गोधन एक गो सेवा

गोधन  एक गो सेवा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from गोधन एक गो सेवा, GODHAN EK GO SEVA . . . Lawate farm , near amdar nivas, Badlapur.

26/05/2021
19/07/2020

गोधन गीर गाई गोशाळा ....आमचा गाई निवांत चरताना

आमच्या गो शाळेत नवीन सदस्य आला आहे .... राधा नाव ठेवले आहे तिचे
13/06/2019

आमच्या गो शाळेत नवीन सदस्य आला आहे .... राधा नाव ठेवले आहे तिचे

19/05/2019

गोधन ... मार्फत शुद्ध आणि सात्विक देशी गीर गाई चे तूप उपलब्ध आहे.... किमंत १८००/ किलो

Send a message to learn more

गोधन ..... फार्म ... आमचा येथील गिर गयी
29/04/2018

गोधन ..... फार्म ... आमचा येथील गिर गयी

17/01/2018

भारतीयांनो वेळीच सावध व्हा ... आणि हा विडिओ पहा

10/01/2018

गोधन.... एक गो सेवा
बदलापूर रहातोलो रोड वर गीर गाईचा फार्म ....
दिवसेंदिवस आपल्या गीर देशी गाई लोप पावत चालल्या आहेत. त्याची जागा विदेशी जर्सी गाई ने घेतली आहे . जर्सी गाई चा दुधात A1 प्रोटीन आहे जे डायबेटीस, कॉलेस्ट्रोल, लहान मुलं मध्ये मंद बुद्धि, लठ्ठपणा असे आजार होतात हे सगळ्या नि मान्य केले आहे. ह्या उलट देशी गाई चे दूध हे पचायला हलके, 22 महत्वाची खनिजे , A2 प्रोटीन युक्त ज्यामूळे डायबेटीस, कॉलेस्ट्रोल सारखे आजार नियंत्रित होतात.
देशी गाई चा तुपास तर आयुर्वेदिक मध्ये अनन्य साधारण महत्व आहे.
तसेच ह्या गाई पासून मिळणाऱ्या गोमूत्र आणि शेणा चा वापर करून विषमुक्त आणि सेंद्रीय अन्नधान्य आम्ही पिकवतो.
देशीं गाई चा दूध साठी आम्हला संपर्क करावा...

पराग लवाटे 8380094986

गोधन चा नवीन सदस्य ......
19/12/2017

गोधन चा नवीन सदस्य ......

05/12/2017

देशी गाईच्या दुधाचे मनुष्य शरीरास फायदे*

आजकाल वाढत चाललेल्या आरोग्य विषयक तक्रारी ,
अनेक नवनवीन विकार हे दुधाची देणं आहेत असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही .
अर्थात दुधाला आपण अमृत मानतो पण ते कोणत्या ?
हेच आपण आजकाल विसरत चाललो आहे व दूध म्हणून नसत्या प्राण्यांचे विषासम दूध { विष } पिऊन आपण आपले व आपल्या भावी पीडीचे आयुष्य धोक्यात घालत आहोत .
दूध म्हणजे नक्की काय ? त्याचे फायदे काय ?
नुसता पांढरा कलर म्हणजे दूध अशी अंधश्रद्धा आज रूढ झालेली आहे .
युरिया युक्त दुध , नकली दूध , कोणत्याही तुच्छ प्राण्यास गाय असे नाव देऊन त्यापासून घेतलेले दूध ,म्हशीचे दूध
अश्या अनेक कॅटेगिरी मागील काही वर्षांच्या आपल्या देशी गाई प्रति असलेल्या उदासीनतेची मूर्तिमंत उदाहरण मानता येतील .

कारण आमच्या पिढीने देशी गाईचं नाही पहिली तर तिचे दूध वगैरे गोष्टी तर स्वप्नवतच .

परंतु आजकाल लोकांचा अव्हेरनेसपणा या बाबतीत कमालीचा वाढत आहे व ह्याचे श्रेय काही अंशी का होईना,
"दुधातील राक्षस " { डेव्हील इन द मिल्क " या पुस्तकास जाते .

