20/09/2023
लेख - " गणपतीचे रहस्य "
लेखक - मा. प्रबोधनकार सीताराम ठाकरे सन :- ७/२/१९५८
संदर्भ ग्रंथ :- प्रबोधनकार ठाकरे समग्र वांड्मय
बुद्ध म्हणजेच अष्टविनायक...!!! आणि "गणपति बाप्पा मोरया " म्हणजे "चन्द्रगुप्त मोरया " लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. तसेच, प्राचीन
भारतात राजेशाही मधे गण संस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला
गणपती म्हणत. ( या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले)
जगामध्ये दुख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता, आणि
दुख नष्ट करण्याचे अष्टांग (८) मार्ग बुद्धानेच सांगितले. म्हणजे दुखाला
नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता.
म्हणून, लोक बुद्धाला सुखकर्ता आणि दुखहर्ता असे म्हणत.. • पण, ब्राम्हण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपति बनवुन बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले. आणि देवांची निर्मिती करुन स्वत्ताला देवासमान मानून स्वत्ताचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले. आणि बहुजन समाजाला गुलाम केले...
• ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली. आणि 33 कोटी देवांना जन्म दिला. या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणांचे गणपति होउन गेले, त्याच गणपति शब्दाचे ब्राह्मणीकरण करुण समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला ! आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर सम्पूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले. पुढे टिळक नावाच्या ब्राम्हणाने सण उत्सवाच्या नावावर या बहुजन समाजा कडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली. आजही खोट्या गणपतीची पूजा करुण ब्राह्मण धन दौलत मिळवतात..