Pratilipi Marathi

Pratilipi Marathi Discover, read and share your favorite stories, poems and books in Marathi language. Visit: marathi.pratilipi.com
(1355)

Pratilipi is self publishing platform for authors and readers, On this page you can read thousands of Marathi stories. Discover, read and share your favorite stories, poems and books in a language, device and format of your choice

   शहरातील सर्वात पॉश एरिया म्हणायला सगळेच श्रीमंत आणि करोडपती लोक इथे राहतात .....पण हे काय ....??एवढ्या नामवंत सफेद पो...
18/09/2025


शहरातील सर्वात पॉश एरिया म्हणायला सगळेच श्रीमंत आणि करोडपती लोक इथे राहतात .....
पण हे काय ....??
एवढ्या नामवंत सफेद पोश एरियामध्ये आज सकाळी सकाळी सातलाच पोलिसांच्या चार पाच जीप मोठमोठ्याने सायरन वाजवत त्या पॉश बंगलो सामोर एकाएकी जमा झाल्या .....

पोलिसांची टीम धाड धाड करत उतरून घरात शिरली .....

आणि खूपच सुंदर शालीन समाजासाठी एखादा आदर्श असावी अशी एक स्त्री जी पांढऱ्या शुभ्र मोठ मोठ्या गुलाबी कलरच्या फुलांच्या साडीत उभी होती ....
तिला हातात हातकड्या टाकून ही पोलिसांची टीम कुठे नेऊ लागली ....??

तर एकीकडे तेवढ्या आली शान घराच्या बाथरूमच्या बाजूला असलेली जागा पोलिसांनी खोदून काढली होती....

हे काय त्यातून एक कंकाल बाहेर निघाल आहे कुणाचं आहे ते कांकल .....??

चार-पाच लेडीज पोलीस त्या बाईला हीसका देत विचारू लागल्या.....

त्यातलीच एक लेडीज पोलीस ...... सांगा मॅडम सांगा की....!!!
कुणाची आहे ही डेड बॉडी....??
सांगा म्हणते ना....!!

आता तर कहरच झाला एक जाडी भरडी भर कम देह यष्टी ची पोलीस तिच्यासमोर येऊन उभी राहिली .....

आणि आता खाडकन तिच्या कानाखाली वाजवली....

किती वेळ च विचारत आहोत आम्ही ....??

सरळ उत्तर द्यायला काय होतं ...??
बोला लवकर कुणाची आहे ही लाश का बर तुम्ही तुमच्या घरात संडास च्या बाजूला हिला गाढून ठेवलं होतं...??

आता तिथे दोन-तीन पोलीस आले....

एक पोलीस ..... मॅडम निदान दहा ते पंधरा पोते मीठ त्या गड्ड्यात पुरवलेला आहे ....

असे म्हणताच ती जाडी भरकम लेडीज पोलीस त्या ठिकाणी जाऊन पहाते तर.....
खरंच....!!!
त्या गड्ड्यामध्ये दहा-पंधरा पोते मीठ टाकलेलं होतं आणि त्यातच ते कंकाल निघालेल होत .....
पण ती सुंदर सुशील स्त्री आपल्या ओठा तून एक शब्द बोलण्यास तयार नव्हती ....
आता तर त्या लेडीज पोलीस ने तिचे केस हातात धरून तिला हिसका मारला .....
बोल म्हणते ना....!!
कुठे आहे तुझा नवरा ....??
एवढे दिवसापासून तूच कंप्लेंट केली होती ना आमच्या पोलीस चौकीत येऊन....?

बोल लवकर....!!

का केलंस हे कृत्य तू .....??

आमच्याजवळ सगळा तपशील आहे तुझ्या गुन्ह्याचा, आता तरी कबूल कर आणि हे साधे भोळेपणाचा आव आणणे सोडून दे....

पण ती स्त्री आहे की एकही शब्द तोंडातून बोलण्यास तयार नव्हती.....

गोरी गोरी साडेपाच फुटाची ती....
मोठ मोठे काळे डोळे ,,
लांब सडक कमरेपर्यंत सिल्की केस, पांढऱ्या गुलाबी कलरच्या फुलांच्या साडीत उभी होती .....
त्यात गुलाबी कलर चा क्लाचर केसांना लावून लांब सडक केस तसेच खुले कमरेपर्यंत रेंगाळत होते, हातात गुलाबी कलरच्या बांगड्या, कानात सोन्याची झुमके आणि गळ्यात एक साधीशी सोन्याची चेन ,त्या साडीवर गुलाबी मॅच होणारे तिचे एकदम नाजूक ओठ , एखाद्या सुंदर बाहुली सारखी दिसणारी ती स्त्री काहीच बोलायला तयार नव्हती....

आता त्याच जाड्याभरड्या लेडीज पोलीस ने तिच्या एक थोपकाडीत मारली....

तुझ्या गुन्ह्याचा तपशील आमच्या जवळ आहे ....
तू आता काहीही खोटे बोलू शकत नाहीस....
बोल काय खर आहे ते.....

पोलिसांच्या टीमने सकाळपासून तिच्या संपूर्ण घरात शोधाशोध केली पूर्ण घर असता व्यस्त करून टाकले होते ....
जिकडे तिकडे तपास घेणारे वस्तू हुडकावून काढत होते ....

असे करता करता दुपारचे बारा वाजले पण ती सुन्दर स्त्री गप्प बसून पहात होती पण बोलत काहीच नव्हती ....

तेवढ्यात तिचे दोन्ही मुलं शाळेतून परत आले आणि आई आई म्हणून तिला जाऊन बीलागले .....

तिचा मोठा मुलगा सात वर्षाचा प्रयाग तर तिची लहान मुलगी फक्त चार वर्षाची परी तिला जाऊन बीलगली.....

परी ..... आई...., आई...., हे कोण आहेत .....
ती निरागस मुलगी आपल्या आईच्या चेहऱ्याकडे पहात बोलू लागली....

प्रयागच्या थोड्याफार लक्षात आले होते पण मुलीला अजूनही काही कळत नव्हते ....

परी ..... आई सांग ना ....!!
तुला हातात काय घालून दिले ....?
असे म्हणून तिची मुलगी तिला जाऊन बीलगली .....
आणि तिच्या डोळ्यातून अश्रू धडाधडा वाहू लागले....
तिने आपल्या पोरीला जवळ घेतले आणि.....

" परी मी एका ठिकाणी जात आहे ग , तू आजीच्या घरी दादा बरोबर राहशील ना ....??
असे म्हणून ती जोरजोरात रडू लागली....

परी ..... आई मी तुला सोडून कुठेच राहणार नाही....
मी तुझ्याजवळच राहणार ....

तर ती सुंदर सुशील स्त्री ..... नाही बेटा परी.....!!
मला एका ठिकाणी महत्त्वाच्या कामानिमित्त जायचं आहे....
तू प्लीज आजीबरोबर दादा सोबत राहशील आणि तुझी आणि दादाची काळजी घेशील .....

तेवढ्यात.....

प्रयाग सुद्धा आपल्या आईजवळ आला .....

प्रयाग ...... आई हे पोलिस अंकल तुला का बर घेऊन जात आहेत आणि कुठे घेऊन जात आहेत....??
आई, बाबा सुद्धा सोडून गेले या जगातून आणि आता तू सुद्धा आम्हाला सोडून कुठे जात आहेस....??
असे म्हणून प्रयाग रडू लागला....

