Sanwaad.in

Sanwaad.in "संवाद" विद्यार्थी आणि समाजामध्ये! समाजातील समस्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि विद्यार्थ्यांच्या

"खरे तर निजामशाहीचा विलय शांतीपूर्ण व्हायला हवा होता. काँग्रेसला तसे करता आलेही असते. परंतु हैद्राबादच्या मुस्लिम शासक आ...
16/09/2025

"खरे तर निजामशाहीचा विलय शांतीपूर्ण व्हायला हवा होता. काँग्रेसला तसे करता आलेही असते. परंतु हैद्राबादच्या मुस्लिम शासक आणि जनतेला धडा शिकवायचा होता म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठे अत्याचार केले. ते इतके भयानक होते की, त्या काळात उस्मानाबाद जिल्हा हा तर मुस्लिम विधवांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध झाला होता. पंडित सुंदर लाल कमीशन च्या अहवाला प्रमाणे त्यावेळी उस्मानाबाद शहरातील मुस्लिमांची संख्या 10 हजार होती ती या नरसंहारानंतर तीन हजार उरली होती. गुलबर्गा येथे 5 ते 8 हजार, नांदेड येथे 2 ते 4 हजार मुस्लिमांची हत्या झाली होती. यावरून या नरसंहाराच्या तीव्रतेचा अंदाज आल्याने गृहमंत्री पटेल यांनी तो अहवाल प्रसिद्धच होऊ दिला नाही."

*✒️ * एम.आय.शेख. लातूर **

*🔹संपूर्ण लेख वाचा*
https://sanwaad.in/peaceful-merger-of-the-nizamshahi/

*For Regular Updates🔽*
https://chat.whatsapp.com/DfJHeitVDKnAlWqTkiWI5H

🌐 www.sanwaad.in
📧 [email protected]

चित्रपटातील दृश्यांमध्ये अत्यंत क्रूर हिंसा, कापलेले डोके आणि मृतदेहाचे तुकडे यांना वारंवार दाखवले गेले आहे. हेच तंत्र ‘...
14/09/2025

चित्रपटातील दृश्यांमध्ये अत्यंत क्रूर हिंसा, कापलेले डोके आणि मृतदेहाचे तुकडे यांना वारंवार दाखवले गेले आहे. हेच तंत्र ‘कश्मीर फाइल्स’ मध्ये वापरण्यात आले होते. पण प्रश्न असा आहे की – कलेचा उद्देश माणसाला विचार करायला लावणं, दु:ख समजून घेणं आणि प्रकाशाकडे नेणं असावा की त्याला अजून अंधार, भीती आणि द्वेषाच्या दिशेने ढकलणं? चित्रपटनिर्माते कधीही सामान्य मुस्लीमांच्या घरांमध्ये जाऊन तिथलं दु:ख दाखवत नाहीत, उलट संपूर्ण समाजालाच कटघऱ्यात उभं करतात. हा नॅरेटिव्ह केवळ एक चित्रपट कथा नाही, तर धार्मिक राजकारणाच्या घाणेरड्या हेतूंचं आरसाच आहे.

*✒️ * अब्दुल मुकीत, तेलंगणा **

*🔹संपूर्ण लेख वाचा*
https://sanwaad.in/the-bengal-files-movie/

*For Regular Updates🔽*
https://chat.whatsapp.com/DfJHeitVDKnAlWqTkiWI5H

🌐 www.sanwaad.in
📧 [email protected]

‘हलाल’ हा शब्द जितका धार्मिक, तितकाच तो आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पवित्रतेचा—ट्रेसिबिलिटी, पारदर्शकता आणि जबाबदारीचा—घोषवा...
13/09/2025

‘हलाल’ हा शब्द जितका धार्मिक, तितकाच तो आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पवित्रतेचा—ट्रेसिबिलिटी, पारदर्शकता आणि जबाबदारीचा—घोषवाक्य बनू शकतो. तो आरसा पुन्हा स्वच्छ ठेवायचा असेल, तर त्यात एकमेकांचे चेहरे शांतपणे दिसू देणे आवश्यक—कायदे आपले काम करतील; संख्या आपली गोष्ट सांगतील; पण संवादच मनांची धूळ झाडेल. शब्दांच्या कवचांवर राजकीय अर्थ कोरण्यापूर्वी त्यांच्या आतल्या आत्म्याची जपणूक करू शकलो, तर सामाजिक सलोख्याची वीण उसणे थांबेल; आणि व्यापार, श्रद्धा, नागरिकत्व—तीन्ही आपापल्या जागी, पण परस्पर-आदराच्या ताण्याबाण्याने, अधिक मजबूत उभे राहतील.

