07/04/2023
मा. बाबा आमटे यांना बालतरूंची पालखी काढून निसर्गाचा सर्जनोत्सव साजरा करावयाचा होता. त्यांच्या इच्छेनुसार हे संदर्भगीत मंगेश पाडगावकर यांनी रचले. जिप्सी या त्यांच्या काव्य संग्रहातील ह्या गीतात हिरव्या तृणपात्याच्या रूपाने धरणीची सर्जनेच्छा मूर्तरूप झाली आहे.
मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होऊन परतलेल्या नचिकेताप्रमाणे या तृणपात्याचा जन्म मरणावर मात करून होतो. सुकलेल्या धरणीची ही नवी आशा म्हणून हे नचिकेताचे साकार स्वप्न!
कवी: मंगेश पाडगावकर
संगीत: रोहित प्रभुदेसाई
स्वर: सारंगी प्रभुदेसाई
संगीत संयोजन, साऊंड रेकॉर्डिस्ट: विनीत जोशी
ध्वनिमुद्रण: स्वर आरास साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ, बदलापूर
व्हिडिओ एडिटिंग: आरोही प्रभुदेसाई
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा!!☘️