प्रयाग ..... आणि हे जबरदस्ती तुझ्या हातात बेड्या घालून कुठे नेत आहेत अंकल....??

आता तर त्या सुंदर सुशील स्त्रीला तिचा हुंदका आवरणे असह्य झाले आणि ती जोरजोरात दोघांनाही आपल्या कुशीत घेऊन रडू लागली.....

ती स्त्री ...... माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडला आहे बेटा प्रयाग ....
मी आंधळी झाले होते पण आता माझ्या डोळ्यातून हळूहळू तो नशा कमी होत आहे आणि मी केलेल्या गुन्ह्याची मला शिक्षा मिळायलाच हवी ना ....!!
म्हणून त्या गुन्ह्याची शिक्षा भोगायला मी जात आहे .....
आपल्या परी वर लक्ष ठेवशील तुझी लहान बहीण आहे ती आणि आता थोड्या वेळात आजी इथे येईलच आजीबरोबर दोघेही व्यवस्थित राहाल.....

प्रयाग ..... पण आई, तू कुठे जात आहेस आणि तू का असं बोलत आहेस ....??
आपण आपल्या या घरातच राहू ना....!!
बाबा पण नाहीत आणि आता तू पण अशी बोलत आहेस ....

ती सुंदर सुशील स्त्री ..... बेटा प्रयाग आजी तुझा नीट सांभाळ करेल....
फक्त तू आपल्या या छोट्या परीचं लक्ष ठेवशील आणि तिला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नको....
असे म्हणून ती परत रडू लागली .....

त्या दोन लहान लहान छोट्या बाळांना अशाप्रकारे रडत असलेलं पाहून तिथे असणारी पोलीस टीम सुद्धा नम झाली .....
पण पर्याय नव्हता त्या स्त्रीविरोधात सगळे गुन्ह्याचा तपशील त्यांना सापडला होता आणि त्यामुळेच तिला असंच सोडता येत नव्हतं .....
मागच्या सहा महिने ते एका वर्षापासून ही केस मुंबई पोलिसांच्या हाती होती.....
खूप काही चक्रम घातल्यानंतर एवढ्या दिवसानंतर आज या केस चा खुलासा झाला होता ....
आणि पूर्णपणे ती सुंदर सुशील स्त्री गुन्हेगार होती....

तेवढ्यात एक जवळपास साठ वर्षाची बाई तिथे रडतच आली आणि त्या सुंदर सुशील स्त्रीच्या समोर जाऊन उभी राहिली.....
एक जोरदार तिच्या कानशिलात लावत ती बाई बोलू लागली .....

संध्या.....!!!!!

हे काय केलंस तू....??
तुझ्या सुखी संसाराचं धिंडवडे तू स्वतःच्या हाताने केलेस....
किती चांगला तुझा सद्गुनी नवरा होता त्याची थोडीही कदर केली नाहीस तू का असं वागलीस ....??
अगं किती सुखी संसार होता तुमचा....!!
आणि नीरजला खरंच तू मारले....??
त्याच्या मरणात तुझा हात होता मला तरी विश्वासच बसत नाही .....
नीरज माझा जावई नाही तर मुलासारखा होता एवढा सद्गुनी नवरा तुला मिळाला म्हणून मी रोज देवाजवळ त्याच्यासाठी उदंड आयुष्य मागायची....
पण तू हे काय केलं संध्या हे तू काय केलं....??
निघ माझ्या नजरेसमोरून स्वतःचा आयुष्य तू स्वतः उध्वस्त केलं .....

असं म्हणून ती साठ वर्षाच्या आसपासची बाई जोर जोराने प्रयाग आणि परीला घेऊन रडू लागली .....

संध्या ..... रडतच..... आपल्या आईकडे पहात ...... आई तू तरी अशी बोलू नकोस....!!
तुला तरी वाटते का तुझी मुलगी अशी वागेल ....??
तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ग....!!

पण तिची आई तिच्याकडे पाहणेही पसंत करत नव्हती .....
संध्या तशी रडत रडतच दोन्ही पायांवर खाली बसली आणि जमिनीला टिकून डोके धाड मारत रडू लागली....

थोड्यावेळाने पोलीस संध्याला घेऊन पोलीस जीप मध्ये बसवत मोठमोठ्याने आवाज करत निघून गेल्या....

तिथे मिळालेला कंकाल सुद्धा त्यांची फॉरेनसिक टीम येऊन घेऊन गेली.... घरात सगळं सामान असता व्यस्त पडून होतं .....
संडास बाथरूमच्या बाजूची ती जागा खोदकाम केल्यामुळे घरात भयान निरव शांतता पसरली होती ....
एखाद्या खंडहरात आल्यासारखं त्या बाईला वाटत होतं .....
पण प्रयाग आणि परीला पाहून तिने आपला राग शांत केला....

आजूबाजूचे सगळे नामवंत लोक आपापल्या बंगलोच्या गॅलरी मधून सगळं पाहत होते....

इकडे संध्याला पोलीस व्हॅन घेऊन गेली आणि तिला लॉकप मध्ये बंद केलं .....

दिवसभर ती दोन्ही पायांमध्ये डोकं खूपसून रडत होती....
आता अंधार व्हायला लागला होता आणि तिला आपल्या गतकाळात घडलेल्या गोष्टी आठवू लागल्या....

????????????????????????????????????????????????????????????????????????????????
अचानक तिला आठवू लागले तिचे बोलणे.....

विनोद ..... कशी गोष्ट करतेस ग तु, मी तुझ्या नवऱ्याला मारून टाकू ....??
असा कसा विचार करू शकतेस तू....??

संध्या ..... मग काय करू मी , तो जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंत मी कोणत्याच परिस्थितीत सुखी राहू शकत नाही....

विनोद ..... मग काय खून करायचं.....
अग आपण पळून जाऊ न....,काय फरक पडतो ....
एवढ्या दूर जायचं की कोणीच आपल्याला शोधू शकणार नाही....

संध्या ..... ए हिरो , जरा जमिनीवर ये, खायचं काय...??
कोणत्या काम धंद्याचा नाहीस तू....
आज पर्यंत कोणते काम केलेस आणि ही एव्हढी मोठी प्रॉपर्टी काय कुत्रे खायला ठेवायची काय....??

आणि आता तर ती अधिकच जोरजोराने रडायला लागली ....
तिचा रडण्याचा आवाज आजूबाजूच्या सर्व पोलिसांना जात होता पण तिच्याकडे कुणीही लक्ष देत नव्हते.....

शहरातील सर्वात पॉश एरिया म्हणायला सगळेच श्रीमंत आणि करोडपती लोक इथे राहतात ..... पण हे काय ....?? एवढ्या नामवंत सफेद पोश ....

   आज आपल्याला खूप लेट झालाय,आपण वेळेत नाही पोहचलो तर पाटील सर क्लासमध्ये घेणारच नाहीत...मग माझा पेपर चुकणार.. मला तर टे...
18/09/2025


आज आपल्याला खूप लेट झालाय,आपण वेळेत नाही पोहचलो तर पाटील सर क्लासमध्ये घेणारच नाहीत...मग माझा पेपर चुकणार.. मला तर टेन्शन आलय..नित्या हे सगळे तुझ्यामुळे झाले..तुच लवकर आटपले नाहीस..जिजा वैतागलेले भाव आणत तिच्यासोबत असणाऱ्या मुलीकडे बघत बोलते...

