9870145915.
दुरध्वनी क्रमांक 02462253512
टोल फ्रि क्रं.1064

*अपसंपदा गुन्हा अहवाल*  *( DPA CASE REPORT )* ➡ *युनिट*       - नांदेड ➡ *तक्रारदार*  - श्री कालीदास प्रभाकरराव ढवळे, पो...
05/01/2024

*अपसंपदा गुन्हा अहवाल*
*( DPA CASE REPORT )*

➡ *युनिट* - नांदेड
➡ *तक्रारदार* - श्री कालीदास प्रभाकरराव ढवळे, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो नांदेड.
➡ *आरोपी* -
1. सुर्यकांत रूक्माजी कावळे, वय 60 वर्षे, सध्या सेवानिवृत्त मुख्य लिपिक (वर्ग -3), श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नांदेड.
2. सौ.मिना भ्र. सुर्यकांत कावळे, वय 51 वर्षे, व्यवसाय - गृहीणी व शिवणकाम, दोघे रा. संकेतनगर, भावसार चौक, नांदेड
➡ *निरीक्षण कालावधी*
*(Check Period)* -
दि.01/06/1999 ते दि. 07/04/2018
➡ अपसंपदा मालमत्ता -
कायदेशीर उत्पन्नाचे तुलनेत 43.37 % किमतीची बेहिशोबी मालमत्ता.
➡ *गुन्हा रजि. नंबर* -
पोलीस स्टेशन भाग्यनगर, जि. नांदेड
गु.र.नं. 05/2024
कलम 13(1)(ई) सह 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 आणि कलम 109 भारतीय दंड संहिता अन्वये
➡ *थोडक्यात हकिकत* - यातील लोकसेवक सुर्यकांत रूक्माजी कावळे, सध्या सेवानिवृत्त मुख्य लिपिक (वर्ग-३) यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती. लोकसेवक यांनी संपादित केलेली मालमत्ता कायदेशीर स्त्रोताद्वारे संपादित केली किंवा कसे याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देवून माहिती घेण्यात आली होती. परंतु त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत ते पुष्टीदायक पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यांनी लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांना प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता स्वतःचे नावे, पत्नी मिना सुर्यकांत कावळे यांच्या नावे संपादित केल्याचे उघड चौकशी अंती निष्पन्न झाले आहे. त्यांनी संपादित केलेली रू. 23,57,086/- किंमतीची बेहिशोबी मालमत्ता ही त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 43.37 % जास्त असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे.
सदरहू विसंगत बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी लोकसेवक सुर्यकांत रूक्माजी कावळे यांना त्यांची पत्नी सौ. मिना सुर्यकांत कावळे यांनी मदत करून गुन्हयास प्रोत्साहित करून अपप्रेरणा दिली आहे.
म्हणून त्या दोघांचे विरूध्द वरील प्रमाणे अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*सुर्यकांत रूक्माजी कावळे यांचे संकेत नगर, नांदेड येथील घराचे घरझडती घेतली असता एकूण 102 तोळे सोने (1किलो 20 ग्रॅम), 69 तोळे चांदी (690 ग्रॅम) व नगदी रु. 59,06,500/- ( एकोणसाठ लाख सहा हजार पाचशे रुपये ) रोख रक्कम मिळून आली आहे.*
पुढील कायदेशीर प्रक्रिया चालु आहे. ➡ मार्गदर्शक 1) डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड
(मोबाईल क्र. 9623999944 )
2) श्री रमेशकुमार स्वामी, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र, नांदेड.
3) श्री अश्विनीकुमार महाजन, वाचक पोलीस निरीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड
➡ पर्यवेक्षण अधिकारी -श्री राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड. (मोबाईल क्र. - 7350197197 )
➡ तपास अधिकारी - श्री अरविंदकुमार हिंगोले, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड. ----------------------
*नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट)यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील संपर्क साधावा .*
कार्यालय दुरध्वनी 02462-253512
टोल फ्रि क्रं. 1064

CENTRAL VIGILANCE COMMISSION OF INDIAकेन्द्रीय सतकर्ता आयोग,नई दिल्ली.
06/11/2023

CENTRAL VIGILANCE COMMISSION OF INDIA
केन्द्रीय सतकर्ता आयोग,नई दिल्ली.

Address

02/07/90, Kamalraj Niwas, Tilak Path
Aurangabad
431001

Telephone

+919423448207

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sasanniti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sasanniti:

Share

Category