यातून अ१ व अ२ हे प्रकार आपल्या समोर आले ज्यामुळे आपणास अ१ टाईप दुधातील असलेले दुष्परिणाम व अ२ टाईप दुधात असलेले उपयुक्त घटक आपण समोर येऊ शकले.
इंटरनेट युग मुळे जवळपास सर्वांच्या मोबाईल वर हा मेसेज पोचलाच आहे की त्याचे परिणाम काय ते म्हणून इथे अधिक प्रपंच मांडत नाही .

इथे आपण त्याचे काही भयानक तोटे व उपयुक्त फायदे यावर लक्ष देऊया
अ१ गाय च्या विषारी दूध संबंधित विविध समस्या

- आत्मकेंद्रीपणा,
- मधुमेह
- अर्भकाचा अचानक मृत्यू
- आतड्याच्या सुजेने होणारा अल्सर,
- इन्फर्टेलिटी
- ह्रदयाचा समस्या
- कॅल्शियमचे क्षार साठने ,
- मानसिक विकार
- पार्किंसॉन्स
- स्क्रीझोफ्रेनिया.
- लठ्ठपणा

अश्या अनेक समस्या या दुधाने होतात .
न्यूझीलंड सारख्या प्रगत देशांनी याच्या विक्रीवर बंदी केली आहे .

अगदी अलीकडे गुजरात सरकारने सुद्धा याबाबतीत विचार केला आहे .
जे दूध अ१ प्रकारचे आहे त्याच्या पिशवीवर स्पष्टपणे असा उल्लेख असावा " सदर दूध आरोग्यास हानिकारक आहे "
या वरून आपल्याला याची घातकता स्पष्ट्पणे लक्षात येते ..

आज काल वाढलेले नैराश्य,स्वार्थी वृत्ती , आत्महत्या ,अत्याचार या सर्वांच्या वाढीवर याचाही फरक आहे असेही पाहण्यात येते .

साधारण आपण जे दूध पितो त्याचे गुणधर्म आपल्या अंगी येतात हे तर आपण पूर्वंपार पाहत अनुभवत आलो आहोत.

या प्राण्यांचे जरा गुणधर्म तपासून ,अभ्यासून पहा आपोआप आपल्याला सर्व कळून जाईल .

अ१ टाईप प्राणी
१ हे कधीही खुश नसतात
२ कितीही खायला घातले तरी असमाधानी
३ स्वैराचारी वृत्ती
४ माया ,प्रेम ,आपुलकी अजिबात नाही
५ घाणीत राहतात ,अंगाला अतिशय दुर्गंधी

याच्या शरीरातील हेच गूण त्या दुधात उतरतात ,

या उलट अ२ टाईप च्या गाई

ज्यांना आपण आपल्या संस्कृती मध्ये मातेचे स्थान दिलेले आहे .
यांच्या कडे पाहल्यावर एक वेगळीच अनुभूती मिळते .
१ अत्यन्त माया .ममता ,करुणा पूर्ण डोळे
२ गळ्यात रुळणारी भरजरीत गलकम्बल
३ नाद मधुर असे हंबरणे
४ सर्वात महत्वाचे त्यांना प्रदान झालेले वशिंड

देशी गाईंना जे काही महत्व आहे ते याच मूळे ,
याचे अंतर्गत एक अशी नाडी आहे जिला सूर्यकेतू नाडी असेही सम्बोधले जाते .

सूर्यापासून मिळणारा प्रकाश घेऊन त्याचे योग्य असे "सुवर्णक्षरात" रूपांतरण करून आपल्या दूध रुपी अमृतात ते ती सोडत असते
तसेच चन्द्रकेतू नाडी सुद्धा संध्याकाळच्या वेळेत चंद्राचा प्रकाश घेत असते व ते आपल्या कासे कडे प्रेषित करत असते.

प्रत्येक देशी गाई मध्ये हे पाहण्यात येतेच परंतु गीर गाईच्या या दोन्ही नाड्या अतिशय जास्त सुस्पष्ट व सुबक दिसतात.

ज्यांच्या कडे गीर गाय आहे त्यांना अनुभव असेल या जातील एक विशेष सवय आहे ती म्हणजे सरा {भाला} बांधणे .
अनेक वेळा नवीन गाय घेणाऱ्यांना पाय बांधायला लागणारी गाय म्हणजे दगेखोर पणाचे लक्षण असे वाटून ते लोक अश्या गाई टाळतात.

