Lok News A2

Lok News A2 Lok NewsA2news follow like

लोक न्यूजA2 मुख्य संपादक लक्ष्मण कांबळे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रनांदेड | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्...
14/10/2024

लोक न्यूजA2 मुख्य संपादक लक्ष्मण कांबळे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र
नांदेड | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा वचनपूर्ती सोहळा

लोक न्यूजA2 मुख्य संपादक लक्ष्मण कांबळे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रनवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्...
11/10/2024

लोक न्यूजA2 मुख्य संपादक लक्ष्मण कांबळे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्रकल्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन संपन्न*

ठाणे, दि.11 - नवी मुंबईच्या विकासाला गती देणारे चांगले काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असून आज 25 नागरी सुविधांचे व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे, याबद्दल समाधान व्यक्त करीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री.एकनाथ शिंदे यांनी यामध्ये ऑलिंपिक आकाराचा तरणतलाव, महिलांसाठी कॅन्सर तपासणी सुविधा, 10 बेडचा केमोथेरपी वॉर्ड, शाळा, मार्केट, आरोग्य केंद्र, जलकुंभ, ई-बसेस, ई-चार्जिंग अशा 410 कोटीहून अधिक रक्कमेच्या विविध प्रकारच्या सुविधांचा समावेश असल्याचे सांगितले. पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते, आता महानगरपालिका कापडावर पुनर्प्रक्रिया करणार आहे, अशा वेगळया प्रकारच्या आधुनिक प्रकल्पाचा लोकांना फायदा होईल, असेही ते म्हणाले.

नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांच्या वतीने वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात विविध नागरी सुविधा, प्रकल्प यांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न् झाला, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी सिडकोचे अध्यक्ष श्री.संजय शिरसाट, खासदार श्री.श्रीरंग बारणे, खासदार श्री.नरेश म्हस्के, आमदार श्री.गणेश नाईक, आमदार श्री.निरंजन डावखरे, आमदार श्रीम.मंदा म्हात्रे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक श्री. विजय सिंघल, नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे, केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या वस्त्र समितीच्या आयुक्त तथा उपाध्यक्ष श्रीम. रुप राशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नवी मुंबईतील 1 लाख 45 हजारहून अधिक महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळाला असून नवी मुंबईत चांगले काम झाल्याचा अभिप्राय दिला. यावेळी महानगरपालिका क्षेत्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांचे लाभार्थी यांना प्रातिनिधिक स्वरुपात योजनेचा लाभ देण्यात आला तसेच संयुक्त् राष्ट्र विकास कार्यक्रम अंतर्गत परिसर सखी वस्ती संघामधील 10 महिला वाहन चालकांना इलेक्ट्रिक वाहनाची चावी मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली.

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या एनएमएमटी बसेसमधून महिलांना तिकीट दरात 50% म्हणजे हाफ तिकीटात प्रवास करता येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री यप्रसंगी केली. मुख्यमंत्री महोदयांनी ही घोषणा करताच कार्यक्रमास उपस्थित महिलांनी टाळयांचा गजर केला.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना मागील वर्षी दिवाळीला 30 हजार सानुग्रह अनुदान मिळाले होते. यावर्षी त्यामध्ये 3 हजाराची भरीव वाढ करीत 33 हजार सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले.

याप्रसंगी आमदार श्री.गणेश नाईक व आमदार श्रीम.मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात नागरिकांकरिता महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त् केले. आयुकत् डॉ.कैलास शिंदे यांनी शहरातील नागरिकांना अपेक्षित असणाऱ्या व त्यांना अधिक सुविधा देणाऱ्या दर्जेदार कामांची पूर्तता महानगरपालिका करीत असून त्यामधील 25 महत्वाच्या सुविधांचे व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आज मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते होत असल्याचा आनंद व्यक्त केला.

