Baramati Sanchar

Baramati Sanchar लोकहिताचा विचार, बारामती संचार

08/06/2026

वारसा अजितदादांचा, कार्यशैली सुनेत्रावहिनींची!

बारामती — कोणताही गाजावाजा नाही, कोणतीही पूर्वसूचना नाही. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी काल बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत त्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छतेची स्थिती, औषधांचा पुरवठा तसेच एकूण व्यवस्थापनाची सखोल माहिती घेतली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देत जबाबदारीने व तत्परतेने काम करण्याच्या सूचना दिल्या.

रुग्णालय परिसरात स्वच्छता राखण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले. आरोग्य सेवांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाव्यात, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश त्यांनी दिले.

ही केवळ औपचारिक भेट नव्हती, तर लोकांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता आणि प्रशासनावर असलेली बारीक नजर याचे प्रत्यंतर देणारी कृती होती. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम सुनेत्रावहिनी करत असल्याचे या भेटीतून पुन्हा एकदा दिसून आले.

जनतेच्या प्रश्नांबाबतची तत्परता, कामातील शिस्त आणि प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याची पद्धत यामुळे आज अनेकांना त्यांच्यामध्ये अजितदादांचे प्रतिबिंब दिसत आहे. आगामी काळात बारामतीच्या आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक आणि लोकाभिमुख बदल घडवून आणण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

08/06/2026

खाकीची कामगिरी! बारामती पोलिसांनी शोधून दिले नागरिकांचे २२ हरवलेले मोबाईल!

07/06/2026

राज्यातील अवकाळी व गारपीटग्रस्तांसाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश

#महाराष्ट्र #शेतकरी #अवकाळीपाऊस #गारपीट

05/06/2026

बारामतीतील पावसामुळे झालेल्या नुकसानीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

बारामती परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून सुरू असलेल्या मदत व पुनर्वसन कामांचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या तसेच बाधित नागरिकांना आवश्यक ती मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. रस्ते, वीजपुरवठा, शेती आणि इतर सार्वजनिक सुविधांवरील परिणाम लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नुकसानग्रस्त भागांमध्ये मदतकार्य वेगाने सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांना दिली. परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून नागरिकांना आवश्यक ती मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

29/05/2026

पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही;भुजबळ पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत - उमेश पाटील

सुत्रांकडून आलेल्या बातम्या तुम्ही लावाव्या का? ;उमेश पाटील यांचा माध्यमांना सवाल...

नवी दिल्ली दि. २९ मे - मंत्री छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्याबाबत योग्य तो खुलासा केला आहे. ज्या बातम्या येत आहेत त्या सुत्रांच्या हवाले येत आहेत. एकतर्फी आणि नकारात्मक बातम्या पार्थ पवार किंवा पक्षाबद्दल दिल्या जात आहेत. मात्र दुसरी बाजू माध्यमांनी समजून घेतली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी माध्यमांसमोर दिल्ली येथे मांडली.

गेले तीन दिवस पार्थदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार या दिल्लीत बैठकीला आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बैठका घेत आहेत. मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसताना बातमी आली आहे असेही उमेश पाटील म्हणाले.

प्रत्येक बातमी तुमची सुत्रांकडून येत आहे. कोणतीही पुराव्याची बातमी लावलेली नाही. त्यामुळे सुत्रांकडून आलेल्या बातम्या तुम्ही लावाव्या का असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पार्थ पवार यांच्याकडे नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत त्यामुळे त्यांना त्या नवीन आहेत. सुत्रांच्या हवाले बातम्या येणे योग्य नाही. आम्हाला कोण टार्गेट करतंय असं आम्हाला वाटत नाही. मात्र खात्री किंवा पुरावा असल्याशिवाय बातम्या लावणं चुकीचं आहे असेही उमेश पाटील म्हणाले.

29/05/2026

बारामती MIDC मध्ये CCTV ची करडी नजर! ५७ कॅमेरे बसवले!

​बारामती ग्रामीण पोलिसांचा मोठा निर्णय! आता गुन्हेगारांची खैर नाही!

बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन आणि स्थानिक कंपन्यांच्या माध्यमातून बारामती एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडी परिसरात ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या कल्पनेतून ८,७०,००० रुपयांचा हा उपक्रम साकारण्यात आला आहे.

बारामतीत वाहतुकीसाठी 'सिग्नल' व्यवस्था; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
10/08/2025

बारामतीत वाहतुकीसाठी 'सिग्नल' व्यवस्था; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

बारामती, दि. १०: शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी बारामती शहरातील १० प्रमुख चौकांमध्ये सिग्नल .....

बारामतीत वाहतुकीसाठी 'सिग्नल' व्यवस्था; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
10/08/2025

बारामतीत वाहतुकीसाठी 'सिग्नल' व्यवस्था; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

24/04/2024
बारामतीतील धक्कादायक घटना! वीजबिलाच्या तक्रारीची दखल घेतली नाही, महावितरण महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार, मह...
24/04/2024

बारामतीतील धक्कादायक घटना! वीजबिलाच्या तक्रारीची दखल घेतली नाही, महावितरण महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार, महिलेचा मृत्यू

बारामती : बारामती तालुक्यातील मोरगाव येथे महावितरण कंपनी कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल...

Address

Samarth Nagar
Baramati
413102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baramati Sanchar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share