24/09/2024
भाजप नगरसेवकांचं हेंद्रपाड्यात फुगडी घालुन एन्काऊंटर साजरा
बदलापुर शहरात आजही अनेकांमध्ये मानवाधिकार बाबत शुन्य ज्ञान
बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- काल दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी पोलीसांनी बलात्कारीचे आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा येथील कारागृहातुन दुसर्या गुन्ह्याच्या तपासासाठी ट्रान्सिट ने आणत असतांना मुंब्रा बायहास हायवेवर एंकाऊंटर केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहिती व घडलेला प्रकार पाहिल्यावर सर्वचजण हे महाराष्ट्र पोलीस खात्याकडून फेक एंकाऊंटर करण्यात आले आहे असे समजते. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात व देश भरात भारतीय पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह आणि टिका होत आहे.
हे असे होत असले तरी ज्या शहरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली त्या शहरातील भाजप पक्ष मात्र या संधीला अतिशय चांगल्या प्रकारे राजकारणात वापरत असल्याचे दिसुन आले. भाजप वरिष्ठ नगरसेवक व पालिकेतील इमारतीच्या घोटाळ्यातील आरोपी (जामिनावर बाहेर असलेले) राजेंद्र घोरपडे, त्यांच्या पत्नि व माजी नगरसेविका भाजप पदाधिकारी रुचिता घोरपडे, सौ. निशा घोरपडे, सौ. अंकिता घोरपडे, अशोक घोरपडे, अण्णा कुलकर्णी व इतर भाजप पदाधिकारी हेंद्रेपाड्यातील आर्ट गॅलरी जवळ फटाक्याची आतिशबाजी करत अक्षय शिंदे याचा मृत्यु साजरा करत आहेत. विशेष म्हणजे त्यावेळी परिसरातील नागरिकांना आकर्षण करण्यासाठी स्विकर वगैरे लाऊन सरकार व पोलीसांकडून कशाप्रकारे चांगले काम करण्यात आले हे सांगण्याचा भाजप पदाधिकार्यांनी प्रयत्न केले. भाजप बदलापुर महिला नगरसेविकांनी फुगडी घालत आपला आनंत व्यक्त केला.
भाजप महिला नगरसेविका रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देतांना सांगितले कि, खुप आनंद झाला आहे. शेवटी आमच्या कायद्यामध्ये फाशीची तरतुद नाही आहे हे आम्हाला माहित होत, लोकशाही तंत्र आहे आपल्याकडे पण सगळ्यांची मागणी होती कि अश्या कृत्य करणार्या माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचं आयुष्य संपलं पाहिजे आणि सगळ्यांचीच मागणी होती. खुप मोठं आंदोलन बदलापुरात झालं होत. सरकारचेे पण खुप धन्यवाद त्यांनी हा निर्णय घेतला.
महिला नगरसेविका सौ. निशा घोरपडे यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रियेत आंदोलनकर्त्या महिलांचे आभार मानतत आज त्यांच्या आंदोलनाची चिज झाली अक्षय शिंदे एंकाऊंटरमुळे असे सांगत महिलांना ज्याप्रकारे लाडकी बहिण योजनेमार्फत पैसे मिळाल्यावर आनंत होतो अगदी त्याचप्रमाणे एंकाऊंटरच्या बातमीमुळे आनंद झाला आहे असे त्या म्हणाल्या.
एका स्थानिक महिलेने अतिशय आकर्षक अशी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या कि अशाच प्रकारे जे पेंडींग गुन्हे ज्यांच्यावर ही आहे त्यांनाही अशीच शिक्षा झाली पाहिजे.
त्याठिकाणी उपस्थित असलेल्या काही तरुणींनी व विद्यार्थींनी सांगितले कि, पोलीसांची जे केलं ते योग्य होतं व यामुळे भविष्यात कोणी छेड काढणार नाही मुलींची.
ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व कांग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांवर टिका करत पोलीसांनी जे काही केलं ते योग्य असे म्हणत विरोधी पक्षाने सुद्धा पोलीसांचे मनोबल वाढविले पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली.
विशेष म्हणजे हे तेच राजेंद्र घोरपडे आहेत ज्यांच्यावर कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या इमारतीच्या घोटाळ्याचे आरोप लागले होते व आर्थिक घोटाळ्यात गुन्हा दाखल होता. त्यावेळी शहरातील नागरिकांनी भ्रष्ट नेत्यांविषयी संताप व्यक्त केले होते व राजेंद्र घोरपडे अटकपुर्व जामिन मिळवण्यासाठी फरार झाले होते. बदलापुरातील जागृक नागरिकांनी बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले कि, जर पोलीसांनीच न्यया द्यायचं असेल तर कुळगांव बदलापुर नगरपरिषदेत आजवर ज्या ज्या नेत्यांनी घोटाळे केले, जनतेच्या पैश्यांचा अपहार केला त्यांना ही एंकाऊंटरमध्ये ठार केलं तर चालेल का? त्यावेळेस राजकिय नेत्यांना कायद्याची आठवण येते आणि न्यायपालिकेत जामिन मागण्यासाठी जातात आणि तोच गुन्हा एखाद्या पैश्याने कमी असलेल्याने केला ज्याची जामिन घेण्याची किंवा कोर्टात वकिल नेमणुक करण्याची ऐपत नाही तर त्याला जन्मठेप ऐवजी पोलीसांकडून फेक एंकाऊंटर मध्ये मारुन टाकणे हे कितपत योग्य आहे.
हेंद्रेपाड्यातील इतर ही नागरिकांनी दबक्या आवाजात म्हटले कि, आज ज्याप्रकारे अक्षय शिंदेच्या मृत्युवर इथे ढिंगाणा सुरु आहे त्याने खरोखरच पिडीतेला व तिच्या कुटुंबियाला न्याय मिळणार आहे का? हेंद्रेपाड्यात ज्याप्रकारे विविध समस्या रहिवाश्यांना भेडसावत आहेत ते जर यापुढे समस्या सुटले नाही तर जनतेने देखील त्या त्या स्थानिक लोकप्रतिनिधींची आणि पालिकेतील अधिकार्यांची एंकाऊंटर करण्याची मागणी केली तर चालेल का?
एकुणच फेक एंकाऊंटरने दोषी जरी मेला तरी दोष काही मरत नाही. दोष मिटवण्यासाठी कायद्याप्रमाणेच न्याय मिळते. आज ज्याप्रकारे बदलापुरचे भाजप पदाधिकारी जल्लोष साजरा करत आहेत त्यातील एकही लोकप्रतिनिधी जेव्हा बलात्काराची घटना घडली व सामान्य नागरिक बदलापुर रेल्वे स्थानकात उतरुन आंदोलन करत होते त्यांच्या पाठींबा देण्यासाठी आले नव्हते. म्हणजे तुम लढो हम कपडा संभालते है जी अवस्था बदलापुरातील भाजप कडून पाहायला मिळते. आंदोलन करणारे आज ही अनेक जर तुरुंगात व बलात्काराच्या मृत्युच्या बातमीने मात्र स्थानिक पातळीवर राजकारण आणि प्रसार कार्य सुरु असुन ह्यामुळे स्थानिक मतदारांना राजकारणी समजतात तरी काय? हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
विशेष म्हणजे जल्लोष करणार्या एकाही व्यक्तिने अद्याप त्या भाजप पदाधिकार्यांकडून चालवण्यात येणार्या आदर्श शाळेतील विश्वतांना अटक करा अशी मागणी केलेली नाही. त्यामुळे हा खरोखरच पिडीतेच्या न्याय देण्यासाठी जल्लोष कि राजकिय पोळी भाजण्यासाठी असा प्रश्न आता जागृक नागरिक विचारत आहेत.