खबर छत्रपती संभाजीनगर

खबर छत्रपती संभाजीनगर बातमी हक्काची, विश्वासाची 'खबर औरंगाबाद' या पेजची निर्मिती आपल्यापर्यन्त बातम्या आणि खरीखुरी माहिती पोहोचविण्यासाठी केली गेलेली आहे.

"दाखवावी वाटते ती जाहिरात आणि लपवावी वाटते ती बातमी" या धोरणावर काम करत आम्ही लपवाव्या वाटणाऱ्या बातम्या दाखविण्याचा प्रयत्न करत आहोत.
आपल्या प्रामाणिक आणि सभ्य भाषेतील प्रतिक्रियांचा आम्ही आदर आणि स्वागत करतो.
पेजवरील बातम्या, व्हिडिओ किंवा माहिती आवडल्यास पेज ला लाईक आणि फॉलो कराल ही अपेक्षा. धन्यवाद..!

चौथ्या टप्प्याचे मतदान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पार पडले, कोण होणार संभाजीनगरचा खासदार?कमेंट करून सांगा...
13/05/2024

चौथ्या टप्प्याचे मतदान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पार पडले, कोण होणार संभाजीनगरचा खासदार?
कमेंट करून सांगा...

11/05/2024

शिवसेनेत रॅपवॉर, चंद्रकांत खैरे यांच्यानंतर आता संदीपान भुमरे यांच्यावर बनलेला रॅप प्रचंड व्हायरल.

10/05/2024

छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ शिवसेना(ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली, यावेळी नागरीक आणि कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया, बघा संपूर्ण व्हिडिओ...

09/05/2024

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा कोण होणार खासदार?, शहरातील जनतेच्या मनात कोण? उद्धव ठाकरेंच्या सभेबद्दल कशी आहे उत्सुकता, बघा संपूर्ण व्हिडिओ...

पोलीस स्टेशनमधून हतकडीसह आरोपी गेले पळून; शहरातील छावणी पोलीस ठाण्यातील घटनाछत्रपती संभाजीनगर शहरात तलवार घेऊन दहशत निर्...
08/05/2024

पोलीस स्टेशनमधून हतकडीसह आरोपी गेले पळून; शहरातील छावणी पोलीस ठाण्यातील घटना

छत्रपती संभाजीनगर शहरात तलवार घेऊन दहशत निर्माण करताना रंगेहाथ पकडलेल्या दोन गुंडांना ठाण्यात नेऊन बसवताच त्यांनी हातकडीसह ठाण्यातून पोबारा केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता घडली आहे. विकास दारासिंग जाधव आणि सुनिल एकनाथ बेलदार उर्फ जाधव असे पळून गेलेल्या आरोपींचे नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक विनायक शेळके यांनी मंगळवारी रात्री उशिरा छावणी परिसरातून सुनिल आणि विकासला शस्त्रांसह ताब्यात घेतले होते. पुढील कारवाईसाठी शेळके यांनी दोघांना छावणी पोलिस ठाण्यात हजर केले. दोघांना शस्त्र, आरोपींच्या कारसह कर्तव्यावर हजर सहायक फौजदार बन्सवाल यांच्या ताब्यात देऊन रितसर नोंद करुन निघून गेले. त्यानंतर बन्सवाल हे सहकारी कर्मचाऱ्यासह गुन्हा दाखल करण्यात व्यस्त असताना आरोपींनी लघुशंका आल्याचे नाटक केले. बन्सवाल यांनी मात्र दोघांची हातकडी काढून कुठल्याही सुरक्षेशिवाय बाथरुमच्या दिशेने पाठवले. दोघांनी मात्र ठाण्याच्या मागील बाजुने तत्काळ हातकडीसह पोबारा केला. याप्रकरणी उपनिरीक्षक सुरेश माळी यांच्या तक्रारीवरुन पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडून शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्या...
20/04/2024

छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडून शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

17/04/2024

छत्रपती संभाजीनगर शहरातील तापड़ीया कासलीवाल मैदान येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन. लाईव्ह
खबर छत्रपती संभाजीनगर

05/04/2024

अफसर खान यांना वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया
खबर छत्रपती संभाजीनगर

31/03/2024

लोकसभा निवडणूक लढणार की नाही? हर्षवर्धन जाधव यांची पत्रकार परिषद लाईव्ह
खबर छत्रपती संभाजीनगर Harshawardhan Jadhav

26/03/2024

आसाराम डोंगरे यांनी मंत्री अतुल सावे यांच्याबद्दलचे गैरसमज केले दूर
खबर छत्रपती संभाजीनगर Atul Save

10/03/2024

केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांची पत्रकार परिषद..
खबर छत्रपती संभाजीनगर Dr. Bhagwat Karad

13/02/2024

महावितरण बचाव कृती समितीचे विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when खबर छत्रपती संभाजीनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share