महा News

महा News महा News | बातमी आपल्या महाराष्ट्राची

13/07/2025

गजानन महाराज पालखीचे बार्शी मधून भूम कडे प्रस्थान

13/07/2025

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे भगवंत नगरी मध्ये आगमन | Live

13/07/2025

बार्शीत भुयारी गटारीच्या उघड्या चेंबरमुळे रिक्षाचा अपघात; सनगर गल्लीतील युवकांची तत्पर मदत

बार्शी – शहरातील सनगर गल्ली परिसरात भुयारी गटारीच्या उघड्या चेंबरच्या झाकणात रिक्षाचे चाक अडकून अपघात घडल्याची घटना आज घडली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी प्रवाशांना काही प्रमाणात दुखापत झाली आहे.

घटनेनंतर सागर बिडकर, गिरीश बरीदे आणि किरण मक्के या स्थानिक युवकांनी तात्काळ धाव घेत अपघातग्रस्त प्रवाशांना रिक्षाच्या बाहेर सुरक्षितरित्या बाहेर काढले. त्यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.

सदर चेंबरचे झाकण तुटलेले असून, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांनी या ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्याची आणि चेंबर तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

स्थानिकांनी प्रशासनाला याबाबत जागरूकतेचे आणि तत्काळ कारवाईचे आवाहन केले आहे.

#बार्शी #रोड #अपघात #रिक्षा #महा_न्युज

12/07/2025

श्री भगवंतास दूध अभिषेक

#श्री_भगवंत_लक्ष्मी_दर्शन🙏🌸
#श्री_भगवंत_मंदिर_बार्शी

बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पीटलला धर्मादाय रुग्णालय नियमांचे पालन करण्याचे निर्देशपालन न केलेस कारवाई करण्याचा इशाराबार्श...
11/07/2025

बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पीटलला धर्मादाय रुग्णालय नियमांचे पालन करण्याचे निर्देश

पालन न केलेस कारवाई करण्याचा इशारा

बार्शी - येथील जगदाळे मामा हॉस्पीटल या धर्मादाय रुग्णालयाबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सोलापूर यांनी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. धर्मादाय उप आयुक्त, सोलापूर यांच्या ९ जुलै २०२५ रोजीच्या आदेशानुसार, निरीक्षक चौकशी क्रमांक ०५/२०२५ च्या अहवालानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत.

रुग्णालयाने उच्च न्यायालय, मुंबई यांनी मंजूर केलेल्या योजनेचा फलक सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावा, असे निर्देशात नमूद आहे. तसेच, निर्धन आणि दुर्बल घटकांतील रुग्णांना आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर तात्काळ उपचार द्यावेत आणि अत्यावश्यक परिस्थितीत कागदपत्रे सादर करण्यास सवलत द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, रुग्णालयात आरोग्य मित्र आणि वैद्यकीय समाजसेवक यांचे संपर्क क्रमांक असलेला फलक लावून रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्याची सूचना देण्यात आली आहे.

रुग्णालयाच्या आवारात रुग्णाच्या नातेवाइकाच्या एका वाहनाला पार्किंग शुल्क आकारू नये आणि जास्तीत जास्त पात्र रुग्णांना धर्मादाय योजनेचा लाभ मिळावा याची दक्षता घ्यावी, असेही निर्देशात म्हटले आहे. या निर्देशांची पूर्तता करून अनुपालन अहवाल त्वरित सादर करण्यास सांगितले असून, तसे न केल्यास महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

10/07/2025

गुरुपौर्णिमे निमित्त भगवंताची नगर प्रदक्षिणा

09/07/2025

बार्शीचा पिक विमा प्रश्न विधानसभेत
आमदार दिलीप सोपल यांच्या वतीने आमदार भास्कर जाधव यांनी मांडली वस्तुस्थिती !

#महा_न्युज

रणवीर राऊत यांची भाजपच्या राज्य परिषदेवर निवडबार्शी – बार्शीतील युवा नेतृत्व म्हणून परिचित असलेले रणवीर राऊत यांची भारती...
09/07/2025

रणवीर राऊत यांची भाजपच्या राज्य परिषदेवर निवड

बार्शी – बार्शीतील युवा नेतृत्व म्हणून परिचित असलेले रणवीर राऊत यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश राज्य परिषदेवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत सक्रीय असलेल्या राऊत यांना ही जबाबदारी मिळाल्याने राऊत गटात आनंदाचे वातावरण आहे.

रणवीर राऊत हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र असून, त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. पक्षाच्या विविध स्तरांवर त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

युवकांमध्ये प्रभावी नेतृत्व उभे करण्याच्या दृष्टीने भाजपने रणवीर राऊत यांच्यावर टाकलेली ही जबाबदारी भविष्यातील पक्षवाढीसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

बार्शी परिसरातील राजकीय, सामाजिक आणि नागरिकांकडून रणवीर राऊत यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

#रणवीर #राऊत #भाजपा #बार्शी #महा_न्युज

कर्मवीर ढोल-ताशा,ध्वज पथक, बार्शीच्या वतीने श्री भगवंत रथ यात्रेत स्वच्छता मोहिम #बार्शी : आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्य...
07/07/2025

कर्मवीर ढोल-ताशा,ध्वज पथक, बार्शीच्या वतीने श्री भगवंत रथ यात्रेत स्वच्छता मोहिम

#बार्शी : आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या ग्रामदैवत श्री भगवंत रथ यात्रेत विविध संस्था,मंडळे भाविक भक्तांसाठी फराळाचे पदार्थ,केळी वाटप करतात. त्या पदार्थांच्या प्लेट,द्रोन,प्लास्टिक पिशव्या पाणी बाटल्या टाकून दिल्या जातात. त्यामुळे रथ यात्रेत गलीच्छता दिसून येते.

या गोष्टीचं भान ठेऊन कर्मवीर ढोल-ताशा,ध्वज पथक,बार्शी. च्या सदस्यांनी रथाच्या पाठीमागे राहून रथ ज्या-ज्या मार्गावरून जातो तो संपुर्ण परिसर स्वच्छ करून शहराचे पावित्र्य राखले.

या मोहिमेसाठी भगवंत मंदिर चे सरपंच दादासाहेब बुडूख,नाना सुरवसे,मोहन कुलकर्णी,मुकुंद कुलकर्णी, उमेश काळे, हर्षद लोहार यांनी मार्गदर्शन केले.

तसेच भगवंत देवस्थान च्या वतीने पथकाचा सन्मान करण्यात आला.

अक्षय काजळे,आप्पासाहेब घबाडे,गणेश ढगे, धीरज देशमुख,सुदर्शन मोरे,संतोष चव्हाण,ललकार कादे,केदार शेटे,राम परदेशीं,आकाश तिकटे,विजय कदम,ज्योतीराम फुरडे, अशोक आरगडे,राजवीर परदेशी, निदीश उपरे,रिझवाना शेख,नंदिनी विभुते,ऋतूजा योगे,ऐश्वर्या गायकवाड, प्रविण परदेशी,अविनाश बोकेफोडे आदींनी परिश्रम घेतले.
#बार्शी #आषाढी #एकादशी #महा_न्युज

Address

Barshi

Telephone

+918983367174

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महा News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share