मला थोडीच माहिती होत आज संप पुकारणार ते..आधी माहिती असते तर आपण लवकर उठून गेलो असतो ना.. माझा ही पेपर आहेच ना... पण आता कस जायचे...कॕब पण भेटणार नाही.. नित्या बोलते..या दोघी कॉलेजला जाण्यासाठी काय मिळत का बघायला लागतात..पण अचानक संप पुकारल्यामुळे त्यांना कायच मिळत नाही...

ब्रो एक मिनिट गाडी थांबव..गाडीतली एक वीस वर्षाची मुलगी ओरडते...तिच्या आवाजाने तो दचकून कारला करकचून ब्रेक मारतो.."काय झाले...तो तिच्याकडे बघतो पण ती गाडीचा मिरर खाली घेऊन रस्त्याच्या बाजूला बघत होती..

साक्षीss...आर यु मॕड.. तो तिचा हात पकडून मागे खेचतो..
ब्रो..लागले ना..ती हात पकडून बोलते..
काय आहे तिकडे...तो मुलगा थोडा शांत होतो...
सॉरी सॉरी पण माझ्या दोन मैत्रिणी तिथे थांबलेल्या त्यांना घेऊयात ना प्लीज साक्षी परत मागे बघत बोलते
यासाठी तू ओरडलीस..त्याचे डोळे आपोआप मोठे होतात...इथे तु माझा जीव घ्यायची बाकी होतीस..तो तिच्यावर खेचकतो..

ब्रो प्लीज साक्षी छोटासा चेहरा करते..
साक्षीचा बारीक झालेला चेहरा बघून त्याला राहवत नाही आता बोलव त्यांना आधीच तुला लेट झाला आहे त्यांच्यामुळे तुझा पेपर मिस व्हायला नको.. तो

हो ब्रो..ती बोलत कारचे डोअर ओपन करते आणि बाहेर येते नीतू.. ती दोन मुलींच्याकडे हात करीत आवाज देते..
तस त्या मुली कारकडे बघतात..
साक्षी.. नित्या जिजा एकदम बोलतात..त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो.. नितु आपण साक्षीसोबत जाऊयात...जिजा कारकडे बघत बोलतात..
हम्म चल...नित्या बोलते तस त्या वेळ न दवडता दोघीही कारजवळ येतात..
तुम्ही इथेच का थांबलाय, एक्साम आहे हे विसरलाय का काय..साक्षी हसत विचारते
नाही ग ते आम्हाला अॕटो भेटत नाहीये..जिजा...
तुम्हाला माहिती नाही का आज संप आहे...चला आमच्या गाडीतून..साक्षी बोलते..
ओके चल...जिजा नितु बोलतात..
तुम्ही बसा मागे मी पुढे बसते..साक्षी त्यांना कारचा मागचा दरवाजा उघडून देते तस त्या सीटवर बसतात... साक्षी पुढे बसते...
तो कार स्टार्ट करतो आणि तिथून निघतात..
साक्षी यार thank you..आज जर तु भेटली नसती तर आमचा पेपर मिस झाला असता.. जिजा
जिजा मी असताना अस कधीच होणार नाही..साक्षी नाटकीपणे बोलते..

जिजाss.. ड्राईव्ह करणाऱ्या मुलग्याचे कान टवकारतात.. हे नाव कुठेतरी ऐकले आहे..असे त्याला वाटायला लागते..
त्यांचे लक्ष नाहीये बघून तो मिरर मागच्या सीटवर सेट करतो आणि मिररमधून नजर मागे टाकतो..

गव्हाळ वर्णाची एक मुलगी बसलेली दिसते.. व्हाईट शर्ट ब्लॅक पॕन्ट तिने घातला होता तोच कॉलेजकोड होता हे त्याला ही माहिती होते..हाय पोनी गालावर रूळणारी बट धनुष्य आकाराचे ओठ.. आणि तिचे कमनीय ग्रे कलरचे डोळे..काही खास वाटत होते ते डोळे..त्याची नजर सतत तिच्या डोळ्याकडे जात होती..
हे आईज कुठेतरी बघितलेत.. पण कुठे? तो खूप वेळ विचार करतो पण लक्षात येत नाही..

जिजा अग आपण आज पोहचणार ना..
हा मला ही काही तशीच फिलिंग येतेय..बघ ना साक्षीचा ड्रायव्हर किती हळू कार ड्राईव्ह करतोय.. जिजा नितुच्या कानात बोलते पण हे त्याला स्पष्टपणे ऐकायला जाते.. त्या दोघींनी त्याला बघितलेच नव्हते त्यामुळे त्या त्याला ड्रायव्हर समजून रिकाम्या होतात...
तोच त्याचे स्टेरींगवर मुठ्ठी आवळतात नि कारचा स्पिड वाढतो..इतका की जिजा आणि नितू पुढे ढकलल्या जातात.. पण नशीब त्या दोघी एकमेकीना सावरतात..आणि पुढे रागाने ड्रायव्हरकडे बघतात.. त्याचे स्टेरिंगवर असलेले हात आणि त्यावर आवळलेल्या मुठी जिजाला स्पष्ट दिसतात.. ती त्याच्याकडे बघते तर अर्धा अस्पष्ट चेहरापण त्याचा चेहरा दिसतो..
ब्रो काय झाले.. साक्षी तिच्या भावाकडे बघते..
तस जिजा नित्या साक्षीकडे बघायला लागतात

ब्रो म्हणजे हा साक्षीचा भाऊ आहे..अरे देवा काय बोलून गेले मी...ती मनाता बोलते नि तिरकी नजर त्याच्यावर टाकते..पण तिला सरळ दिसत नाही... तिची नजर समोरच्या मिररमध्ये जाते नि त्याची धारदार नजर आपल्यावरच रोखलेली आहे हे दिसते...त्याची नजर बघून जिजा खाली मान घालत कपाळाला हात लावते..
मी ड्रायव्हर नाहीये या कारचा मालक आहे.. इथून पुढे कोणालाही गाडीत घेताना दहादा विचार करायचा..तो साक्षीला बोलत जळजळीत कटाक्ष मागे टाकतो तस नित्या आणि जिजाला समजत आपले बोलणे त्याने ऐकले आहे..

त्या एकमेकीकडे घाबरून बघतात...
ब्रो काय झाले..तो काय बोलतोय साक्षीला काहीच समजत नाही कारण तिने काहीच ऐकले नव्हते..
तो परत एकदा करकचून ब्रेक दाबतो नि कार थांबते" तुझ्या सो कॉल्ड मैत्रिणीनाच विचार.. तो
साक्षी मागे बघते..तर त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसतात..
ब्रो..साक्षी परत भावाकडे बघते...
उतरा कॉलेज आले आहे, मला अजून कोणाचा ड्रायव्हर व्हायचा शोक नाही..असे बोलताच जिजाची नजर मिररबाहेर जाते..समोर के टी कॉलेजचा बोर्ड दिसतो... तिच्या लक्षात येत कॉलेज आले आहे..ती पटकन डोअर ओपन करून खाली उतरते नितू ही उतरते..त्यांच्या मागुन साक्षी ही उतरते..तोच कार मागे धुरळा सोडत निघून ही जाते...

