20/11/2025
बारामतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदरणीय अजितदादांनी सचिन सातव यांचं नाव घोषित केलं, आणि खरं सांगायचं तर बारामतीकरांच्या मनाला ही निवड अगदी भिडणारी आहे.
दादांना कोण कुठल्या कामाला योग्य आहे याची अचूक जाण आहे आणि या निवडीतून तेच दिसून येतं.
फोरममध्ये सुनेत्रावहिनींच्या मार्गदर्शनाखाली काम करताना, सचिनशेठ यांची कामाची वृत्ती, लोकांशी असणारा जिव्हाळा आणि जबाबदारी सांभाळण्याची त्यांच्या मनाची ताकद हे सगळं अगदी जवळून दिसलं. काही लोक काम करतात… आणि काही लोक काम जगवतात… सचिनशेठ त्या दुसऱ्या प्रकारात मोडतात मन लावून, मनाशी नातं जोडून काम करणारे.
दादांची काम करण्याची स्टाईल कोणाला सांगायची गरज नाही प्रत्येक्षात जाऊन पाहणं, प्रगतीची पावलं रोज टाकणं, लोकांच्या गरजा ओळखून उपाय करणं… आणि हीच पद्धत सचिनशेठ एकदम मनापासून अंगीकारून चाललेत. अनेकदा तर दादा पोहोचायच्या आधीच ते कामाच्या ठिकाणी उभे असतात…
हे बघून एकच जाणवतं
"हा दादांचा खरा माणूस आहे… बारामतीला हवं होतं तेच नेतृत्व!"
एक कार्यक्रम असो किंवा मोठं प्रोजेक्ट… सचिनशेठ लोकांच्या ताकदीप्रमाणे त्यांना जबाबदारी देतात, काम वेळेत पूर्ण होईल यासाठी ते स्वतः धावपळ करतात, आणि त्यात कुठेही अहंकार नाही फक्त बारामतीवरचं प्रेम.
त्यांच्यासोबत काम केलं की जाणवतं "हा माणूस नेता नाही… आपला सोबती आहे, आपल्या गावासाठी आपल्या बारामतीसाठी मनापासून झटणारा आहे."
बारामती सहकारी बँक मिळालेली जबाबदारीची म्हणजे एकप्रकारे "काटेरी खुर्ची".
अनेक अडचणी, अनेक दडपण…पण सचिनशेठ यांनी बँकेला स्थिरतेतून प्रगतीकडे नेलं.
कठोर निर्णय घ्यावे लागले, काही लोकांना वाईटही वाटलं पण त्यांचा हेतू कधीच वैयक्तिक नव्हता… अजितदादा नी टाकलेली जबाबदारी, बँकेचं भलं आणि लोकांचा फायदा हाच होता. आज बँक महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक झाली आहे, हे त्यांचं शांत पण ठाम नेतृत्व दाखवून देतं.
वास्तविक सचिन सातव यांचा राजकीय वारसा मजबूत आहे आजोबा, वडील आणि आई या तिघांनीही बारामतीचे नगराध्यक्ष म्हणून काम केलं. पण खरा वारसा म्हणजे लोकांशी असलेलं मनाचं नातं. सर्व जातीधर्मांतले लोक त्यांना आपला म्हणून ओळखतात. गावाच्या गरजा काय आहेत, लोक काय बोलतात, कोणाच्या कुठल्या अडचणीत आहे ह्यांची सचिनशेठ यांना जाण आहे ते सर्व ऐकतात, समजून घेतात आणि सोडवतात.
काही वर्षं नगरपालिका प्रशासनाकडे गेल्यामुळे काही कामं अडकली, काही उणिवा राहिल्या, दबाव राहिला. पण आता त्या पुन्हा मार्गावर आणण्याची मोठी जबाबदारी सचिन सातव यांच्या खांद्यावर येणार आहे, आणि ते ती मनापासून पार पाडतील यावर पूर्ण विश्वास आहे.
अजितदादा आणि वहिनी नेहमी म्हणतात
"बारामती म्हणजे आपले कुटुंबं." आणि त्या कुटुंबाची जबाबदारी योग्य आणि नियोजन रितेन सांभाळण्यासाठी केलेली निवड म्हणजे सचिन सातव.
सचिन सातव यांना लोक त्याला राजकारणी म्हणून नाही, तर आपला माणूस म्हणून बघतात.
सचिनशेठ, मनापासून शुभेच्छा.!!
बारामतीला प्रगतीच्या नवीन वाटा दाखवण्यासाठी,
दादा वहिनींचं स्वप्न साकार करण्यासाठी
तुमची पुढची वाटचाल उज्ज्वल होवो हीच मनापासून शुभेच्छा.
✍️ ..... अमोल कावळे, बारामती.