*✒️ * शाहजहान मगदुम **

*🔹संपूर्ण लेख वाचा*
https://sanwaad.in/dust-on-the-mirror-and-invisible-dust/

*For Regular Updates🔽*
https://chat.whatsapp.com/DfJHeitVDKnAlWqTkiWI5H

🌐 www.sanwaad.in
📧 [email protected]

मराठी भाषा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता आहे. संत साहित्य, नाटक, चित्रपट, लोककला या सर्वांनी मराठीला वैश्विक उंची ...
12/09/2025

मराठी भाषा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता आहे. संत साहित्य, नाटक, चित्रपट, लोककला या सर्वांनी मराठीला वैश्विक उंची दिली आहे. तरीसुद्धा राजकारणात भाषेला संघर्षाचे प्रतीक बनवले जाते. केवळ घोषणाबाजी न करता शिक्षण, प्रशासन, तंत्रज्ञान आणि नोकरीच्या संधींमध्ये मराठीला प्राधान्य दिले गेले पाहिजे. भाषेच्या माध्यमातून केवळ ओळख नाही तर समाजाचा विकास व्हावा, हाच खरा मराठी अस्मितेचा अर्थ आहे.

*✒️ * डॉ. हर्षदीप बी. सरतापे **

*🔹संपूर्ण लेख वाचा*
https://sanwaad.in/if-there-were-no-language-conflict-then-it-would-be-a-compromise/

*For Regular Updates🔽*
https://chat.whatsapp.com/DfJHeitVDKnAlWqTkiWI5H

🌐 www.sanwaad.in
📧 [email protected]

पोर्टमनने साकारलेली नायिका दु:खाने म्हणते – “म्हणजे असे स्वातंत्र्य संपते.. टाळ्यांच्या गजरात.” हा केवळ चित्रपटातील संवा...
11/09/2025

पोर्टमनने साकारलेली नायिका दु:खाने म्हणते – “म्हणजे असे स्वातंत्र्य संपते.. टाळ्यांच्या गजरात.” हा केवळ चित्रपटातील संवाद नसून आज भारतात घडणाऱ्या घटनांशी खूप मिळताजुळता वाटतो. गेल्या काही महिन्यांत घडलेल्या प्रसंगांकडे पाहिल्यास हे लोकशाही व नागरी हक्कांसाठी अत्यंत धोकादायक वाटते.भारतामधील घटनात्मक संस्था व लोकशाही प्रक्रियांचा ऱ्हास हा नागरी स्वातंत्र्यासाठी मोठा धोका आहे.वाढती हुकूमशाही प्रवृत्ती चिंताजनक आहे. या प्रवृत्तीला लोकांकडून गंभीर प्रतिकार व्हायला हवा, जेणेकरून मूलभूत हक्क आणि वंचित घटकांचे अधिकार सुरक्षित राहतील.

*✒️ * सिमाब खान, मुंबई **

*🔹संपूर्ण लेख वाचा*
https://sanwaad.in/this-is-the-death-of-freedom/

*For Regular Updates🔽*
https://chat.whatsapp.com/DfJHeitVDKnAlWqTkiWI5H

🌐 www.sanwaad.in
📧 [email protected]

विद्यार्थ्यांच्या नैतिक आणि चारित्र्य विकासात शिक्षकांचे मोलाचे योगदान असते. म्हणजेच, शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षित करत...
06/09/2025

विद्यार्थ्यांच्या नैतिक आणि चारित्र्य विकासात शिक्षकांचे मोलाचे योगदान असते. म्हणजेच, शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षित करतातच सोबत त्यांना चांगले जीवन जगण्यास सक्षम आणि त्यांना सुजान नागरिक बनवतात. शिक्षणाचा खरा अर्थ केवळ पुस्तकी ज्ञान किंवा तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे असा नाही, तर ती एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक क्षमतांचा सर्वांगीण विकास होतो. ज्ञान आणि अनुभवाद्वारे एखाद्या व्यक्तीला बुद्धिमान, संवेदनशील आणि समाजासाठी उपयुक्त बनवणे हा त्याचा उद्देश आहे, जेणेकरून तो जीवनातील समस्या सोडवू शकेल आणि एक सुसंस्कृत नागरिक बनू शकेल.

