05/08/2024
औसा नाथसंस्थानचा वार्षिक श्रावण अनुष्ठान उत्सव उत्साहात आरंभ..............................................
पहाटे काकडा, लघुरुद्र पूजा ,
महाअभिषेक, महाआरती, महाप्रसाद
पुरुष व महिलांचे बैठकी भजन,..............,...........,...................
पिठाधिपती सद्गुरु गुरुबाबांचे नित्य
प्रासादिक चक्रीभजन व प्रवचन,...........................................
औसा. दिनांक. 5.........................
सद्गुरु श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसा
यांच्या पावन परंपरेचा वार्षिक
श्रावणमास अनुष्ठान सोहळा
आज 5 ऑगस्ट रोजी मोठ्या भक्ती भावात, उत्साहात सुरुवात झाला.
पिठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात आणि सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नियोजन तथा
मार्गदर्शनात संपूर्ण श्रावण महिना नाथ संसारात नाम संकीर्तन महाप्रसाद भजन चक्रीभजन प्रवचन आणि हरिजागर अशी भक्तीची अवीट मेजवानी सर्व शिष्य भाविकांना मिळणार आहे.
आज श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी आणि दिवशी नाथसंस्थान मध्ये शिष्य तथा नवीन उपदेश गुरुमंत्र घेणाऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
सद्गुरूंच्या पावन समाधीस अभिषेकासाठी
शिष्यांची अलोट गर्दी.............................
आयाचित व्रत धारण करून पिठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज हे परंपरेच्या श्रावणानुष्ठान उपासना अत्यंत निष्ठेने सर्व शिष्यवर्गांना घेऊन करतात. आयाचित व्रत म्हणजे शिष्यांनी आणलेल्या सिध्यातून जे अन्नप्रसाद तयार केले जाते त्याचा नैवेद्य पावन सद्गुरु समाधीस आणि स्वयंभू विठ्ठलास दाखवून तोच प्रसाद स्वतःसह उपस्थित हजारो भक्त ग्रहण करतात. त्यामुळे रोज घरी खातो ते अन्न भोजन पण सद्गुरूंच्या दरबारी त्यांच्या उपासनेतून आणि सेवेतून लाभलेले अन्न हा महाप्रसाद असतो आणि असा महाप्रसाद मिळणे त्यांच्या दृष्टीने भाग्याचे ठरते ज्यामुळे आपले मन बुद्धी शुद्ध सात्विक बनते आणि ध्यान भगवं चिंतनात आणि गुरूंच्या सेवा उपासनेत प्रवाहित होते असे भोजन पंगती आरंभी ज्यांची माळ व अन्नदान सेवा होती अशांचा सत्कार करताना सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज यांनी आपले विचार व्यक्त केले.
सेवेचे फळ निश्चितपणे मिळतेच
श्री गुरुबाबा महाराज.........................,.............
प्रत्येक मनुष्य जीवाने सत्संगती सदाचार नामस्मरण भजन गुरु सेवा आणि नित्यनेम करणे आवश्यक असून नामस्मरण सेवा साधना आणि उपासनेत व्रतस्थ राहण्यासाठीच पूर्वजांनी श्रावणमासाचे हे अनुष्ठान आपणास प्रसाद मिळून दिले आहे
ज्यांची जशी शक्ती त्याप्रमाणे त्यांनी सेवा रुजू केली पाहिजे हे कर्तव्य असून गुरूंच्या उपदेशाचे अनुकरण पालन जतन करीत केलेला परमार्थ भगवंतास रुजू होतो आणि त्याचे पुण्य पदरी पडते, प्रत्येकास आपल्या हातून झालेल्या सेवेचे फळ निश्चितपणाने लाभते असा विश्वास आणि भरवसा सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांनी प्रथमदिनी भाविकांशी संवाद करताना व्यक्त केला.
भोजन महाप्रसादाच्या महापंगतीनंतर
महिला भजनी मंडळाचे बैठकी भजन त्यामध्ये आज नाथ मंदिर भजनी मंडळ औसा यांची भजनाची सेवा दुपारी दोन ते चार संपन्न झाली. तदनंतर पुरुष भजनी मंडळाचे बैठकी भजन झाले
सायंकाळी ठीक सहा वाजता स्वयंभू श्री विठ्ठलाची धुपारती सोहळा संपन्न झाला आणि सायंकाळी 7.30 ते 8.30 दरम्यान सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या प्रासादिक चक्रीभजनाची सेवा चिरंजीव ह भ प श्री ज्ञानराज गुरुबाबा महाराज औसेकर यांनी नाथ मंदिरात रुजू केली आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीवर रसाळ असे निरूपण करून उपस्थित शिष्य भक्त वारकऱ्यांना तृप्त केले.
Daily Gurudharm News Gahininath Maharaj fan club Santosh Somwanshi - संतोष सोमवंशी Abhimanyu Pawar Rohit Hanchate