MI BADLAPURKAR

MI BADLAPURKAR Educational , Cultural , Political , Social Events, news updates of Badlapur and nearby locations.

आपले सरकार पोर्टल आणि ऑनलाइन तक्रार प्रणालीक्यूआर कोड स्कॅन करून थेट संकेतस्थळावर प्रवेश करता येईल.
04/08/2026

आपले सरकार पोर्टल आणि ऑनलाइन तक्रार प्रणाली

क्यूआर कोड स्कॅन करून थेट संकेतस्थळावर प्रवेश करता येईल.

औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्र समृद्ध करण्यात मोलाचे योगदान देणारे विको लॅबोरेटरीजचे संचालक सुमंत पेंढरकर यांचे ...
03/08/2026

औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्र समृद्ध करण्यात मोलाचे योगदान देणारे विको लॅबोरेटरीजचे संचालक सुमंत पेंढरकर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे डोंबिवलीसह उद्योग विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पेंढरकर कुटुंबाचा आणि विको लॅबोरेटरीजचा डोंबिवली शहराशी गेली तीन ते चार दशके अतूट संबंध राहिला आहे. डोंबिवलीतूनच विकोने आपल्या दर्जेदार आयुर्वेदिक उत्पादनांच्या बळावर देश-विदेशात नाव कमावत जागतिक स्तरावर यश मिळवले.

डोंबिवलीच्या जडणघडणीत पेंढरकर कुटुंबाचा मोलाचा वाटा असून, त्यांच्या कार्याबद्दल शहर कायम ऋणी राहील. सुमंत पेंढरकर यांच्या निधनाने डोंबिवलीने एक दूरदृष्टीचा उद्योगपती आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या स्मृतींना विविध क्षेत्रांतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

कोकणवासियांचा प्रवास होणार अधिक सुकरछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्स्प्रेसला मंजुरीनवी दिल्...
02/08/2026

कोकणवासियांचा प्रवास होणार अधिक सुकर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी

नवी दिल्ली, दि. १ : महाराष्ट्र आणि कोकण विभागातील प्रवाशांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. सुमारे ५१० किलोमीटर अंतर व्यापणाऱ्या या नव्या सेवेमुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीदरम्यान जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर रेल्वे संपर्क अधिक सक्षम होणार आहे.

नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस या गाडीचा क्रमांक १५०८७, तर परतीच्या दिशेने धावणाऱ्या सावंतवाडी रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस या गाडीचा क्रमांक १५०८८ असा असेल. ही एक्स्प्रेस दररोज धावणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, वैलिवाडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या प्रमुख स्थानकांवर व्यावसायिक थांबे देण्यात आले आहेत.

या नव्या रेल्वे सेवेमुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रवाशांना अधिक सुलभ, जलद आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः दक्षिण कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे तसेच निसर्ग पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही सेवा मोठी दिलासादायक ठरणार आहे. त्याचबरोबर मुंबईत शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि अन्य कामानिमित्त नियमित प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि कोकणवासियांना या सेवेचा मोठा लाभ होणार आहे.

या निर्णयामुळे कोकणातील पर्यटन, व्यापार, उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळण्यास मदत होणार असून, वाढत्या प्रवासी मागणीची पूर्तता करण्याबरोबरच संतुलित प्रादेशिक विकास आणि सर्वसमावेशक रेल्वे संपर्क विस्तारण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.

MPSC टॉपर ते ४५ लाखांची लाच... प्रशासनातील या वास्तवावर काय बोलावं? 😡​२०१६ च्या MPSC परीक्षेत एसटी प्रवर्गात राज्यात प्र...
01/08/2026

MPSC टॉपर ते ४५ लाखांची लाच... प्रशासनातील या वास्तवावर काय बोलावं? 😡

​२०१६ च्या MPSC परीक्षेत एसटी प्रवर्गात राज्यात प्रथम आलेले आणि विभागीय वन अधिकारी (DFO) पदावर कार्यरत असणारे श्रीनिवास लखमवार यांना ४५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे

​अतिशय मेहनतीने, जिद्दीने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासनात उच्च पदावर पोहोचलेल्या अधिकाऱ्याकडून ही अपेक्षा नक्कीच नव्हती. जनतेच्या सेवेसाठी मिळालेल्या अधिकारांचा वापर जेव्हा अशा भ्रष्ट मार्गासाठी होतो, तेव्हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो तरुण-तरुणींच्या विश्वासाला तडे जातात.