*✒️ * डॉ. प्रीतम भी. गेडाम **

*🔹संपूर्ण लेख वाचा*
https://sanwaad.in/students-all/

*For Regular Updates🔽*
https://chat.whatsapp.com/DfJHeitVDKnAlWqTkiWI5H

🌐 www.sanwaad.in
📧 [email protected]

प्रेषित मुहम्मद (स.) यांचं जीवनचरित्र म्हणजे केवळ एक ऐतिहासिक ग्रंथ नाही, तर आजच्या प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी एक ...
06/09/2025

प्रेषित मुहम्मद (स.) यांचं जीवनचरित्र म्हणजे केवळ एक ऐतिहासिक ग्रंथ नाही, तर आजच्या प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी एक जिवंत मार्गदर्शक आहे. मग तो जातिवाद आणि जातीय द्वेष असो, गाझामधील अन्याय असो किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा असो. रबी उल अव्वल या महिन्यात आपण केवळ उत्सवांमध्ये न अडकता ती शिकवण आपल्या जगण्यात आणायला हवी. चला, आपण द्वेषाला क्षमेने उत्तर देऊया, जिथे फूट आहे तिथे संवादाचा पूल बांधूया आणि उपेक्षितांची सेवा करूया. त्यांनी दाखवलेल्या दया, न्याय आणि प्रेमाच्या मार्गावर चालूनच आपण एक असं जग घडवू शकू, जिथे प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा आणि करुणेचा सन्मान होईल.

*✒️ *शाहजहान मगदुम, मुंबई**

*🔹संपूर्ण लेख वाचा*
https://sanwaad.in/present-day-vedha-prish*tah/

*For Regular Updates🔽*
https://chat.whatsapp.com/DfJHeitVDKnAlWqTkiWI5H

🌐 www.sanwaad.in
📧 [email protected]

मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मनोज जरांगे यांना पर्याय उभा राहू शकला नाही. आणि त्यांचा प्रभावही कमी होऊ शकला नाही. याचे म...
30/08/2025

मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मनोज जरांगे यांना पर्याय उभा राहू शकला नाही. आणि त्यांचा प्रभावही कमी होऊ शकला नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जरांगे पाटील यांचे साधेपण. ते कुणाच्याही आहारी जाणार नाहीत किंवा कुणाला मॅनेज होऊ शकणार नाहीत हा सामान्य मराठ्यांचा त्यांच्यावरील विश्वास. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा समाजाचा आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखे चित्र निर्माण झाले होते, तो या आंदोलनाने पुन्हा उंचावला आहे. तो असाच टिकवून ठेवण्याचे आणि वाढवण्याचे आव्हान या आंदोलनापुढे आहे.

*✒️ *विजय चोरमारे, वरिष्ठ पत्रकार**

*🔹संपूर्ण लेख वाचा*
https://sanwaad.in/facing-the-maratha-movement/
*For Regular Updates🔽*
https://chat.whatsapp.com/DfJHeitVDKnAlWqTkiWI5H

🌐 www.sanwaad.in
📧 [email protected]

भारत-पाकिस्तान दरम्यानचे तणाव आणि युक्रेनमधील युद्धात रशियाने दाखवलेली बळकट भूमिका यांनी भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम क...
29/08/2025

भारत-पाकिस्तान दरम्यानचे तणाव आणि युक्रेनमधील युद्धात रशियाने दाखवलेली बळकट भूमिका यांनी भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम केला आहे . ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांदरम्यान युद्धबंदी करण्यात त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि स्वतः घेतलेल्या श्रेया मुळे भारतात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. इतकेच नव्हे तर सरकारने संसदेमध्ये या प्रकरणांमध्ये मध्यस्थता केली नसल्याचे घोषित केले. त्यामुळे ट्रम्प यांचा जळफळाट झाला. त्यामुळे चिडून त्यांनी सेकंडरी सैंक्शन म्हणून अतिरिक्त 25% टैरिफ लावला.

*✒️ *एम.आय.शेख, लातूर **

*🔹संपूर्ण लेख वाचा*
https://sanwaad.in/impact-of-us-tariffs-on-indias-progress/
*For Regular Updates🔽*
https://chat.whatsapp.com/DfJHeitVDKnAlWqTkiWI5H

🌐 www.sanwaad.in
📧 [email protected]

देशातील बहुसंख्य बड्या कार्पोरेट्सनी धनशक्ती व व्यवस्थापन यंत्रणा नरेंद्र मोदींकरता राबवली हे सत्य आहे. प्रसारमाध्यमांचा...
27/08/2025

