15/06/2023
वैजापुर तालुक्यातील करंजगावची शाळा, पहिल्याच दिवशीला गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरविण्यात आली. पाच शाळा खोल्या नव्याने बांधल्या मात्र त्या मोडकळीस असल्याचे शाळा व्यवस्थापन समितिचे म्हणणे आहे. अनेक वर्षांची तक्रार असून याकडे कुणाचेही लक्ष नाही. या गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील शाळेत पहिल्याच दिवशी १७३ विद्यार्थ्यांनी प्रार्थना, पाठ, गिरविले. ज्यात पूजा गाडेकर, रोहन मोकळे, अमृता जाधव, अमृता मगर, राधा पैठणकर, दादा उशीर, वैष्णवी साळुंके आदींचा समावेश होता.
_____________________________________________________________________________