02/12/2025
जालन्याच्या अंबड नगरपरिषद निवडणुकीत धक्कादायक प्रकार!
पुण्यातून खास मतदानासाठी आलेल्या आनंद शिंदे यांच्या नावावर दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचे उघड झाले.
प्रभाग क्र. 1 मधील बूथ क्र. 3 वर त्यांचे मतदान झाल्याची नोंद दिसताच ते संतापले व पूर्णपणे निराश झाले.
तक्रार करूनही निवडणूक अधिकाऱ्यांचा कुठलाच प्रतिसाद नसल्याने,
आनंद शिंदे यांनी मतदान न करता परत जाण्याचा निर्णय घेतला.
मताधिकार हिरावून घेण्याचा हा प्रकार लोकशाहीला धक्का देणारा आहे.