काय ग तुम्ही काय बोललात का?साक्षी साशंक नजरेने दोघीना बघते..
अग ते मी चुकून तुझ्या भावाला ड्रायव्हर बोलले..म्हणजे मला माहिती नव्हते.. जिजा तोडक तोडक बोलते नि साक्षी कपाळावर हात आपटते...
काय ग तुला कोणत्या अॕगलने माझा ब्रो ड्रायव्हर वाटतो...

मी त्याला कुठे बघितलेय..फक्त त्याचे डोळे..बापरे कसले भयानक वाटले.. एखाद्या मॉन्स्टरसारखे जिजा मनातच बोलते..
सॉरी अग मला थोडीच माहीत होते की तो तुझा भाऊ आहे..
साक्षी आम्ही चुकून बोलून गेलो...आपण यावर नंतर डिसकस करू.. नाहीतर यात आपला पेपर चुकेल..नित्या मधेच बोलते..
साक्षी जिजाला घुरत तिथून निघून जाते..जिजा नंतर कॕटिंगमध्ये भेट तेव्हा आपण बोलू तोवर मी तिला समजवते.. नित्या साक्षीच्या मागे पळत जात जिजाला बोलते..जिजा फक्त हो मध्ये मान डोलवत ती तिच्या डिपार्मेंटकडे जाते..पण अजूनही तिला त्याची धारदार नजर डोळ्यासमोर येत होती..
ती तिच्या क्लासमध्ये येऊन बसते..
जिजा किती लेट..मागच्या डेक्सवरून आवाज येतो..तस जिजा भानावर येते.. अग अॕटो संप असल्यामुळे थोडा लेट झाला जिजा जास्त न बोलता तेवढेच तोडके बोलते...

काही वेळात दक्षची कार एक सत्तावीस मजली काचेच्या बिल्डिंगजवळ येऊन थांबते.. तो कार पार्किंग एरियात लावून बिल्डिंगमध्ये घुसतो...

काय रे आज चेहऱ्यावर बारा का वाजल्यात...
तु इथे काम करायला येतोस की प्रत्येकाचा मुड बघायला येतोस...आणि सगळ्यात आधी मी तुझा बॉस आहे तर तो समोरच्या मुलग्याला घुरतो...
सॉरी सर मी विसरलो होतो की समोर माझा मित्र नाही तर बॉस आहेत..ते देशमुख कंपनीची फाईल कंप्लिट केलीय तीच द्यायला आलो होतो..
तो मागे चेअराला रेलून कपाळ चोळतो...सॉरी यार ते माझा मूड खराब आहे त्यामुळे बोलून गेलो..

हो ना सर आजकाल लोक स्वतःचा मुड असेल तसेच बोलतात..यात तुमची काहीच चूक नाही...तो मुलगा नाराजीत बोलतो...
केदार प्लीज तुही नको चालू होऊ..आधीच त्या मुलीमुळे डोकं सटकलय..तो
व्हॉट मुलगी..केदार अक्षरशः ओरडतो...
तस तो कपाळावरचा हात बाजूला घेऊन केदारकडे बघतो..
म्हणजे तु कुठल्या मुलगीसोबत होतास का? केदार साशंक नजरेने बोलतो...
केदार तु नको ते घोडे चालवु नको.. ती साक्षीची मैत्रीण होती.. म्हणजे येताना साक्षीच्या फ्रेंडस भेटल्या..तो सुरूवाती पासून केदारला सगळं सांगतो..
केदारला जाम हसायला येत तो हसतो ही..त्याला हसताना बघून त्याच्या भुवया आपोआप उचलतात.
सॉरी सॉरी.. पण द दक्ष पटवर्धन साहेबांना एका मुलीने ड्रायव्हर समजल..तो पोटावर हात धरून हसत होता.. आणि इकडे दक्ष साहेबांचा पारा सातव्या आसमंताला जात होता

हसून झाले असेल तर काम करा..दुपारी रूक्मिणी लॉजिंगवर मिटिंग आहे तिकडे जायचे आहे..दक्ष रागाने बोलतो..
सॉरी सर...केदार बोलतो नि बाहेर जायला निघतो.. दरवाजाजवळ जाताच तो मागे परततो "मग ड्रायव्हर साहेब ती मुलगी परत भेटल्यावर तिला खरी ओळख द्या, नाहीतर नेक्स्ट टाईम ती तुम्हाला दुसरेच कोणी समजायला नको.. केदार हसत बोलतो पण दक्षचा चेहरा बघून त्याला समजते आता याचा ओरडा पडणार पण त्याआधीच तिथून सटकतो...

मला ड्रायव्हर बोलते काय नेक्स्ट टाईम भेटुदे तिला हा दक्ष कोण आहे हे सांगतो..दक्ष जबडा घट्ट करतो...

दक्ष जयवंत पटवर्धन.. गोरा वर्ण धारदार नाक थोडेसे ब्राऊनिश केस..पाच फूट नऊ इंच उंची...दिसायला डॕशीग स्मार्ट सगळं काही..तो एका मोठ्या नामकिंत कंपनीचा सिईओ.. त्याच्या हुशारीने आणि मेहनतीने तो आज या पोजिशियनला होता...पण त्याला कशाचा गर्व नव्हता.. तो रागाने केबिनमध्ये फिरत होताच की त्याचा मोबाईल वाजतो तस तो सगळे विचार झटकून टेबलवरचा मोबाईल घेतो..

आज आपल्याला खूप लेट झालाय,आपण वेळेत नाही पोहचलो तर पाटील सर क्लासमध्ये घेणारच नाहीत...मग माझा पेपर चुकणार.. मला तर ट.....

   मुंबईच्या त्या गजबजलेल्या शहरात एक वेगळीच रात्र उगवली होती. पावसाने नुकताच दम टाकला होता, रस्त्यावर अजूनही पाणी साचले...
18/09/2025


मुंबईच्या त्या गजबजलेल्या शहरात एक वेगळीच रात्र उगवली होती. पावसाने नुकताच दम टाकला होता, रस्त्यावर अजूनही पाणी साचले होते .पावसाच्या हलक्याशा सरी अजूनही खिडकीच्या काचांवर आपटत होत्या. आकाश ढगांनी भरलेल होतं, आणि दूरवरच्या गजबजलेल्या वातावरणात एक प्रकारची शांतता होती. राजवीर आपल्या आलिशान सूटच्या गॅलरीत उभा होता, हातात जुनी वाईन असलेला ग्लास, डोळे शहराच्या दिव्यांमध्ये हरवलेले. तो इथं नेहमीच यायचा… एकटेपणाची सवय झाली होती त्याला. पैसा, सत्ता, ऐशोआराम सगळं काही होतं त्याच्याकडे, पण त्याच्या आत कुठेतरी एक शून्य होतं.प्रेम त्याच्यासाठी ते केवळ एक भंपक कल्पना होती. तो कधी कुणाच्या प्रेमात पडला नाही, आणि कुणालाही स्वतःच्या आयुष्यात खोलवर शिरू दिलं नाही. त्याच्यासाठी स्त्रिया केवळ एक गरज भागवणारी साधनं होत्या.काही तासांच्या नशेसारख्या. त्या आल्या, त्याच्या इच्छेनुसार झुकल्या, आणि पुन्हा अदृश्य झाल्या.