परंतु त्यामागे सुद्धा काही शास्त्रीय कारण असते ते हे लोक जाणून घेत नाहीत किंबहुना अनेक लोकांना ते माहित सुद्धा नसते .

सरा का बांधावा ? जर आपण नीट निरखून पहिले तर गीर गाईच्या दोन्ही पायांवर {मांडीजवळ} मोठ्या नाड्या आपल्या दृष्टीस येतात
ज्यातील उजव्या बाजूची सूर्य व डाव्या बाजूची चंद्र नाडी असते .

ज्यावेळी आपण त्यांचे पाय बांधतो तेव्हा ते अश्या स्वरूपात बांधायचे असतात कि त्या दोन्ही नाड्या प्रेस होतील व त्या दोरीची गाठ तिच्या डाव्या पायावरील नाडीवर बांधली जाईल .

यामुळे त्या ऍक्टिव्ह होऊन त्यांच्या दुधात पूर्ण क्षमतेने सूर्य,चन्द्र गुण येतात { याची प्रात्यक्षिक घेतलेली आहेत }

या सोबत या गीर गाई एका अश्या जागेवर स्थित आहेत कि जिथून पृथ्वीचा मध्यार्ध सुरु होतो
*सोमनाथ प्रांत*
त्यामुळे नैसर्गिक पणे त्या सूर्य तत्वाशी जास्त निगडित राहतात .

यामुळेच मध्ये झालेल्या गीर वरील संशोधनातून सुद्धा हे सिद्ध झाले कि इतर गाईच्या मानाने यांच्यातील सुवर्णक्षार जास्त ऍक्टिव्ह असतात .

*सर्वच गाई उत्तम असतात परंतु गीर मध्ये आम्हाला जास्त तत्वे आढळली याचा अर्थ आम्ही फक्त गिरलाच पब्लिश करतोय असा घेऊ नये*

आता दुधातून मिळणारे चांगले परिणाम पाहूया

गाईचे दूध व त्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधिगुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.

गाईच्या दुधात २१ प्रकारची अमिनो ‌‍‍असिडे, ११ प्रकारचे फॅटी असिडे, ६ प्रकारची व्हिटॅमिने, २५ प्रकारची धातुजन्य तत्त्वे, २ प्रकारची साखर, ४ प्रकारचे फॉस्फरस व ११ प्रकारची नायट्रोजन तत्त्वे आढळून येतात .

गायींच्या दुधात कर्करोगासारख्या रोगांवर उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण घटक ‘ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिड’ असतो.
विपर्यास म्हणजे या रोगावर औषध म्हणून ‘ओमेगा-६’च्या निर्मितीसाठी एक मोठा उद्योग विकसित झाला आहे. ते ‘कॅप्सूल’च्या स्वरूपात विकले जाते; परंतु आपल्या भारतीय गायींच्या दुधात निसर्गतः उपलब्ध असलेल्या या घटकाकडे आपण दुर्लक्ष करत आहोत.

स्मरणशक्ती वाढवायला गायीचे दुध उत्तम आहे .

मातेनंतर फक्त गाईचेच दूध बाळाला योग्य मानवते .
तेजस्विता व शीतलता वाढते { अनेक वेळेस देवतत्वाला सुद्धा दुधाने अभिषेक घातला जातो .

अग्निवरील १० ग्रॅम देशी गाईच्या तुपात देशी गाईचे दूध घातल्यास उत्पन्न होणार वायू किमान १६०० kg प्राणवायू शुद्ध करतो .
*ज्याला प्रवर्ग्य असे म्हणतात*
यावर रशियात संशोधन होत आहेत .

असे एक न अनेक चांगले फायदे देशी गाईच्या दुधातून मिळतात या व्यतिरिक्त पंचगव्य हा विषय तर सर्व गणितच बदलू शकेल असा आहे या विषयी कालांतराने पाहू .

