JNC City News Verified

JNC City News Verified jnc city news

* दोघात तिसरा सोपा विजय विसरा *   परभणी हिंगोली विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीच्या बाबतीत, पक्षीय बलाबल जोखून निवडण...
09/06/2026

* दोघात तिसरा सोपा विजय विसरा *

परभणी हिंगोली विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीच्या बाबतीत, पक्षीय बलाबल जोखून निवडणुकीच्या निकालाचे अंदाज वर्तविले जात आहेत.
आपल्या गटाकडे असलेल्या संख्याबळाच्या जोरावर निवडणूक सहजगत्याची जिंकू अशा वल्गना समाज माध्यमांवर केल्या जात आहेत.
मात्र असे म्हटले जाते की, एखाद्याचा त्याच्या ताकतीवरून अंदाज बांधता येतो.
मात्र दुसऱ्याच्या आत्मविश्वासाचा आणि त्याचा बुद्धी कौशल्याचा अंदाज कोणी बांधने अवघड असते!
परभणी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत हे घडत असताना दिसत आहे.
महायुतीकडे निर्णयक संख्याबळ आहे. तुलनेत, महाआघाडीकडे संख्या बळ तोकडे आहे.
त्यात अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांच्या कडील संख्याबळाचा कोणालाच अंदाज नाही.
तरी देखील त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि त्यांच्या पिताश्रींनी आखलेली रणनीती यामुळे महायुती आणि महाआघाडी अस्वस्थ झाली असल्याचे दिसून येते.
जातीय समीकरणाबरोबरच, भाजपाची 2029 साठी ची स्वबळावरची तयारी पाहता, विद्यमान विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपा वेगळी खेळी खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पश्चिम बंगालमध्ये 28 पैकी 20 खासदारांनी वेगळा गट स्थापन करून, भाजपा सरकारला केंद्रात पाठिंबा दिला आहे.
या घटनेचा,शिंदे सेनेचे महत्त्व कमी करण्याच्या हालचाली वेगाने घडत आहेत,असा अर्थ लावला जातो आहे.
एकीकडे जातीय समीकरणात मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता बळावत जात असताना, दुसरीकडे शिंदे चे महत्व कमी करण्याचा घाट घातला जात आहे. याला पूरक म्हणून अपक्षाच्या पारड्यात भाजपाने झुकते माप टाकले.
तर, नवल वाटायला नको.
त्याचबरोबर महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर हे देखील तीतक्याच ताकतिने निवडणूक लढवीत असताना दिसत आहेत. त्यांचे स्थानिक संबंध आणि आज वरची राजकीय कारकीर्द पाहता, निवडणुकीत डॉक्टर नावंदर कडवे आव्हान उभे करतील यात शंका नाही.
डॉक्टर नावंदर यांना कमी लेखणे किंवा त्यांची ताकद नजरेआड करणे महायुतीला परवडणारे नाही.
एकंदर या निवडणुकीचा राग रंग पाहता महायुतीला वाटते तेवढी ही निवडणूक सोपी नाही.
या निवडणुकीचा निकाल युतीच्याच बाजूने लागेल.
याची शाश्वती देता येणे कठीण आहे.
सईद खान हे स्वतःला कितीही "गब्बर" समजत असले तरी समोर "जय" आणि "वीरू" आहेत हे त्यांनी ओळखून मनाशी खुण गाठ बांधून ठेवली पाहिजे.
हिंगोलीतील युतीची मते एक संघरतील. असा अंदाज बांधला जात होता.
मात्र आमदार संतोष बांगर यांच्या किंग मेकर ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
सध्या तरी, परभणी हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून चर्चेलाही तितकेच उधान आले आहे.
आपणास याविषयी काय वाटते?
हे देखील कळणे तीतकेच महत्त्वाचे आहे.
या फेसबुक पेजवर आपणही व्यक्त व्हावे, आणि आपल्या सूचना आम्हाला कळवाव्यात.
आमचे विश्लेषण आपणास कसे वाटते हे जाणून घेण्यात आम्हाला उत्सुकता आहे.

Address

Sadguru Housing Society
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JNC City News Verified posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share