
03/09/2024
३ सप्टेंबर २००० रोजी गौरी पुजनाच्या दिवशीच आमच्या घरात या खऱ्याखुऱ्या गौरीचे सकाळी ६ वाजता आगमन झाले. विशेष म्हणजे याच दिवशी सायंकाळी पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झालेल्या मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते आमच्या प्राथमिक आश्रमशाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि विस्तारीत इमारतीचे पायापुजन समारंभ पार पडला.ज्याचा घरी मुलगी जन्माला येते, त्याच्या घरी स्वतः लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते. त्याचा आम्हाला साक्षात्कार झाला होता. कारण सकाळी मुलीचा जन्म आणि संध्याकाळी नुतुन इमारत बांधकामासाठी पवार कुटुंबीयांतर्फे अजितदादांनी पाच लाखाची देणगी जाहीर केली होती. घरात लेक जन्माला आल्याचा आनंदोत्सव समर्थ ज्ञानपीठ या शिक्षण संस्थचे संस्थापक माझे ज्येष्ठ बंधु स्व. हनुमंतराव सावंत यांनी साजरा केला होता. वाढदिवसानिमित्त कन्या प्रतिक्षेला खूप खूप शुभेच्छा 💐🙏🏻