आजही असंच काहीसं होणार होतं.

तो विचार करत असतानाच दारावर हलकीशी टकटक झाली.

"आत ये," त्याने मागे वळूनही न पाहता गडद आवाजात म्हटलं.
दार उघडलं गेलं, आणि अलगद पावलं आत आली.

ती मागे येऊन उभी झाली. लाल रंगाचा गडद ड्रेस, लांबसडक भिजलेले केस, मोठे डोळे आणि चेहऱ्यावर एक न सांगता येणारी चमक. ती बाकीच्या मुलींसारखी नव्हती… तिच्यात एक वेगळाच भार होता.तिने राजवीरच्या पाठीवर बोटं फिरवायला सुरुवात केली.हे करत असतांनाच राजवीरने तिला जवळ ओढताच ती हलकसं हसली. तिच्या मऊशार हातांनी त्याच्या छातीवर स्पर्श केला, पण त्याच्या डोळ्यांत कोणतीही भावना नव्हती ना आकर्षण, ना आवड. तो फक्त स्वतःच्या इच्छांसाठी तिचा वापर करत होता, नेहमीप्रमाणे.

ती अजून थोडी त्याच्या जवळ सरकली, तिचा गरम श्वास त्याच्या गळ्याला स्पर्श करत होता. त्याने एकाच झटक्यात तिला आपल्या मिठीत घेतलं आणि भिंतीवर हलकंसं ढकललं. तिच्या ओठांवरची स्मितरेषा अजूनही तशीच होती, पण त्याच्या स्पर्शातला अधिकार ती जाणवत होती.

राजवीरने तिच्या ओठांवर स्वतःला झुकवलं, पण त्याच्या स्पर्शात कोणताही सौम्यपणा नव्हता. त्याच्या आत एक वेगळीच तगमग होती कोणत्यातरी न संपणाऱ्या रिकामपणाला भरून काढण्याची.

ती त्याच्या मिठीत पूर्णत: हरवली होती, पण त्याला तिच्याबद्दल कोणतीही भावना नव्हती. तिच्या मऊशार त्वचेवरून फिरणाऱ्या त्याच्या उष्ण ओठांनी तिला वेड लावायला सुरुवात केली. तिच्या गळ्यापासून हळूहळू खांद्यावर ओठ टेकवताना त्याच्या हातांची पकड अधिकच घट्ट होत गेली.

"राजवीर…" ती हलक्या आवाजात कुजबुजली, पण त्याच्या नजरेत अजूनही काहीच भावना नव्हती. तो तिच्या ओठांवर पुन्हा झुकला, वेगाने, अधिक अधिकाराने.

ती त्याच्या छातीवर अलगद हात फिरवत होती, पण त्याच्या स्पर्शात एक वेगळीच तीव्रता होती असं वाटत होतं की तो कुठलंतरी दुःख किंवा राग तिच्यावर उतरवत होता.

त्याने तिच्या कंबरेला एका हाताने घट्ट पकडत तिला बेडवर झुकवलं. ती त्याच्या स्पर्शाने थरारली. हलकसं हसत ती त्याच्या कानाजवळ आली. "तुम्ही खूप वेगळे आहात… फारच रफ," ती चिडवत म्हणाली.

राजवीरने काहीही उत्तर दिलं नाही. तो तिच्या गळ्यावर ओठ फिरवत तिला अजून जवळ ओढत राहिला. प्रत्येक स्पर्शामध्ये एक वेगळीच गरज होती शारीरिक भुकेपेक्षा जास्त खोलवर काहीतरी. पण तो स्वतःलाही समजून घेऊ शकत नव्हता.

तिच्या पाठीवर त्याच्या हातांचा स्पर्श फिरताच ती थरारली. तिच्या त्वचेच्या मऊपणावरून फिरणारे त्याचे बोट तिला जाणीव करून देत होते की ती आता त्याच्या ताब्यात होती. तिच्या श्वासांचा वेग वाढला, छातीत धडधडायला लागलं.

तो तिच्या इतका जवळ आला की त्यांच्या श्वासांचं एकमेकांवर पडणारं ऊबदार लहरींनी हवेत एक वेगळाच जाळ पसरला. त्याने तिच्या केसांमध्ये बोटं फिरवली, तिचा चेहरा आपल्या हातांमध्ये पकडत तिच्या ओठांवर स्वतःला झुकवलं आतूर, भुकेल्या शिकाऱ्यासारखा.

तिने त्याच्या कॉलरला घट्ट पकडत त्याला अधिक जवळ खेचलं. त्याच्या गरम श्वासांचा स्पर्श तिच्या गळ्यावर जाणवत होता. तिच्या ओठांवरून हलकेच खाली जात, त्याच्या ओठांनी तिच्या मऊ त्वचेचा मागोवा घेतला. तिने एक हलकासा सुस्कारा सोडला.
पण त्याच्या नजरेत कोणतीही कोमलता नव्हती. त्याला प्रेम माहीतच नव्हतं, फक्त ताबा मिळवायचा होता. त्याच्या ओठांनी आणि बोटांनी तिला अधिक जवळ खेचताच तिला स्वतःच्या नकळत त्याच्या मिठीत गुंतून पडावसं वाटलं.ती हळूच त्याला म्हणाली

“तुम्ही किती भावनहीन आहात.”

"मी भावना दाखवत नाही," तो तिच्या कानाजवळ घसरत्या आवाजात म्हणाला.

"माझीही गरज तशीच आहे…" तिने त्याच्या छातीवर हात फिरवत प्रतिसाद दिला.

त्याच्या मिठीत ती पूर्णपणे हरवत गेली. तिच्या गळ्यावर, खांद्यावर फिरणारे त्याचे ओठ, तिला स्वतःच्या इच्छेच्या आधीन करत होते. हळूहळू स्पर्श अधिकच तीव्र होत गेला. त्याच्या हातांनी तिच्या कंबरेला घट्ट पकडलं, तिच्या शरीरावर आपल्या ओठांचा हक्क प्रस्थापित केला.

तेव्हढ्यात त्याचा फोन वाजला.रागात त्याने फोनच्या स्क्रीनकडे बघितले तर मॅक चा फोन होता.राजवीरच्या कपाळावर आठ्या आल्यात

राजवीरने वैतागून फोन उचलला. त्याच्या आवाजात अधीरता स्पष्ट जाणवत होती.

"काय आहे, मॅक?" तो दडपलेल्या स्वरात म्हणाला, एका हाताने तिच्या कंबरेभोवती पकड मजबूत करत.

"बॉस, तुम्हाला काही महत्वाचे सांगायचे आहे" मॅकच्या आवाजात तणाव होता.

"नंतर बोलतो," राजवीरने कापसासारख्या मऊ गळ्यावर ओठ टेकवत फोन कट करण्यासाठी बोट पुढे नेलं, पण मॅकच्या पुढच्या शब्दांनी त्याचा हात थांबला.

