Karmad Live

Karmad Live करमाड व परिसरासह जगभरतील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पहात रहा करमाड लाईव्ह

20/07/2026

लडाखचे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ क्रांती चौकात विद्यार्थी, वकील तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले. यावेळी सर्वांनी शांततापूर्ण आंदोलन करत आपली एकजूट आणि समर्थन व्यक्त केले.

20/07/2026

विलास भुमरेंची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, तर रामुकाका शेळके यांची उपाध्यक्षपदी निवड
निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून केला जल्लोष

17/07/2026

इचलकरंजीकडे जाणाऱ्या एसटी बसला आग; ३८ प्रवासी सुखरूप
धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव–पांढरी शिवारातील घटना
धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव–पांढरी शिवारात इचलकरंजीकडे जाणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. बसमध्ये ३८ प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली, तर मागून येणाऱ्या कारमधील नागरिकांनीही तत्परता दाखवत प्रवाशांना बसमधून सुरक्षित बाहेर काढण्यास मदत केली.
प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर काही मिनिटांतच बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील काही प्रवासी पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघाले होते.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

15/07/2026

बिडकीन डीएमआयसी परिसरात जोरदार पाऊस.

11/07/2026

करमाड

11/07/2026

मिटमिटा परिसरातील मृत गुंड बाबा फर्जंद यांच्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीत तब्बल ५ कोटी ६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ६,३५० जिवंत काडतुसे, २१ हत्यारे, ५ कोटी २६ लाखांची रोख रक्कम आणि १५१.३३ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांच्या हाती लागल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
कामगार युनियन आणि जमिनीच्या व्यवहारांच्या माध्यमातून गुन्हेगारी साम्राज्य उभारल्याचा आरोप असलेल्या बाबा फर्जंद यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने या धाडीचे नियोजन केले होते. शुक्रवारी पहाटे सुरू झालेली ही कारवाई तब्बल २१ तास सुरू होती.
शहर पोलिस, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने बंगल्याची सखोल झडती घेतली. झडतीदरम्यान बंगल्यातील विविध गुप्त जागांमधून कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम, मोठा शस्त्रसाठा आणि मौल्यवान सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेली रोकड एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की ती मोजण्यासाठी काउंटिंग मशिन्सचा वापर करावा लागला.
या कारवाईमुळे बाबा फर्जंद यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत तसेच संभाव्य गुन्हेगारी जाळ्याबाबतच्या तपासाला वेग आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून जप्त केलेल्या रोख रकमेचा स्रोत, शस्त्रसाठ्याचा उद्देश आणि संबंधित मालमत्तेची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

10/07/2026

तातडीची माहिती

आज, 11 जुलै रोजी रात्री शिवूर येथे झालेल्या अपघातात घनश्याम ठकसाळ हे जखमी झाले असून त्यांना वैजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

त्यांची मोटारसायकल क्रमांक MH20 HG 1146 आहे.

ॲम्ब्युलन्स चालकाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाचा संपर्क क्रमांक 8766898607 असा आहे.

सदरील व्यक्ती आपल्या ओळखीची असल्यास किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधता येत असल्यास, कृपया ही माहिती त्यांच्यापर्यंत तात्काळ पोहोचवा.

07/07/2026

बीएलओला कामादरम्यान हृदयविकाराचा झटका; अतिरिक्त कामांच्या ताणामुळे शिक्षकांमध्ये चिंता
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील बीएलओ बी. बी. ढगे यांना बीएलओचे काम करत असताना हृदयविकाराचा झटका (अटॅक) आल्याची घटना घडली. सुदैवाने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, शाळा प्रवेश प्रक्रिया, बीएलओची जबाबदारी तसेच इतर विविध अतिरिक्त शासकीय कामांचा वाढता ताण शिक्षकांवर येत असल्याने अशा घटना घडत असल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षकांवरील अतिरिक्त कामांचा भार कमी करून त्यांना दिलासा देण्याची मागणीही संघटनांकडून करण्यात आली आहे.

07/07/2026

मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे

06/07/2026

जनहितार्थ जरी

Address

Karmad
Aurangabad
431154

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karmad Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Karmad Live:

Shortcuts

Share