म्हणूनच आजपासून इतर प्राण्यांचे दूध पिणे बंद करून आपल्या देशी गाईचेच दूधरुपी अमृत पिणे सुरु करा

मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती  काळजीपूर्वक वाचा.🔸तुमच्या घरी रोज येणारे दूध  🍼हे A1 प्रकारचे आहे  की A2 प्रका...
13/11/2017

मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती काळजीपूर्वक वाचा.
🔸तुमच्या घरी रोज येणारे दूध 🍼हे A1 प्रकारचे आहे की A2 प्रकारचे आहे हे जाणून घ्या.कारण ते तुमच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम करु शकते.
🔸A1 दुध आणि A2दूध म्हणजे नक्की काय ?????
दुधामधे प्रथीने( proteins ) असतात.प्रथीने केसीनपासून बनतात.ह्या केसीनमधे अमिनो आम्ले ( amino acids ) असतात.दुधामधील केसीनच्या प्रकारावरुन दुधाचे दोन प्रकार पडले आहेत A1दूध आणि A2 दूध .
🔸A1 दूध - विदेशी वंशाच्या काउ संबोधल्या जाणारया 🐄जर्सी , होल्स्टेन फ्रीजीयन ,रेड डॅनिश यांचे तसेच यांपासूुन तयार केलेल्या संकरीत काउ यांचे दूध हे A1 प्रकारचे असते.या प्राण्यांच्या पाठीला वशिंड(Hump) नसते.खरे तर या प्राण्यांना गैरसमजुतीने cow चे भाषांतर गाय असे केल्यामुळे गाय म्हणतात ,पण ते चुकीचे आहे . असो ,हे दूध देणारे वेगळे प्राणी आहेत.
🔸A2 दूध - भारतीय वंशाच्या देशी गायींचे दूध हे A2 प्रकारचे असते.या मूळ भारतातील गायी असून त्यांच्या पाठीला वशिंड Hump असते.या दुधातील प्रथीन हे A2 बीटा केसीन प्रकारचे असल्याने या दुधास A2 दूध असे म्हणतात.यामधे प्रोलाइन (proline) नावाचे मानवी आरोग्यास अत्यंत पोषक अमिनो आम्ल असते.
🔸A1 दुधाचे घातक परिणाम - या प्रकारच्या दुधातील प्रथीन हे A1 बीटा केसीन प्रकारचे असते.म्हणून या दुधास A1 दुध असे म्हणतात.या दुधातील या प्रथीनामधे हिस्टीडीन ( Histidine ) नावाचे घातक अमिनो आम्ल असते .जेव्हा हे दूध प्यायले जाते त्यावेळी लहान आतड्यामधे त्याचे पचन होताना हिस्टीडीन विभक्त ( split ) होते व त्यापासून बी सी एम 7 ( BCM 7 - Beta Caso Morphine 7 ) हे अमली पदार्थांच्या गटातील एक अतिशय घातक रसायन बाहेर पडते. हे BCM 7 थेट स्वादुपिंडावर( pancreas ) हल्ला करुन तेथील इनसुलीनची ( Insulin ) निर्मिती पूर्ण बंद पाडते. आपणा सर्वाना माहीत आहे की इनसुलीन हे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करत असते.ते कमी झाल्यावर मधुमेह हा रोग होतो.आणि तसेही आता मधुमेही रुग्ण घरोघरी झाल्यामुळे इनसुलीन हा शब्द प्रत्येकाच्या तोंडी असतोच.आता विचार करा A1 दुधातील BCM 7 मुळे जर इनसुलीन ची निर्मिती बंद पडली तर त्याचे परिणाम किती भयानक असतील ते !!!
🔸यामुळे पहिला परिणाम होतो तो म्हणजे अशा व्यक्तीला मधुमेह (Diabetis ) हा रोग होतो.पण एवढ्यावरच हे संकट थांबत नाही.कारण आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव इतर अवयवांशी जोडलेला असल्यामुळे त्यांचे कार्य संयुक्तपणे चालते.या दुधामुळे ह्रदयरोग ,ऑटीझम (स्वमग्नता) स्किझोफ्रेनिया , कॅन्सर ,किडनीचे रोग , स्रियांमधील एंडोमेट्रियॉसिस - यामुळे गर्भाशयाच्या अस्तराला सुज येउन स्त्रियांमधे वांझपणा येतो डोळ्यांची दृष्टी कमी होणे, पुरुषांमधील नपुंसकत्व इत्यादी एकुण 80 प्रकारचे रोग माणसाला होतात.असे न्युझीलंडमधे झालेल्या सरकारी संशोधनावरुन सिध्द झाले आहे.यासंदर्भात न्युझीलंड येथील शास्त्रज्ञ कीथ वुडफोर्ड यांचा डेव्हील इन द मिल्क ( Devil In The Milk दुधातील सैतान ) हा संशोधन ग्रंथ प्रसिध्द झाला आहे.वेबसाइटवर पहा www.chelseagreen.com.