"तो परत आलाय…"

राजवीरचा हात थांबला. त्याच्या डोळ्यांत एक वेगळाच जळफळाट चमकून गेला. त्याचा जबडा घट्ट आवळला गेला. त्याच्या संपूर्ण शरीराचा तोल क्षणभर ढळल्यासारखा वाटला, पण बाहेरून तो तसाच निर्लेप होता.

"तू काय म्हणालास?" तो आवाज दाट करत म्हणाला.

"तो… तो मुंबईत परत आलाय,बॉस आणि यावेळी तो काहीतरी मोठं करणार आहे." मॅकच्या स्वरात भीती होती.

राजवीर काही क्षण स्तब्ध राहिला. एका सेकंदात त्याच्या हाताची पकड अधिकच घट्ट झाली. ती त्याच्या मिठीत होती, तिच्या मऊशार त्वचेला त्याच्या बोटांचा तडाखा जाणवत होता. पण आता त्याच्या स्पर्शातला उद्देश वेगळा होता.

तो विचारात गडप झाला. त्याच्या आयुष्यातला एक काळ ज्याला तो कायमचा मागे टाकायला पाहत होता, तो पुन्हा त्याच्या समोर येत होता.

"राजवीर…" ती त्याच्या गळ्याजवळ हलकसं कुजबुजली, त्याला परत भानावर आणत.

त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत अपेक्षेचं काहीतरी होतं, पण त्याच्या डोळ्यांत आता एकच गोष्ट होती क्रोध.

"तू आता जाऊ शकतेस," तो थंड स्वरात म्हणाला, तिच्या मिठीतून बाजूला होत.

ती अचंबित झाली. "असं अचानक?"
"हो तुझे पैसे टेबलवर ठेवले आहेत ते घे आणि निघ,मला काम आहे."
ती क्षणभर त्याच्याकडे बघत राहिली. क्षणापूर्वी तिच्यावरचा तो ताबा, ती उष्णता… आता कुठेच नव्हती. तो पुन्हा त्याचाच होता निर्लेप, भावना नसलेला, फक्त स्वतःच्या दुनियेत हरवलेला.

ती काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली, पण न बोलताच ती बाहेर निघून गेली.

राजवीरने गॅलरीकडे एक कटाक्ष टाकला. पाऊस थांबला होता, पण त्याच्या मनातला वादळ आता उसळायला लागलं होतं.

"तो परत आलाय पण आता तो परत जावू शकणार नाही मी त्याला इथेच संपवेल.मला धोका दिला तरी मी त्याला मित्र म्हणून सोडले होते पण आता नाही त्याने माझ्या समोर येण्याची हिंमत कशी झाली त्याची”राजवीर स्वतःशीच बोलत होता.तो फ्रेश झाला आणि तसाच हॉटेलमधून निघाला.

राजवीरच्या मनात अस्वस्थतेचे वादळ उठले होते. त्याच्या प्रत्येक श्वासाबरोबर रागाच्या लाटांनी त्याला घेरलं होतं. मुंबईच्या रस्त्यांवरून त्याची गाडी वेगात धावत होती. त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं.

"तो परत आलाय..."

मॅकच्या या शब्दांनी त्याच्या आत एक जुना जळफळणारा जखम उघडी पडली होती. तो माणूस ज्याच्यावर त्याने एकेकाळी विश्वास ठेवला होता. त्यानेच त्याच्या पाठीत सुरा खुपसला होता.

"काय वाटलं त्याला? मी विसरलोय? मी माफ केलंय?"

राजवीरच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. त्याच्या हाताच्या नसांवर तणाव स्पष्ट दिसत होता. गाडी थांबण्याआधीच त्याने फोन काढला.

"मॅक, तो कुठे आहे?"

"बॉस, तो लोअर परळच्या एका गोदामात आहे. मी आधीच काही लोक पाठवलेत, पण तो एकटा नाही, त्याच्यासोबत अजून काही लोक आहेत."

राजवीरच्या ओठांवर एक थंड हसू उमटलं.

"मॅक, मी स्वतः येतोय. कुणीही काही करू नये. तो माझा शिकार आहे."

त्याने फोन कट केला आणि गाडीचा वेग अजून वाढवला.

तेथील गडद अंधारात काही सावल्या हालचाल करत होत्या. मोठ्या लाकडी खोकी आणि धूळ भरलेले लोखंडी सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. एका कोपऱ्यात तो उभा होता – राजवीरच्या भूतकाळातला एक चेहरा.

तो शांतपणे उभा होता, चेहऱ्यावर विजयी हसू. त्याच्या सोबत चार-पाच लोक उभे होते, हातात बंदुका, पण त्याच्या डोळ्यांत मात्र भीती नव्हती.

"राजवीर..." तो हलक्या आवाजात हसला.

तेव्हढ्यात गोदामाचा लोखंडी दरवाजा एका झटक्यात उघडला.

राजवीर आत शिरला. काळा शर्ट, काळीच पँट, चेहऱ्यावर निर्विकार पण डोळ्यांत खूप आत्मविश्वास. त्याच्या मागे मॅक आणि त्याचे लोक होते.

तो हळूहळू पुढे आला.

"तुला वाटलं मी तुला विसरेल?" राजवीरच्या आवाजात एक वेगळीच धार होती.

"माझं तसं काहीच म्हणणं नाही, राजवीर." तो पुन्हा हसला. "मी फक्त परत आलोय...ते पुरावे घेऊन आणि ते तुला बघावे लागणार कारण जे मी तेव्हा सांगत होतो ते आता सांगतो आहे मी काहीही केलेले नाही.कोणीतरी मुद्दामून हे घडवून आणले आपल्यात तणाव निर्माण करण्यासाठी"

राजवीरच्या डोळ्यांत आग भडकली. त्याने मुठी आवळल्या.

"तू जिवंत इथून बाहेर जाणार नाहीस."

"बघूया," तो म्हणाला, आणि एका क्षणात वातावरणात तणाव पसरला.

मुंबईच्या त्या गजबजलेल्या शहरात एक वेगळीच रात्र उगवली होती. पावसाने नुकताच दम टाकला होता, रस्त्यावर अजूनही पाणी .....

   तीन वेगवेगळ्या वातावरणातील तीन वेगवेगळी ठिकाणे, तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या मोबाईलच्या मेसेज बीप मात्र एकाच वेळी वाजल...
18/09/2025


तीन वेगवेगळ्या वातावरणातील तीन वेगवेगळी ठिकाणे, तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या मोबाईलच्या मेसेज बीप मात्र एकाच वेळी वाजला. एकाच वेळी, एकच मेसेज तीन वेगवेगळ्या व्यक्तींपर्यंत पोहोचला. मेसेज वाचताना, पहिली कपाळावर चढलेली अटी, माहित नसलेल्या नंबर कडे बघत त्रासलेली नजर, पुन्हा एकदा उस्तुकतेने त्या मेसेजवरून फिरलेली नजर, हृदयाची वाढलेली धडधड, हलकी वाटणारी भीती आणि त्यानंतर आलेला आनंद,
एका नजरेत भय मिश्रित आनंद,
तर एका नजरेत, येस, हे व्हायलाच पाहिजे.
ही भावना आणि एका नजरेत,
काय फालतूपणा आहे!? पण असं झालं तर चालेल मला.
हे विचार…
काही का असेना जो मेसेज आला होता तो अंतिम एक आनंदच त्या तीन व्यक्तींना देऊन गेला.