​स्पर्धा परीक्षेत टॉपर येणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकीच पदावर आल्यावर नैतिक मूल्यं जपणीही गरजेची आहे!
​या प्रकरणी कडक कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून प्रशासनातील भ्रष्टाचाराला आळा बसेल.

​तुमचं काय मत आहे यावर? कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇

कुबनपा चे अतिक्रमण विभाग प्रमुख व काही राजकीय व्यक्तींच्या संगनमताने बदलापूर पूर्व परिसरातील गांवदेवी डिपी रोड या मुख्य ...
31/07/2026

कुबनपा चे अतिक्रमण विभाग प्रमुख व काही राजकीय व्यक्तींच्या संगनमताने बदलापूर पूर्व परिसरातील गांवदेवी डिपी रोड या मुख्य रस्त्यावर प्रति गाडी काही शे रुपये जमा करून सोमवारी आठवडे बाजार सुरू .

सबंध रस्त्यावर एकूण 50 ते 60 विक्रेते असल्याने नागरिकांना त्रास झाला तरी पालिकेच्या सोमवारच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे .

Ruchita Rajendra Ghorpade
Collector Thane
Kulgaon Badlapur Municipal Council

Kulgaon Badlapur Municipal Council

बदलापूर शहरातील मजीप्रा कडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यासंदर्भात 👇सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण चांगले असल्याने व पाणी पातळीत पुर...
31/07/2026

बदलापूर शहरातील मजीप्रा कडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यासंदर्भात 👇

सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण चांगले असल्याने व पाणी पातळीत पुरेशी वाढ झाल्याने केलेली पाणी कपात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत रद्द करण्यात येत आहे. तरी म.जी. प्रा मार्फत होणारा पाणीपुरवठा हा नियमीत व योग्य त्या दाबाने होणार आहे.

व्यक्ती नव्हे, व्यवस्था अन्नातील भेसळ हा केवळ कायद्याचा विषय नाही; तो लाखो कुटुंबांच्या आरोग्याचा, भावी पिढ्यांच्या सुरक...
09/07/2026

व्यक्ती नव्हे, व्यवस्था

अन्नातील भेसळ हा केवळ कायद्याचा विषय नाही; तो लाखो कुटुंबांच्या आरोग्याचा, भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेचा आणि समाजाच्या नैतिकतेचा प्रश्न आहे.
व्यक्ती नव्हे, व्यवस्था मजबूत झाली पाहिजे.

उल्हासनदी - बदलापूर सद्यस्थिती 👇उल्हासनदी इशारा पातळीच्या वर.दिनांक: 08/07/2026वेळ :  संध्या. 6:00  वाजता
08/07/2026

उल्हासनदी - बदलापूर सद्यस्थिती 👇

उल्हासनदी इशारा पातळीच्या वर.

दिनांक: 08/07/2026
वेळ : संध्या. 6:00 वाजता

उल्हासनदी - बदलापूर सद्यस्थिती 👇उल्हासनदी इशारा पातळीच्या वर.दिनांक: 08/07/2026वेळ :  संध्या. 5:00  वाजता
08/07/2026

उल्हासनदी - बदलापूर सद्यस्थिती 👇

उल्हासनदी इशारा पातळीच्या वर.

दिनांक: 08/07/2026
वेळ : संध्या. 5:00 वाजता

उल्हासनदी - बदलापूर सद्यस्थिती 👇उल्हासनदी इशारा पातळीच्या वर.दिनांक: 08/07/2026वेळ :  दुपारी 4:00  वाजता
08/07/2026

उल्हासनदी - बदलापूर सद्यस्थिती 👇

उल्हासनदी इशारा पातळीच्या वर.

दिनांक: 08/07/2026
वेळ : दुपारी 4:00 वाजता

Address

Badlapur
421503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MI BADLAPURKAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MI BADLAPURKAR:

Shortcuts

Share

Category