A1 व A2 milk संदर्भातील ही सर्व माहिती इंटरनेटवरही उपलब्ध आहे.
🔸न्युझीलंडमधे लहान वयातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले होते.त्याची कारणे शोधण्यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती 1993 मधे नेमली होती.या समितीने मधुमेही लहान मुलांच्या आहाराचे जैवरासायनिक विश्लेषण ( biochemical analysis ) केले तेव्हा त्यांच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली ती म्हणजे या सर्व रोगाचे कारण म्हणजे जर्सी , होल्स्टेन फ्रीजीयन , रेड डॅनिश या काउ चे दुध हे आहे.या संशोधनानंतर या विषयावर परत 97 वेळा विविध तज्ज्ञ्यांनी अभ्यास केला.सर्वांचा निष्कर्ष सारखाच आहे. भारतीयांचे डोळे खाडकन उघडावे अशी घटना म्हणजे जेव्हा या शास्रज्ञांनी भारतीय वंशाच्या गायीच्या दुधाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की भारतीय गायीचे दुध हे A2 प्रकारचे असुन ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे .इतकेच नाही तर मधुमेह ह्रदयरोग कॅन्सर इ.विविध आजार दूर करण्याची त्यामधे क्षमता आहे.भारतीय देशी गायीच्या तुपामुळे ह्रदयरोग्याच्या रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल दूर होते तर गोमुत्रामुळे कॅन्सर बरा होतो.विचार करा आपल्या प्राचीन भारतीय ऋषीमुनींचा अभ्यास किती सखोल होता ते.जे आधुनिक शास्त्रज्ञांना समजायला इतकी वर्षे लागली की देशी गायीचे दुध तूप गोमूत्र मानवी आरोग्यासाठी वरदान आहे हे हजारो वर्षापुर्वीच आपल्या आयुर्वेदात सांगितलंय .ज्याप्रमाणे महाभारतामधे कृष्णाला विषारी दुध पाजून मारायला पुतना नावाची राक्षसीण आली होती अगदी त्याच पध्दतीने सध्या भारतीयांपुढे जर्सी होल्स्टेन फ्रीजीयन या प्राण्यांच्या दुधाचे ओढवुन घेतलेले संकट आहे असे कोणाला वाटल्यास त्यात अतिशयोक्ती नाही.
🔸 दुधावरील या संशोधनामुळे न्युझीलंड , अमेरिका , ऑस्ट्रेलिया, ब्रिटन , ब्राझील या देशांमधे जर्सी ,होल्स्टेन फ्रिजियन या प्राण्यांचे A1 दूध पिणे बंद केले असुन भारतीय गायींच्या दुधाला प्रचंड मागणी वाढली आहे.इतकेच काय पण तिथे विकल्या जाणाऱ्या दुधाच्या पिशव्यांवरही ते दुध A1 आहे की A2 आहे हे लिहिण्याचे बंधन आहे.खरे तर भारतातही दुधाच्या पिशव्यांवर त्यातील दूध हे A1 आहे की A2 आहे हे लिहिण्याची मागणी ग्राहकांनी करायला हवी कारण आपण काय विकत घेतो त्याबद्दल जाणुन घेण्याचा ग्राहकांना कायद्याने पूर्ण अधिकार असतो.जसे तंबाखू, सिगारेटच्या पॅकेटवर त्याचे सेवन आरोग्यास घातक असल्याची सूचना लिहिली जाते त्याप्रमाणे ...