काहीतरी अकल्पित घडणार हा संदेश देणारा मेसेज..

आनंद काही क्षण टिकला आणि त्यानंतर,

“छे, हे कोणीतरी आपली चेष्टा करतय. “

या विचारा खाली दडून गेला आणि काही क्षणा नंतर हवेत विरला.

तासा नंतर तर असा मेसेज आला होता हे सुद्धा विसरलं गेलं.

पण नियतीला हे विसरणं मान्य नव्हतं. तिने खेळाचे फासे टाकले होते. आणि डावामध्ये एकदा टाकलेले फासे परत उचलून घ्यायचे नसतात. मनात आणलं तरी मध्यातून माघार घेता येणार नव्हती. प्रयत्न केला तरी टाकलेले फासे परत उचलता येणार नव्हते.

कारण आता तर खेळ सुरू झाला होता.

****************------------********************

पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. दुपारी सुरू झालेल्या पावसाने संध्याकाळच्या चार वाजताच सूर्याला आपल्या काळ्या ढगांमागे लपवून टाकलं होतं. विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि पावसाचा रापराप होणारा आवाज या व्यतिरिक्त सगळं काही शांत होतं... आणि अशातच या आवाजाला चिरत सायरनचा आवाज घोंगावत एक जीप नीलम सोसायटीमध्ये शिरली. गाडीने ब्रेक दाबताच पटकन एक पोलीस शिपाई पुढे झाला. झटक्यात त्याने गाडीच दार उघडलं.

" बोला शिंदे, काय वाटतंय फ्लॅट १३१२ बद्दल?"

उतरताच चालू लागतच सब इन्स्पेक्टर कामत यांनी प्रश्न केला.

" सर, नक्कीच सुसाईडच प्रकरण दिसतंय."

लिफ्टच बटन दाबत शिंदे म्हणाले.

" आणि असं का वाटतंय तुम्हाला?"

" कारण सर संशयास्पद असं तरी काही अजून आढळलेलं नाही..... इकडे या, इकडे आहे फ्लॅट नंबर १३१२."

त्या आलिशान टोलेजंग सोसायटीच्या १३१२ नंबरच्या फ्लॅट बाहेर एव्हाना गर्दी जमा झाली होती.

" बाजूला व्हा. एक मिनिट साईड द्या!"

त्या गर्दीला बाजूला सारत शिंदे आणि कामत ' पोलीस लाईन डू नॉट क्रॉस' असं सील केलेल्या फ्लॅटच्या आत घुसले. आत शिरताच प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने सब इन्स्पेक्टर कामत यांना सॅल्यूट केला.

" पाटील, शिंदे म्हणत होते केस सुसाईडची वाटतेय. ऑब्जर्वेशन काय..."

आपली घारी सारखी नजर सगळीकडे फिरवत त्याने प्रश्न केला. तेवढ्यात बाहेरून येणाऱ्या आवाजाने त्याचे कान देखील टवकारले.

" आपल्या सोसायटीत पहिल्यांदाच पोलीस आलेत नाही ग."

" बाई! असल्या गोष्टींचा त्रास नको म्हणून या सोसायटीत फ्लॅट घेतला तर आता इथे पण आहेच काहीतरी.."

" पण आपल्या सोसायटीत असं काही घडू कसं शकतं??"

" अहो पण काय घडलय आपल्याला कुठे माहितीये."

" तेच माहिती करून घ्यायला तर थांबलो आपण इथे केळकर."

“ फ्लॅट नंबर १३१२!.. हं, न बोललेलं उत्तम.. तरी आम्ही म्हणत होतो बॅचलर माणसाला फ्लॅट द्यायला नको.”

आणि या एका वाक्याने सब इन्स्पेक्टरचे कान आणखीन तिखट झाले. त्यांनी ऐकलेलं हे वाक्य आपल्या मेंदूच्या नोटपॅडमध्ये लिहून ठेवल आणि पुढील कारवाईस सुरुवात केली.

" शिंदे, पहिले या गर्दीला इथून बाहेर काढा. पोलीस इन्वेस्टीगेशन मध्ये कसलीही अडचण मला नको आहे."

शिंदे दाराकडे झाले. कामत पुन्हा एकदा पाटीलकडे वळले.

" हं, बोला तुम्ही. इज इट सुसाईड?"

" हो सर, वाटतंय तर तसच... घरात हातापायीच एकही चिन्ह नाही. सगळं व्यवस्थित आणि जागच्या जागी आहे."

" हम्म."

कामतची नजर सर्वत्र फीरत होती.

" आणि हे पहा, या टेबलवर ही वाईनची बॉटल.. त्याबरोबर ग्लास पण एकच आहे. ह्यात थोडी वाईन शिल्लक आहे."

" दुसरा ग्लास कोणी साफ करून ठेवून दिला असेल तर?"

" सर, ही शक्यता गृहीत धरून आम्ही सगळेच ग्लास फॉरेन्सिक लॅबला पाठवायचे ठरवलेत.."

" गुड! फोटोज काढलेत ना?"

" येस आणि सर आणखी एक गोष्ट.. हे बघा."

म्हणत पाटील यांनी त्याच टेबल वरुन छोटी बाटली उचलून कामत यांच्या हातामध्ये ठेवली. ती बाटली पाहताच कामतच्या कपाळावर आठी चढली.

" हे तर रॅट कीलर आहे!"

" हो आणि इकडे या सर."

दोघेजण हॉलमधील असणाऱ्या सोफ्याजवळ आले. तिथे सोफ्यावर एक मृतदेह आडवा पडला होता. त्याचा चेहरा इतका निर्विकार होता की त्याच्या तोंडातून बाहेर पडलेला फेस दिसला नसता तर तो झोपलाय असाच भास झाला असता.

" हे पहा बॉडीच्या तोंडातून फेस येतोय म्हणजे नक्कीच रॅट कीलर पिलं गेलं आहे."

" पाटील, त्या ग्लासमध्ये वाइन शिल्लक आहे ना. ती पण सँपल साठी पाठवून द्या..."

आणि कामत प्रेताला तपासू लागला.

" काही दुखापत किंवा इन्ज्युरी पण दिसत नाहीये ह्याच्या शरीरावर....."

काही वेळ विचार करून कामतने आपली नजर त्या प्रेतावरून हटवत पाटील कडे वळवली.

" ज्याने पहिल्यांदा विजय मोरेचा मृतदेह पाहिला तो माणूस कुठेय?”

" बाहेर थांबून ठेवलाय त्याला. बोलवून आणतो थांबा."

काही वेळातच एक चाळीस पंचेचाळीशीच्या आसपासचा, तुकतुकीत चेहऱ्याचा, गलेलठ्ठ माणूस घाम पुसतच त्याच्या समोर आला. तो माणूस मराठी नाही असा अंदाज कामतने त्याच्याकडे बघत बांधला आणि तो त्याचा अंदाज लगेचच खरा ठरला. पाटील त्या इसमाला उद्देशून कामतला बोलले.

" सर, हा हरीश मोटवानी. ह्याची मॉडेलिंग एजन्सी आहे. याची विजय मोरे बरोबर मीटिंग होती असं म्हणतोय हा..."