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकर नागरिकांना महत्वाच्या सेवासुविधांची भेट देण्यात आली असून यामध्ये घणसोली कोपरखैरणे जंक्शन ते साईबाबा मंदिर सर्कल पर्यंत जोडणाऱ्या घणसोली पामबीच रस्त्याचे काँक्रिटीकरण, पावसाळी गटार व पदपथ बांधणे कामाचा भूमिपूजन समारंभ (रू. 52 कोटी 50 लक्ष ),
* सेक्टर 19 ए, कोपरखैरणे येथे भूखंड क्र. के-66 व के-67 येथे बहुउद्देशीय इमारत भूमिपूजन समारंभ (54 कोटी 29 लक्ष),
* सेक्टर 12, वाशी येथे एनएमएमटी बस स्थानक, 50 X 25 ऑलिम्पिक साईज जलतरण तलाव लोकार्पण समारंभ (191 कोटी 76 लक्ष)
* सेक्टर 15, सीबीडी बेलापूर येथे बहुमजली वाहनतळ इमारत लोकार्पण समारंभ (34 कोटी 63 लक्ष)
* नेरूळ विभाग कार्यालय इमारत लोकार्पण समारंभ (2 कोटी 36 लक्ष)
* कुकशेत येथे शाळा इमारत लोकार्पण समारंभ (6 कोटी 26 लक्ष)
* वाशी सेक्टर 15 व 9 येथे कोपरखैरणे लिंक रोडवरील पादचारी पूल (FOB) लोकार्पण समारंभ (2 कोटी 44 लक्ष)
* प्लॉट क्र. 14, कुकशेत येथील मार्केट इमारत लोकार्पण समारंभ (4 कोटी 60 लक्ष)
* प्लॉट क्र. 16, कुकशेत येथील मार्केट इमारत लोकार्पण समारंभ (9 कोटी 37 लक्ष)
* सेक्टर 15, कोपरखैरणे येथील मार्केट इमारत लोकार्पण समारंभ (2 कोटी 17 लक्ष)
* सेक्टर 22 नेरूळ येथील जलकुंभ लोकार्पण समारंभ (8 कोटी 53 लक्ष)
* सेक्टर 9 सीबीडी बेलापूर येथील जलकुंभ लोकार्पण समारंभ (8 कोटी 48 लक्ष)
* घणसोली वाल्मिकीनगर येथील जलकुंभ लोकार्पण समारंभ (8 कोटी 21 लक्ष)
* सेक्टर 8 वाशी येथील जलकुंभ भूमिपूजन समारंभ (7 कोटी 85 लक्ष)
* सेक्टर 15/16 वाशी येथील जलकुंभ भूमिपूजन समारंभ (14 कोटी 16 लक्ष )
* सेक्टर 16, कोपरखैरणे येथे प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र इमारत लोकार्पण समारंभ (2 कोटी 28 लक्ष)
* नमुंमपा रूग्णालयांमध्ये 6 आधुनिक शस्त्रक्रियागृह सुविधा (Modular O.T.) लोकार्पण समारंभ
* 13 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात कॅन्सर स्क्रिनींग सुविधा शुभारंभ
* कॅन्सर रूग्णांसाठी नेरुळ रुग्णालयात 10 बेड्सची केमोथेरपी सुविधा शुभारंभ
* शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र (UHWC) शुभारंभ
* टेक्सटाईल टू रिसायकल प्रकल्प शुभारंभ
* 25 ई बसेस सुविधा शुभारंभ
* ई वाहनांसाठी 18 चार्जींग स्टेशन बांधणे कामाचा भूमिपूजन समारंभ
* नमुंमपा कामकाजात ई ऑफिस प्रणाली शुभारंभ
* नवी मुंबई महानगरपालिकेचे नुतन ॲप mynmmc शुभारंभ,

अशा विविध नागरी सुविधा कामांचा समावेश आहे. विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शाळा इमारती, पर्यावरण व घनकचरा व्यवस्थापन विषयक सुविधा व प्रकल्प तसेच प्रशासकीय सेवा या माध्यमातून लोकाभिमुख प्रशासन राबविण्याच्या दृष्टीनेही सेवांचा शुभारंभ करण्यात आला.
00000000

___________________________________________लोक न्यूज A2 मुख्य संपादक लक्ष्मण कांबळे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र________...
11/10/2024

___________________________________________
लोक न्यूज A2 मुख्य संपादक लक्ष्मण कांबळे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र
____________________________________________
नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी*
*महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

*मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती*

रायगड, दि. ११ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचं सी-२९५ या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई -३० (Sukhoi) विमानानेही यशस्वी फ्लायपास केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई-३० या लढाऊ विमानानेही फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी-२९५ विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रिय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष, संजय शिरसाट,खा. श्रीरंग बारणे,खा. सुनील तटकरे,खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, आ. गणेश नाईक,आ. प्रशांत ठाकूर, आ महेश बालदी, अपर मुख्य सचिव गृह इकबाल चहल, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त डॉ देशमुख, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सी-२९५ विमान हे गांधीनगरहून तर सुखोई हे पुण्यातून आलं होते.

