Adarsh Badlapur

Adarsh Badlapur Adarsh Badlapur

12/07/2023
05/05/2023

लवकरच आपल्या भेटीला येत आहे

27/02/2023
16/01/2023

*कोंकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत*
*आठ उमेदवार रिंगणात*
नवी मुंबई, दि.16 :- कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत दि. 13 जानेवारी ते दि.16 जानेवारी 2023 या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.
मा. भारत निवडणूक आयोगाकडील दिनांक २९/१२/२०२२ राजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीच्या जाहिर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार 5 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कालावधीत छाननी दरम्यान एकूण 13 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरवून स्विकृत करण्यात आले होते. त्यापैकी 1) कडू वेणुनाथ विष्णु, अपक्ष 2) घोन्साल्वीस जिमी मतेस, अपक्ष 3) बळीराम परशुराम म्हात्रे, अपक्ष 4) बाळाराम गणपत पाटील, अपक्ष, 5) ज्ञानेश्वर पुंडलिक म्हात्रे, अपक्ष, या पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज जागे घेतले आहेत.
वर नमूद पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या आठ झाली आहे. ते पुढील प्रमाणे 1) म्हात्रे ज्ञानेश्वर बारकु, भारतीय जनता पार्टी, 2) धनाजी नानासाहेब पाटील, जनता दल (युनायटेड ), 3) उस्मान इब्राहिम रोहेकर, अपक्ष, 4) तुषार वसंतराव भालेराव,अपक्ष, 5) देवरुखकर रमेश नामदेव, अपक्ष 6) बाळाराम दत्तात्रेय पाटील, अपक्ष, 7) प्रा.सोनवणे राजेश संभाजी, अपक्ष, 8) संतोष मोतीराम डामसे, अपक्ष असे आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान सोमवार दि. 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.


000 000

25/11/2022

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या 1 लाखापर्यंतच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या वतीने राज्यातील अनुसूचित जातीतील नागरिकांसाठी 01 लाखापर्यंतची थेट कर्ज योजना सुरू झाली आहे, या योजनेसाठी 23 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील १२ पोटजाती मांग, मातंग, मिनीमादीग, मादींग, दानखणी मांग, मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांग गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील १८ ते ५० वर्षे या वयोगटातील दारिद्रय रेषेखालील बेरोजगारांकरिता ही योजना लागू आहे.

महामंडळाची 01 लाख रुपये प्रकल्प मर्यादा असलेली थेट कर्ज योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ठाणे जिल्हयाकरिता 50 जणांना कर्ज देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील. राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना तसेच सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसापैकी एका सदस्यास प्राधान्य देण्यात येईल.

कर्ज योजनेच्या अर्जाकरिता खालील पात्रता व अटी / शर्ती व निकषांची पुर्तता करणारा अर्जदार पात्र राहील. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. मातंग समाज व त्यातील १२ पोटजातीतील असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे.अर्जदाराचा सिव्हिल क्रेडिट स्कोअर ५०० असावा. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ३ लाख यापेक्षा जास्त नसावे.एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल. व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव / प्रशिक्षित असावा.महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरूप असलेली आवश्यक ती कागदपत्रे/प्रमाणपत्रे/करारपत्रे/कर्जमागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

इच्छुकअर्जदारांनी महामंडळाच्या ठाणे येथील जिल्हा कार्यालयाच्या जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय, 5 वा मजला, ठाणे 400601. (दूरध्वनी क्रमांक 022-25388413) या पत्त्यावर दि. 24 नोव्हेंबर 2022 ते 20 डिसेंबर 2022 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले आहे.

Address

Badlapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adarsh Badlapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adarsh Badlapur:

Share