ऑलरेडी तुकतुकीत असणारा चेहरा आलेल्या घामाने अजूनच तुकतुकीत वाटत होता. त्यामुळे त्याचं घाम पुसणं सुरूच होतं. त्याची ती अवस्था पाहून पाटील मनोमन हसले.

" तर मोटवानी साहेब... कसली मिटींग होती तुमची विजय मोरे बरोबर?"

" साहेब ते त्याचे फोटोशूट होते ना त्यासाठी त्याला मॉडेल पाहिजे होती. आज दोन वाजता बोलवले होते त्यानी."

हे वाक्य ऐकताच तो काही क्षण विचारात पडला.

" स्ट्रेंज!... बर पुढे?"

" मी आलो होतो टाईमाला. मी बेल दाबली पण दरवाजा उघडले नाही मग आवाज दिला पण काहीच बोलले नाय म्हणून मग मी वॉचमनला सांगून दरवाजा उघडून घेतला.."

" तो घरीच असेल याची खात्री तुम्हाला होती का? तुम्ही अगदी दरवाजा उघडून घेतलात ते."

" हो साहेब. वेळेचा अगदी पक्का माणूस होता तो. एकदा वेळ दिली की चुकवायचे नाय आणि आतून गाना पण चालू होता ने... आता रिकाम्या घरात गाणं कशा वाजणार म्हणून दार उघडायला लावलं....."

मोटवानी आवंढा गिळत पुन्हा एकदा घाम पुसत बोलला.

" पण आत आलो तर बॉडीच दिसली समोर एकदम!"

" गाणं म्हणाला तुम्ही? कसलं गाणं??"

कामतने प्रश्न केला. मोटवानीच्या ऐवजी पाटीलच उत्तरले.

" सर आम्ही आलो तेव्हा टेप रेकॉर्डर वरती एक गाणं लूपमध्ये सुरू होतं. आम्ही ते आत्ता बंद केल आहे."

" हं,"

पुन्हा एकदा तो कसल्या तरी विचारात पडला.

" ओके… मोटवानी, तुम्ही कशाला हात तर लावला नाहीत ना?"

" ते दरवाजाचे हँडलला लावले मी हात पण बाकीचे काही आठवेना... साहेब, माझ्याकडं काही येणार तर नाही ना?"

" म्हणजे?"

त्याच्या या वाक्यावर कामतची तीक्ष्ण नजर त्याच्या नजरेत घुसली आणि मोटवानीला आणखीनच घाम फुटला.

" नाय ते तुम्ही हाताचे विचारले ने म्हणून फक्त.. बाकी काय नाय!"

रोखलेली नजर तशीच ठेवत कामत बोलला.

" आत्ता जावा तुम्ही. काही गरज लागली तर पुन्हा बोलवू. आणखीन एक, इथे जे काही बघितल त्याची वाच्यता बाहेर कुठेही करायची नाही. इट्स अ हाय प्रोफाईल केस."

" जी साहेब.."

आता तर आपल्या टकल्यावरचा घाम पुसत मोटवानी बाहेर पडला आणि पाटील हसले.

" लईच घाम येतोय या मोटवान्याला..."

अशी टिप्पणी ही दिली. त्याच्यावरून नजर हटवत पुन्हा विजय मोरेच्या प्रेतापाशी येत कामत म्हणाला.

" पाटील, बॉडी पोस्टमार्टमला पाठवा आणि इथली इच अँड एव्हरी गोष्ट नोट करून घ्या. अगदी ते गाणं सुद्धा! बाकी टीमला पूर्ण फ्लॅटची पडताळणी करायला लावा. एक छोटीशी सुई सुद्धा नजरेतून सुटायला नको आपल्या..."

" सर, तुम्हाला हे वेगळच प्रकरण वाटतंय का?"

" आत्ताच काही बोलता येणार नाही पाटील पण आपल्याकडून काही राहायला नको. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला की बघू... आणि शिंदे, सोसायटीच्या सेक्रेटरीला सांगा या फ्लॅटच्या आजूबाजू मला कुणी फिरकलेलही नकोय. आपली परमिशन घेतल्याशिवाय या फ्लॅटमध्ये कोणीही येता कामा नये. अगदी कोणीही. वॉचमनलाही या गोष्टीची काळजी घ्यायला सांगा. मी चौकीत जातोय परत. ती रॉबरी केसची फाईल तयार करायची आहे. उद्या वकिलांना द्यावी लागेल. कोर्टात त्याची केस स्टॅन्ड होती आहे. त्यासाठी मी डायरेक्ट तिकडे जातोय. तुम्ही सुद्धा इथल आवरून चौकीत या. पोस्टमार्टमच्या रीपोर्ट वरून या केसच पुढे काय करायचं ते ठरवूया."

" येस सर!"

त्याला सॅल्यूट करत दोघेही आपापल्या कामाकडे वळले.
सब इन्स्पेक्टर कामत फ्लॅटमधून बाहेर पडणार तोच समोरून येणाऱ्या व्यक्तीला बघून काहीशा आश्चर्याने त्याने एक सॅल्यूट ठोकला.

“ सर आपण इथे? “

“ इकडे एका आप्त स्वकीयांकडे आलो होतो. तिथे कानावर आलं की इथे १३१२ मध्ये काहीतरी अकल्पित घडलं आहे. माझ्या ड्युटी मध्ये हे येत नाही पण अंगातील पोलिसी रक्ताने शांत बसून दिलं नाही म्हणून एक चक्कर टाकायला आलो. तुमची परवानगी आहे का? जाऊ आत मध्ये?”

“ काय सर चेष्टा करताय काय?... प्लीज या.”

सब इन्स्पेक्टर कामत बरोबर तो व्यक्ती आत मध्ये गेला. कुठेतरी बागेत गेल्यावरती सहज नजर फिरवावी तशी त्या व्यक्तीने सगळी कडे आपली नजर फिरवली. स्वतःशीच काहीतरी बोलल्याप्रमाणे ओठ पुटपुटले.

“ काही बोललात का सर?”

“ काही नाही कामत? काय वाटतं तुम्हाला. “

“ सरळ सरळ आत्महत्याची केस आहे असं आत्तातरी वाटतंय सर.

हे ऐकल्यानंतर त्याची एक भुवई छान पैकी वर चढली आणि चेहऱ्यावर एक हास्य आलं.

“ पुढे तपास सुरू ठेवा… चल येतो मी.”

म्हणत तो व्यक्ती त्या फ्लॅटच्या बाहेर पडला. सब इन्स्पेक्टर कामत काही क्षण त्या गेलेल्या व्यक्तीकडे भारावून पाहत राहिला. नंतर मात्र आपलं डोकं झटकत तो फ्लॅटमधून बाहेर पडला. त्याची गाडी पुन्हा पोलीस स्टेशनच्या रस्त्याला लागली.

✍️ श्रुती सुशांत जाधव तीन वेगवेगळ्या वातावरणातील तीन वेगवेगळी ठिकाणे, तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या मोबाईलच्या म...

Address

Nasadiya Technologies Private Limited, Sona Towers, 4th Floor, No. 2, 26, 27 And 3, Krishna Nagar Industrial Area, Hosur Main Road
Bangalore
560029

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pratilipi Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pratilipi Marathi:

Share