यावेळी माध्यमाशी बोलताना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असे नमूद करून या यशस्वी चाचणीचे महत्त्व अधोरेखित केले. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. विजयादशमीच्या एक दिवस आधी झालेल्या या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांसाठी मोठा आनंद आहे.
"मार्च २०२५ मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होईल. वेळेआधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.तसेच सिडको ने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले. हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी मोठे आश्रयस्थान बनेल तसेच यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी वेग येईल असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. या विमानतळामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच इथे आयटी पार्क आणि व्यावसायिक केंद्रे उभारली जातील असा विश्वास श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

*प्रवाशांसाठी फायदेशीर प्रकल्प - फडणवीस*

नवी मुंबई विमानतळाचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरुन दर वर्षी अंदाजे ९ कोटी प्रवासी प्रवास करतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शिवडी न्हावाशेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार आहे.

लोक न्यूज A2 मुख्य संपादक लक्ष्मण कांबळे छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र--------------------------------------------------...
11/10/2024

लोक न्यूज A2 मुख्य संपादक लक्ष्मण कांबळे छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र
--------------------------------------------------------------------
ंत्रिमंडळ बैठक : गुरूवार, दि. 10 ऑक्टोबर 2024*
*एकूण निर्णय- 16 (भाग 2)*
महसूल विभाग
पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला*
पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
मौजे दापचरी व मौजे वंकास (ता.डहाणू) येथील कृषि व पदुम विभागाच्या 460.00.0 हे. आर जमिनीपैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निश्चित केलेली 377.26.19 हे. आर शासकीय जमीन तसेच मौजे टोकराळे येथील 125.55.2 हे.आर ही शासकिय जमीन प्रचलित वार्षिक बाजारमुल्य दर तक्त्यानुसार शेती दराने येणारी कब्जेहक्काची रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-2 म्हणून एमआयडीसीला देण्यात येईल. -----०-----
पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय
*पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना*
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून या विभागाचे नामकरण पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्त्यव्यवसाय विभाग असे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
पुनर्रचनेनंतर पशुसंवर्धन आयुक्तालय व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रिकरण करून पुनर्रचनेनंतर आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय असे या पदाचे नाव राहील. राज्यातील 351 तालुक्यांत तालुका पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी कार्यालय सुरु करण्यात येईल. त्याचप्रमाणे 169 तालुक्यात तालुका लघू पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालय सुरु करण्यात येतील. राज्यातील 2 हजार 841 पशू वैद्यकीय श्रेणी दोन दवाखान्यांचे श्रेणी एक दवाखान्यात श्रेणीवाढ करण्यात येईल. त्याशिवाय 12 हजार 222 नियमित पदांना व कंत्राटी तत्वावरील 3 हजार 330 पदे यांच्या वेतनासाठी 1681 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली
मृद व जलसंधारण
भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणी पुरवठा विभागास हस्तांतरित*
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी पाझर तलाव (भेंडाळे वस्ती) हा प्रकल्प मृद व जलसंधारण विभागाकडून पाणीपुरवठा विभाग व स्वच्छता विभागास हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या तलावाचे काम पूर्ण झाले असून तलावाचा पाणीसाठी 141.42 सघमी आहे.--
शालेय शिक्षण
*राज्यात आंतररष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी*
जर्मनीतील बाडेन वुटेन बर्ग राज्याशी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र स्टेट इंटरनॅशनल एम्प्लॉयमेंट अॅण्ड स्कील अडव्हान्समेंट कंपनी स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
जर्मनीमध्ये निवड झालेल्या महाराष्ट्रातल्या उमेदवारांना व्हिसा व पासपोर्ट बाबत मदत करणे, त्याचप्रमाणे इतर आवश्यक त्या उपाययोजना या कंपनीमार्फत करण्यात येतील. या कंपनीला तीन कोटी रुपये भागभांडवल उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या या योजनेसाठी 27 हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली असून 10 हजार 50 उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
-----०-----
विधि व न्याय

*न्यायमूर्तींच्या खासगी सचिवांना सचिवालयीन संवर्ग*

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वरिष्ठ खासगी सचिव, खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यक यांची संरचना सचिवालयीन संरचनेसारखी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही संरचना अनुक्रमे 20 टक्के, 30 टक्के आणि 50 टक्के याप्रमाणे 1 ऑक्टोबर 2007 पासून लागू करण्यात येईल. एकूण 330 जणांना याचा लाभ मिळेल.-----०-----

