02/07/2025
दाभोळची भटकंती ✨
आपण गुहागरला जातो, दापोलीला जातो. पण या दोहोंच्या मध्ये वसलेल्या दाभोळची भटकंती करायची बरेचदा राहून जाते. दाभोळमध्ये चंडीका देवीचे गुहेत मंदीर आहे. मंदिराच्या बाजूने झरा वाहत असतो. चिंचोळ्या वाटेने गुहेत प्रवेश केला. गुहेच्या थंड, अंधाऱ्या वातावरणात जेव्हा मिणमिणत्या प्रकाशात देवीची मूर्ती बघितली तेव्हा शहारा आला होता अंगावर!!
मंदिरापासून थोड पुढे जेटीकडे जातो, तेव्हा एक point आहे ; तिथून खाडीचा आणि समुद्राचा कमाल नजारा दिसतो. इथून फेरीबोटने पुढे गेलो की धोपावे गावात पोहोचतो.
संध्याकाळी माझ्या आवडत्या कोळथरेच्या किनाऱ्यावर गेले.
ही भटकंती मी मध्ये थांबून केली. शांत आणि निवांत ठिकाण आहे. प्रशस्त परिसर आहे. राहायला villa आणि tents आहेत. मध्यवर्ती असल्यामुळे इथे थांबून गुहागर आणि दापोली असे दोन्हीकडचे किनारे explore करता येतात. आणि सुट्टी मस्त enjoy करता येते.