Badlapur Voice

Badlapur Voice BADLAPUR VOICE - आवाज बदलापूरचा
पर्व निर्भीड विचारांचे

BADLAPUR VOICE - आवाज बदलापूरचा.

बदलापूर शहर तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक घडामोड, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक बातमी, बदलापूर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी BADLAPUR VOICE - आवाज बदलापूरचा कायम प्रामाणिक प्रयत्न करत राहिलं.

*पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू**मृतांच्या नातेवाईकांना मदतीस...
22/04/2025

*पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू*

*मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर*

ठाणे, दि.२२(जिमाका): जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे.
पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी,संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे.
या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 / 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी.
त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी २४x७ मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे.
या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:
दूरध्वनी क्रमांक:
०१९४-२४८३६५१
०१९४-२४५७५४३
व्हॉट्सॲप क्रमांक:
७७८०८०५१४४
७७८०९३८३९७
अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
0000000000

 #विधानसभानिवडणूक२०२४महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर२० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार
15/10/2024

#विधानसभानिवडणूक२०२४

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर
२० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार

15/10/2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २० नोव्हेंबरला होणार

अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन;५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14/10/2024

अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन;५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा देव माणूस हरपला...Pride Of India 🙏जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे...
09/10/2024

देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा देव माणूस हरपला...

Pride Of India 🙏

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!🙏💐

#रतनटाटा

महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची हृदय जिंकणारा सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी'च्या या पर्वाचा महाविजेता!
06/10/2024

महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची हृदय जिंकणारा सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी'च्या या पर्वाचा महाविजेता!

ठाणे - अक्षय शिंदे गोळीबार प्रकरणी मृत्यू संदर्भात ठाणे पोलिसांनी प्रसिद्ध केला हा घटनाक्रम...
23/09/2024

ठाणे - अक्षय शिंदे गोळीबार प्रकरणी मृत्यू संदर्भात ठाणे पोलिसांनी प्रसिद्ध केला हा घटनाक्रम...

राजकारण नको!
21/08/2024

राजकारण नको!

बदलापूरचे शिवसेनेचे मा. नागराध्यक्ष राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदाराच्या भेटीला...भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदा...
18/06/2024

बदलापूरचे शिवसेनेचे मा. नागराध्यक्ष राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदाराच्या भेटीला...

भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आज बदलापूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान बदलापूर शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येमुळे बदलापूरच्या नागरी जीवनात पडणारा सुख सुविधांचा अभाव या सगळ्या गोष्टी खासदारांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष अँड प्रियेश रमेश जाधव यांनी खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांची भेट घेतली. या भेटीत बदलापूरकर नागरिकांना उद्भवत असलेल्या समस्या जाधव यांनी खासदार म्हात्रे यांना सांगून समस्यांचे पत्रक ही त्यांना सुपूर्त केले. लवकरात लवकर या नागरी समस्यांचे निराकरण करून बदलापूरकर वासियांना आशेचा धीर द्यावात अशी विनंती यावेळी मा. नगराध्यक्ष जाधव यांनी खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या जवळ केली आहे.

Priyesh Jadhav

16/03/2024

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?👇◾️

◾️पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

Address

Shop No. 02 , Dipti Apartment, Near Ruchira Hotel, Katrap
Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Badlapur Voice posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Badlapur Voice:

Share