विधि व न्याय

*तुळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय*

धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर येथे आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करून त्यासाठी पद मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सध्याच्या केळापूर सहदिवाणी न्यायलयातील 683 प्रकरणे वणीच्या नव्या दिवाणी न्यायालयात हस्तांतरीत होणार आहेत तर तुळजापूर येथे धाराशीव येथील जिल्हा व सत्र न्यायालयातून 831 प्रकरणे हस्तांतरीत होतील.
-----०-----

आदिवासी विकास

*शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी*

नाशिकच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांना कर्जाची शासन थकहमीची मर्यादा पन्नास कोटींवरून शंभर कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या शासन थकहमीचा कालावधी 1 एप्रिल 2024 पासून पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्यात येईल.
-----०-----

अल्पसंख्याक विकास
*मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ*

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल एक हजार कोटी रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सध्या हे भांडवल सातशे कोटी रुपये एवढे आहे. या महामंडळामार्फत विविध कर्ज, पतपुरवठा योजना राबवण्यात येतात.
-----०-----

अल्पसंख्याक विकास
*मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ*

मदरश्यांमधील डी. एड., बी.एड. शिक्षकांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत राज्यातील मदरसांमध्ये पारंपरिक, धार्मिक शिक्षणाबरोबरच गणित, विज्ञान, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दूचे शिक्षण देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नेमणूक करण्यात येते. सध्या डी. एड. शिक्षकांना सहा हजार रुपये मानधन देण्यात येते, ते 16 हजार रुपये करण्यात येईल. तसेच माध्यमिकचे विषय शिकवणाऱ्या बी.ए. बी.एड., बी.एस्सी-बी.एड. शिक्षकांचे मानधन आठ हजार रुपयांवरून 18 हजार रुपये करण्यात येईल.
-----०-----
मदत व पुनर्वसन

*आपत्ती सौम्यीकरणाची कामे आता संबंधित विभागांमार्फत*

राज्यातील कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील आपत्ती सौम्यीकरणाची कामे विविध विभाग तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

मृद व जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा , पाणीपुरवठा, वन, ऊर्जा विभाग, तसेच नगरपरिषदा, नगरपालिका, महानगर पालिका आणि जिल्हा परिषदा या यंत्रणांनी सादर केलेली आपत्ती सौम्यीकरणाची कामे करण्यासाठी संबंधित विभागांना अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जबाबदारी टाकण्यात आली आहे. कोंकण वगळता ही कामे संबंधित विभागांना सोपवण्यात येतील.
-----०-----

महसूल

*राहाता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी*
शिर्डीच्या साईबाबा संस्थानास सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जागा विनामूल्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महामंडळाचे राहाता तालुक्यातील मौजे निमगाव कोऱ्हाळे येथील 5.48 हे. आर. इतकी जमीन ही या क्रीडा संकुलाची उभारणी दोन वर्षांच्या आत करण्याच्या अटीवर विनामूल्य देण्यात येईल.
-----०-----
इतर मागास बहूजन कल्याण

*शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे*

राज्यातील विविध समाज घटकांसाठी वेगवेगळी महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

लाडशाखीय वाणी-वाणी समाजासाठी सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), लोहार समाजासाठी बह्मलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), शिंपी समाजासाठी संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), गवळी समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ त्याचप्रमाणे लोहार आणि नाथ पंथीय समाजासाठी महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपकंपन्यांसाठी पन्नास कोटी रुपयांचे भाग भांडवल देण्यात येईल.
-----०-----
महसूल

*प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकासासाठी नागनाथ आण्णा नायकवडी महामंडळ*

राज्यात सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकासासाठी नागनाथ आण्णा नायकवडी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकास महामंडळ स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
-----०-----

इतर मागास व बहूजन कल्याण

*नॉन क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची केंद्राला विनंती*

नॉन क्रीमीलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची विनंती केंद्र शासनाला करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यासंदर्भात ( नॉन-क्रीमीलेअर) उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाख रुपये इतकी करण्याची शिफारस केंद्र शासनास करण्यात येईल.
-----०-----