🔸भारतात मात्र या बाबतील पूर्ण गोंधळच आहे.अजुन आम्हाला दुधाच्या A1 व A2 मधील फरकच माहित नाही.सर्वसामान्य जनतेला गायीचे दूध (cow milk)या गोंडस नावाने जर्सी या घाणेरड्या प्राण्याचे रोगकारक A1दुध विकले जाते.सध्या लोकाना आपली खरी गाय कोणती व विदेशी जर्सी प्राणी कोणता हा फरकच समजानासा झालाय.इतका की अगदी Whats app च्या smileys मधे देखील 🐄🐄🐄🐄🐄 हे जर्सीचे चित्र दिले आहे,त्यास आपण गैरसमजाने गाय समजतोय.देशी गाय व जर्सी हे एकमेकांपासुन पूर्ण वेगळे आहेत.दोन्ही समोर ठेऊन निरीक्षण करा म्हणजे फरक समजेल. जर्सीचे दुध प्यायल्यामुळे मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.अगदी लहान मुलांमध्ये देखील मधुमेहाचे प्रमाण खूप वाढले आहे.आम्ही एकीकडून मधुमेहावर उपाय म्हणून महागडी औषधे घेतो तर दुसरीकडे गायीचे समजून जर्सीचे A1 दुध पितो.कसा रोग बरा होणार ??आहे की नाही गोंधळ ??
🔸गेल्या 40 वर्षांपासुन विदेशातून जर्सी भारतात आणल्या तेंव्हापासून भारतात मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.आपल्या शास्त्रज्ञानी श्वेतक्रांतीच्या नावाखाली भारतीय देशी गायींचे विदेशी जर्सी प्राण्यांबरोबर संकर करुन भारतीय गायींचा वंश नासवला . त्यामुळे देशी गायींच्या 80 पैकी 57 जाती नामशेष झाल्या व जर्सीचे रोगकारक दूध पिण्याची वेळ जनतेवर आली. एके काळी देशी गायींच्या दुधाने समृध्द असणाऱ्या आपल्या देशात आज देशी गायीचे दूध मिळणे अवघड बनले.देशी गायीचे तूप मिळणे तर फारच दुर्मिळ , कसेबसे राजस्थानातील पथमेडा या ठिकाणी शुध्द देशी गायींना जतन केले आहे . प्रयत्नपूर्वक तेथील शुध्द गायीचे तुप मिळू शकते ही त्यातल्या त्यात जमेची बाब.परदेशांनी मात्र गेल्या काही वर्षात भारतामधून देशी गायी नेऊन त्यांची उत्तम शुध्द स्वरुपात जोपासना केली आहे.ब्राझीलमधे साठ लक्ष शुध्द भारतीय गीर गायी आहेत.तर मूळ भारतात त्यांची संख्या शिल्लक आहे फक्त तीन हजार... ब्राझीलमधे एका भारतीय गीर गायीचे दिवसाचे दूध उत्पादन आहे 64 लिटर.(इंटरनेटवर ही सर्व माहिती आहे.)असे असुनही आपले डोळे अजूनही उघडलेले नाहीत.भारतात आजही दिवसाला लक्षावधी देशी गायींचा जर्सीबरोबर संकर करुन त्यांचा वंश आपण नासवून विषारी बनवत आहोत.हे असेच चालू राहिले तर येत्या पाच वर्षात देशी गायी भारतातून नामशेष होतील असा इशारा तज्ज्ञांनी भारताला दिला आहे.
मित्रांनो , आपल्या घरी विकत घेतले जाणारे दूध खऱ्या देशी गायीचे आहे की त्या नावाखाली जर्सीचे दूध आहे हे तपासा. देशी गायीच्या दुधाचे सेवन करुन आरोग्य सांभाळा . तसेच बाहेर जेवताना पनीर ,चीज हे कोणत्या दुधापासुन बनवले आहे याची खात्री करुन आपले व कुटुंबाचे आरोग्य जपा ही विनंती.🙏🙏🙏
अतिशय छान माहिती.जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सत्य पोहोचवा ही विनंती .🙏 Forwarded by:- Dr.Sunil Adangale , Ph.D. ,Animal Science and Dairy Tech.MPKV .Rahuri

JavaScript seems to be disabled in your browser. You must have JavaScript enabled in your browser to utilize the functionality of this website.

Address

GODHAN EK GO SEVA . . . Lawate Farm , Near Amdar Nivas
Badlapur
421503

Telephone

8380094986

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गोधन एक गो सेवा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share