Ahilyakiran

Ahilyakiran अहिल्याकिरण, पुरोगामी व परखड विचारांचे साप्ताहिक

02/06/2026

शेतकऱ्यांच्या बांधावर जात युगेंद्र पवारांकडून नुकसानीची पाहणी..!
Ahilyakiran

साप्ताहिक अहिल्याकिरण चे नवीन वर्षात (वर्ष १२ वे) पदार्पण होत आहे. कालच चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती व व...
01/06/2026

साप्ताहिक अहिल्याकिरण चे नवीन वर्षात (वर्ष १२ वे) पदार्पण होत आहे. कालच चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती व वर्धापन विशेषांक प्रकाशित करण्यात आला.
आमचे सर्व शुभचिंतक, वाचक , जाहिरातदार या सर्वांचे मनःपूर्वक आभार..!
Ahilyakiran Kalyani Waghmode

📍 श्रीक्षेत्र चोंडी, ता. जामखेड, जि.अहिल्यानगरलोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि प्रेरणादायी कार्य , उत्तम प्रशासक असणाऱ्या प...
31/05/2026

📍 श्रीक्षेत्र चोंडी, ता. जामखेड, जि.अहिल्यानगर

लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि प्रेरणादायी कार्य , उत्तम प्रशासक असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे आगमन झाल्यानंतर अहिल्यादेवी स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी प्रास्ताविक करत सर्व उपस्थित उपमुख्यमंत्री, आजी माजी खासदार, आमदार, पदाधिकारी तसेच सर्व बंधू भगिनी यांचे स्वागत केले. सर्व मान्यवर यांची मनोगते झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा व कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रम वेळी अनेक अंकाचे प्रकाशन झाले.
महाराष्ट्र शासनमान्य यादीवरील साप्ताहिक अहिल्या किरण चे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, राज्यसभा खासदार रामराव वडकुते,आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार डॉ.विकास महात्मे, माजी आमदार रमेश शेंडगे, जामखेड नगराध्यक्ष चिंतामणी , डॉ. उज्वलाताई हाके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

#अहिल्यादेवीहोळकर #अहिल्यादेवी301वीजयंती #श्रीक्षेत्रचोंडी #पुण्यश्लोक #अहिल्यादेवी #होळकर #जयंती

साधी राहणीमान, उच्च विचारसरणी असणाऱ्या अहिल्यादेवी यांच्या कार्याला हिमालयाची उत्तुंगता आहे. मराठा साम्राज्याची पताका मा...
30/05/2026

साधी राहणीमान, उच्च विचारसरणी असणाऱ्या अहिल्यादेवी यांच्या कार्याला हिमालयाची उत्तुंगता आहे. मराठा साम्राज्याची पताका मानाने फडकत ठेवणाऱ्या व आदर्श राज्यकारभारमुळे, स्त्री मुक्तीची प्रेरणा देणाऱ्या, २८ वर्षे समर्थपणे शासन व्यवस्था चालविणाऱ्या क्रांतिकारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.
उरी बाळगूनी स्वप्न मराठी सत्तेचे,
बांधुनी तोरण हजारो गडकिल्ले,
मंदिरांचे,घडविले जिने नव्या हिंदुस्तानाला,
नमन त्या अहिल्यादेवीला..!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती निमित्त साप्ताहिक अहिल्या किरण परिवाराकडून विनम्र अभिवादन...!

#पुण्यश्लोक #अहिल्यादेवी #होळकर #जयंती
Ahilyakiran Kalyani Waghmode

29/05/2026

*आचारसंहितेमुळे माहे जुनचा 'लोकशाही दिन' होणार नसल्याची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती*

पुणे, दि. २९: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकरण मतदार संघ निवडणुकीची जिल्ह्यात २५ जून २०२६ पर्यंत आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे जुन महिन्याच्या पहिल्या सोमवारी १ जून रोजी नियोजित 'जिल्हास्तरीय लोकशाही दिन' होणार नाही. तसेच या लोकशाही दिनाचे जुलै २०२६ महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजन करण्यात येणार आहे, याबाबत सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.