मृद व जलसंधारण

*कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीस मान्यता*
कराड तालुक्यातील उंडाळे लघु पाटबंधारे योजनेच्या दुरूस्तीस विशेष बाब म्हणून मंजूरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ही योजना कराडपासून पंधरा किलोमीटर दूर एका स्थानिक नाल्यावर उभारावयाची असून, 2020-21च्या अतिवृष्टीत तलावाची सांडवा भिंत क्षतीग्रस्त झाल्याने यातून पाणी गळती होत असल्याने, हा निर्णय घेण्यात आला आहे.
-----०-----

कृषि

*कृषि विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांची भरती करणार*

राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांमधून क आणि ड संवर्गातील पद भरतीसाठी निर्बंध शिथील करून मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

एक विशेष बाब म्हणून ही मान्यता देण्यात येत असून, पन्नास टक्के पदे ही त्याच विद्यापीठांच्या बाधित प्रकल्पग्रस्तांकरिता राखीव ठेवण्यात येतील. चारही कृषि विद्यापीठांत 3 हजार 232 हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली असून, यामुळे बाधित झालेल्या कुंटुंबातील पात्र उमेदवाची यात भरती करण्यात येईल. ही विशेष भरती प्रक्रीया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिकेचा निर्णय, समांतर आरक्षण व सामाजिक आरक्षण याची सांगड घालण्यात येईल.
-----०-----

*जगाने अनमोल रत्न गमावले**मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली*मुंबई, दि. १०:- निखळ ...
10/10/2024

*जगाने अनमोल रत्न गमावले*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली*

मुंबई, दि. १०:- निखळ मानवता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटीची उद्योजकता यांचा दुर्मीळ मिलाफ अमुल्य असे रत्न म्हणता येईल असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे जगाने गमावले आहे. भारतीयांच्या मनातील अढळ मानबिंदू अस्ताला जाणे धक्कादायक आहे.अशी शोकमग्न प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पद्मविभूषण रतन टाटा आपल्या कर्तृत्वाने अजरामरच राहतील. पण त्यांचे अस्तित्व हे
आधुनिक भारतीय उद्योग जगतासाठी आधारवड ठरले होते, असे नमूद करून मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, टाटा या नावावरील विश्वास रतन टाटा यांनी आणखी दृढ केला.

टाटा परिवाराचे आणि मुंबईचे नाते अतूट राहीले आहे. रतन टाटा यांनी मुंबईवरही भरभरून प्रेम केले. मुंबईसाठी ते नेहमीच भरीव योगदान देत आले आहेत. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक, लोक कल्याणकारी उपक्रमाला ते नेहमीच पाठबळ देत आले आहेत. रतन टाटा यांच्याकडे उद्योजकतेची विशाल दृष्टी होती. त्यातही मानवता हा केंद्रबिंदू होता,हे त्यांच्याशी संवाद साधताना लक्षात येत राहायचे. मीठापासून ते विमानापर्यंतचा उद्योग, व्यवसाय करताना रतन टाटा यांनी मातीशी, मानवतेशी असलेल्या नात्यात कधीही अंतर येऊ दिले नाही. त्यांच्या नावाप्रमाणेच जगाने एक अमुल्य असे रत्न गमावले आहे.रतन टाटा हे नाव संपूर्ण देशाला सकारात्मक ऊर्जा देणारे, बळ देणारे होते. ते उद्योग विश्वाचे शिरोमणी होते. उद्योजकांच्या पिढ्यांना त्यांनी दीपस्तंभासारखे मार्गदर्शन केले. सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय याचे रतन टाटा हे सर्वोत्तम उदाहरण होते.

भारतासाठी आणि साहजिकच महाराष्ट्रासाठी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे निधन अपरिमित अशी हानी आहे. अशा या महान भारत सुपुत्राला

12 तारखेला  कोट्यवधींच्या संख्येने उपस्थित  रहा.भक्ती शक्ति सोहळा श्री क्षेत्र नारायणगड
09/10/2024

12 तारखेला कोट्यवधींच्या संख्येने उपस्थित रहा.
भक्ती शक्ति सोहळा श्री क्षेत्र नारायणगड

ट्रॉफी जरी सुरज चव्हाण कडे असली तरी धमाका फक्त माझ्याच नावाचा सुरू आहे - निक्की तांबोळीBig Boss Marathi Suraj Chavan Win...
09/10/2024

ट्रॉफी जरी सुरज चव्हाण कडे असली तरी धमाका फक्त माझ्याच नावाचा सुरू आहे - निक्की तांबोळी

Big Boss Marathi Suraj Chavan Winner
Nikki Tamboli

09/10/2024

Chhatrapati Sambhaji Nagar

09/10/2024

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lok News A2 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share