22/10/2024
*दसरा ते दिवाळी सवलत योजना*
(*२५% सवलत*)
*द मेंटल टफनेस*
(मनाची कणखरता )
- डॅमन झहरियादेस
यशस्वी लोकांना भीती, शंका, काळजी वाटत असेल का नाही? असा विचार तुम्हाला सुद्धा पडला असेल तर त्याचे उत्तर आहे की, काळजी वाटते पण हे यशस्वी लोक या भावनांना त्यांचा मार्गातील अडथळा बनू देत नाहीत. त्यासाठीच लागते कणखर मन. ज्या व्यक्तींचा मानसिक दृष्टीकोन योग्य असतो त्यांना ध्येय साध्य होतेच आणि या उलट जर दृष्टीकोन अयोग्य असेल तर अशा लोकांना जगाच्या पाठीवर कुठेही मदत मिळत नाही.
मेंटल टफनेस हे पुस्तक अशाच कणखर मनाचे महत्त्व सांगणारे पुस्तक आहे. याचे लेखक डॅमन झहरियादेस याच विषयातील तज्ञ आहेत.
महेंद्रसिगं धोनीचा कूलनेस आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याच्या याच स्वभावामुळे अतिशय तणावाच्या परिस्थितीत तो शांतपणे व योग्य निर्णय घेऊ शकतो. हाच मनाचा कणखरपणा अशावेळी कामाला येतो, आणि तो विकसित करावा लागतो. या विषयावर लेखकाने सखोल अभ्यास केला आहे. आणि हेच मानसशास्त्रीय ज्ञान अतिशय सोपं करून सांगितले आहे. मानसिक कणखरतेची गरज, त्यामुळे मिळणारे फायदे, त्या प्रक्रियेतील अडथळे आणि समस्या निवारण कसे करावे? हे सगळे टप्याटप्याने समजून दिले आहे. कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती जर दिर्घकाळ यश मिळवत असेल तर ती मानसिक दृष्ट्या कणखर आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मनाची कणखर अवस्थाच यश आणि अपयश यामधील फरक अधोरेखित करते. याच कणखरपणाला आपण हिंमत, चिकाटी, दृढनिश्चय अशा विविध नावांनी ओळखतो. हा मेंटल टफनेस म्हणजे नक्की काय, तो कसा मिळवायचा, त्यांचे फायदे आणि शत्रू कोण आहेत हे सुरूवातीला दिले आहे. त्यानंतर कणखरतेच्या विकासातील महत्वाचे घटक कोणते आहेत आणि त्यासाठी व्यवहारात उपयोगी पडतील असे ट्रेनिंग दिले आहे. पाच सोप्या सवयी दिल्या आहेत ज्यामुळे स्वतः वर नियंत्रण ठेवणे सोपे होते. खडतर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी हे सगळे फार महत्त्वाचे आहे. परिस्थिती कधीही बदलू शकते हे आपण जाणतोच, मग त्यासाठी नेहमी तयार रहायचे असेल तर हे पुस्तक हातात असणे गरजेचे आहे.
पुस्तक परिचय - अभय कोटलवार,
किंमत :- 250/-
सवलतीत:- 188/-
संपर्क-
संकेत बुक्स आणि स्टेशनरी बारामती
9960085612
पुस्तकाविषयी अधिक माहितीसाठी आणि घरपोच पुस्तके मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून मॅसेज करावा.
http://wa.me/919960085612
धन्यवाद 🙏