#पुणे Ahilyakiran

28/05/2026

*शासकीय नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक*_बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; बनावट नियुक्तीपत्रे देत तब्बल १ कोटी...
26/05/2026

*शासकीय नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक*

_बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; बनावट नियुक्तीपत्रे देत तब्बल १ कोटी ३६ लाखांचा गंडा; टोळीतील आरोपी जेरबंद_

बारामती दि.२६-
शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींसह अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या टोळीवर बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बनावट नियुक्तीपत्रे देऊन तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ ते ४ मे २०२५ या कालावधीत तांदुळवाडी (ता.बारामती) येथील महिला हॉस्पिटल तसेच मळद परिसरात आरोपी अनिकेत धनंजय पाठक याने 'गट-क अधिपरिचारिका' पदावर शासकीय नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत महिला हॉस्पिटलमधील स्टाफ नर्स व इतरांची ओळख करून घेतली. त्यानंतर अजिंक्य पाठक, सिओना साळवे उर्फ सिओना अनिकेत पाठक, सुधाकर सोळंकी, सागर गायकवाड आणि सुरज असदकर यांच्या मदतीने फिर्यादी व साक्षीदारांकडून वेळोवेळी ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपये उकळण्यात आले. विशेष म्हणजे, विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी बनावट नियुक्तीपत्रेही दिली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही नोकरी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये मार्च २०२६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असताना पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी सूरज तिमय्या असदकर ,वय 39 वर्षे, धंदा डिलिव्हरी बॉय राहणार पडवळ अळी गोखले हॉल जवळ चिंचवड गाव, तालुका हवेली ,जिल्हा- पुणे ,हा येथील घरी पत्नीला भेटण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आर्थिक फायद्यासाठी संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीस ६ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
यापूर्वी अजिंक्य पाठक राहणार दौंड आणि सुधाकर सोळंकी राहणार येरवडा यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांच्यासह पोलीस अंमलदार सागर देशमाने, जितेंद्र शिंदे ,विठ्ठल तरंगे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.
Ahilyakiran #पोलीस #पुणे

25/05/2026

*बारामती*
*युगेंद्र पवार बारामती पत्रकार परिषद*
*बारामती संवाद बैठक*
काय म्हणाले पहा..!
#बारामती

        📌
21/05/2026

📌

20/05/2026

*उष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना*

पुणे (जि.मा.का.): सध्या राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेची लाट (Heat Wave) निर्माण होण्याची शक्यता असून पशुधनाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पशुधनामध्ये उष्माघात, दूध उत्पादनात घट, भूक मंदावणे, निर्जलीकरण तसेच मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याअनुषंगाने पशुधन संरक्षणासाठी पशुपालकांनी करावयाच्या उपाययोजना पुढीलप्रमाणे.

जनावरांना दिवसभर मुबलक प्रमाणात स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. पाण्याच्या टाक्या व पाणवठे स्वच्छ ठेवावेत. शक्य असल्यास पाण्यात इलेक्ट्रोलाइट / खनिज मिश्रणाचा वापर करावा. सावलीची व्यवस्था जनावरांना थेट उन्हात बांधू नये. गोठ्यांवर शेडनेट, गवताचे आच्छादन किंवा ताडपत्रीचा वापर करावा. गोठ्यामध्ये पुरेशी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. आहार व्यवस्थापन सकाळी लवकर व सायंकाळी उशिरा हिरवा व पौष्टिक चारा द्यावा. दुपारच्या कडक उन्हात खाद्य देणे टाळावे. खनिज मिश्रण व मीठाचा संतुलित वापर करावा.

जनावरांना थंडावा देणे- दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर पाणी शिंपडावे. शक्य असल्यास पंखे किंवा फॉगर्सचा वापर करावा. म्हैस व इतर जनावरांना पाण्यात बसण्याची व्यवस्था असल्यास अधिक चांगले. दुपारी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत जनावरांची वाहतूक टाळावी. बाजार, स्पर्धा किंवा लांब अंतराच्या हालचाली शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी कराव्यात.

धाप लागणे, जास्त लाळ येणे, शरीराचे तापमान वाढणे, सुस्ती व अशक्तपणा, खाद्य व पाणी कमी घेणे आदि लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा

कुक्कुटपालनासाठी विशेष काळजी- शेडमध्ये पुरेसे वायुवीजन ठेवावे. स्वच्छ व थंड पाणी सतत उपलब्ध ठेवावे. गर्दी टाळावी व इलेक्ट्रोलाइटचा वापर करावा.

*उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेचा विचार करता सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची योग्य काळजी घ्यावी व वरील उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.असे आवाहन सहायक आयुक्त, डॉ. विष्णू गर्जे यांनी केले आहे.*
00000

Ahilyakiran

Address

Baramati

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ahilyakiran posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ahilyakiran:

Share