देशातील बहुसंख्य बड्या कार्पोरेट्सनी धनशक्ती व व्यवस्थापन यंत्रणा नरेंद्र मोदींकरता राबवली हे सत्य आहे. प्रसारमाध्यमांचा ताबा घेऊन, प्रचार उच्च शिखरावरून करणे व निवडणुकीच्या प्रक्रियेत भ्रामक अर्थकल्पना रुजवणे हीसुध्दा मोदी यांच्या अर्थकारणाची नीती आहे. म्हणूनच तीन वर्षांच्या मोदी सरकारच्या अर्थनीतीमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या केंद्र सरकारच्या हस्तक्षेपातून निर्माण झालेल्या सर्व आर्थिक संस्था म्हणजे बँका, विमा, सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे, तेल, पोर्ट ट्रस्ट, टेलिकॉम व वित्त संस्थांवरील नियंत्रण कार्पोरेट उद्योगांकडे लवकरात लवकर सोपवणे याला प्राधान्य आले व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या बजेट मध्ये मध्यवर्ती सूत्र पंतप्रधान मोदी यांची कार्पोरेट उद्योगधार्जिणी अर्थनीती आहे हे स्पष्ट दिसते!

*✒️ *शाहिद शेख, कोल्हापूर**

*🔹संपूर्ण लेख वाचा*
https://sanwaad.in/modi-government-disrupted-finance/
*For Regular Updates🔽*
https://chat.whatsapp.com/DfJHeitVDKnAlWqTkiWI5H

🌐 www.sanwaad.in
📧 [email protected]

स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्त होणे नव्हे, तर विचारांच्या तुरुंगातून, मनातल्या संशयाच्या जळमटांतून आणि प...
25/08/2025

स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्त होणे नव्हे, तर विचारांच्या तुरुंगातून, मनातल्या संशयाच्या जळमटांतून आणि पूर्वग्रहांच्या अदृश्य शृंखलेतून स्वतःची सुटका करून घेणे. भीती आणि अपप्रचारांच्या कोलाहलात सामान्य माणसाच्या मनात उगवणाऱ्या संशयाच्या झाडाची मुळे कशी रुजतात आणि सत्याची पहाट फटकल्यावर त्या मुळांना कसा घाव बसतो ही त्याची केंद्ररेषा. 'आझादी' हा लघुपट याच खऱ्या स्वातंत्र्याचा शोध घेणारी एक प्रभावी कलाकृती आहे.

*✒️ *शाहजहान मगदुम (मुंबई)**

*🔹संपूर्ण लेख वाचा*
https://sanwaad.in/azadi-doubt-fog/
*For Regular Updates🔽*
https://chat.whatsapp.com/DfJHeitVDKnAlWqTkiWI5H

🌐 www.sanwaad.in
📧 [email protected]

लोकशाही फक्त मतदानाच्या दिवशी जिवंत नसते; ती रोजच्या व्यवहारात, प्रशासनाच्या खिडकीत, पोलिस थान्यात, शाळेच्या वर्गात, हॉस...
23/08/2025

लोकशाही फक्त मतदानाच्या दिवशी जिवंत नसते; ती रोजच्या व्यवहारात, प्रशासनाच्या खिडकीत, पोलिस थान्यात, शाळेच्या वर्गात, हॉस्पिटलच्या रांगेत धडधडत असते. जेव्हा अल्पसंख्याक नागरिक पोलिसांकडे तक्रार देताना निडर असतात, शासकीय योजनांच्या पोर्टलवर स्वतःचे नाव विश्वासाने भरतात, मुलींना कॉलेजपर्यंतची वाट सुरक्षित वाटते, आणि बाजारपेठेत आपली ओळख सांगताना संकोच राहत नाही तेव्हाच “आयडिया ऑफ इंडिया” प्रत्यक्ष अनुभूती बनते. विकासाच्या मोजपट्ट्यांवर आपल्याला रस्ते-मेट्रो-एअरपोर्ट दिसतील; परंतु खऱ्या अर्थाने प्रगती तिथे आहे जिथे विविधतेशी संवाद करणारे हृदय मोठे होत जाते आणि असहमतीतही आदर वाचतो.

*✒️ *शाहजहान मगदुम (मुंबई)**

*🔹संपूर्ण लेख वाचा*
https://sanwaad.in/idea-of-india-independent/

*For Regular Updates🔽*
https://chat.whatsapp.com/DfJHeitVDKnAlWqTkiWI5H

🌐 www.sanwaad.in
📧 [email protected]

Address

Glint House, Shah Bazar
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanwaad.in posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share