28/09/2023
बाळासाहेब चव्हाण #मॅन ऑफ द मॅच, तर संतोष गिरिगोसावी मॅन ऑफ द #सिरीज.
सध्या सर्वत्र सन उत्सवाचा काळ होता गणपती विसर्जन झाले की आता सर्वांना वेध लागले आहेत क्रिकेट वर्ल्ड कप सिरीज चे. आगामी वर्ल्ड कप कोण जिंकणार, प्रतेक मॅच ला कोण मॅन ऑफ द मॅच ठरतो, तर मॅन ऑफ द सिरीज चा खिताब कोण मिळवणार या कडे सर्व क्रिकेप्रेमींचे लक्ष लागून राहिलेले असते. सन उत्सवाच्या काळ बार्शीकरांसाठी अगदी निर्विघ्न पार पडावा म्हणून प्रशासनातील नगरपालिका व पोलीस प्रशासन या दोन टीम दिवसरात्र झटत होत्या.
प्रशासनातील या दोन टीम ने केलेल्या मेहनतीमुळे बार्शीकरांसाठी सन उत्सवाचा काळ अगदी उत्साही, कोणतीही गैरसोय न होता, शांततेत पार पडला आहे. बार्शीतील मागील काही काळातील आढावा घेतला तर लक्षात येईल की प्रशासनातील या दोन्ही टीम ने अगदी योग्य भूमिका बजावली आहे. बार्शी शहरात नगोबाची जत्रा मोठी असते. यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन केले होते. या जत्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. महिला, लहानमुले अगदी वृध्द नागरिक ही जत्रेत जाऊ शकत होते असे हे नियोजन केले होते.
त्या नंतर बार्शीत दहीहंडी उत्सव सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. या वेळी प्रतेक मंडळाची दहीहंडी उपक्रम वेगवेगळ्या दिवशी होता. तरीही पोलीस प्रशासनाने अडवणूक न करता प्रतेक मंडळाला परवानगी दिली. कार्यक्रम स्थळी योग्य बंदोबस्त तैनात केला. गर्दी झालेल्या ठिकाणी पर्यायी मार्ग सुरू ठेवून वाहतुकीला होणारा अडथळा ही दूर केला. त्या नंतर आलेल्या गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक घेऊन सन उत्सव उत्साहात, शांततेत व धार्मिक सलोखा ठेऊन साजरे करण्यासाठी बार्शीकर नागरिकांचा मनोबल, उत्साह वाढवला.
या काळात शहरातील बाजारपेठेत होणारी मोठी गर्दी याचे मायक्रो नियोजन करण्यात आले. गर्दीची ठिकाणे, होणारी गैरसोय, संभव्या अडचणी याची योग्य माहिती घेऊन नियोजन आखण्यात आले. हा आराखडा आखताना नागरिक व छोटे मोठे व्यापारी असे कोणाचीच गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. गणेशोत्सवा आधीच नगरपालिकेने मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढऱ्या पट्या ओढून हातगाडी, फेरीवाले, फळ विक्रेते, छोटे व्यावसायिक यांना मुख्य बाजारपेठेतच पण पांढऱ्या रेषेच्या आत जगा निश्चित केली. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी खऱ्या अर्थाने भगवंत मंदिर ते जुने पोलीस स्टेशन या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असेल.
त्याच बरोबर गणपती मूर्ती विक्रीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर येथील मोकळ्या जागेत नगरपालिकेने स्टॉल लावले. तर या ठिकाणी येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलीस बंदोबस्त व बॅरेगेटीग करून गर्दी नियंत्रणात ठेवली. या मुळे सर्वांना मूर्ती घेणे, इतर खरेदी करणे अगदी सुककर झाले. पोलिसांना गर्दीवर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले. त्यामुळे पाकीट मारी, भुरटी चोरी अशा गोष्टीना आळा बसला. गौरी आगमन काळात बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन नगरपालिका ते जुने पोलीस स्टेशन तसेच इतर महत्वाच्या मार्गावर काहीकाळ मोठी वाहने, रिक्षा यांना बंदी घातली त्यामुळे ट्रॅफिक जाम सारखी समस्या निर्माण झाली नाही.
पाच दिवस विविध मंडळाने उभारलेल्या देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन सायंकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त, वाहतूक पोलीस तैनात केले होते. गणेशोत्सवाच्या आठव्या, नवव्या व दहाव्या दिवशी ज्या मंडळाला मिरवणूक काढायची त्यांना परवानगी देऊन, त्याचा मार्ग, होणारी गर्दी त्या प्रमाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी पुरवले होते. यामुळे गणपती आगमन आसो की विसर्जन सर्व मिरवणुका अगदी शांततेत व वेळेत पार पडल्या.
बार्शी शहरातील उत्सव, कोणत्या ठिकाणी काय समस्या येतील, कुठे गर्दी होईल याचा आराखडा तयार करून त्यावर पोलिसांकडून अगदी योग्य उपाययोजना झाल्याचे बार्शीकरानी प्रथमच अनुभवले आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव याचा ही प्रचार, प्रसार चांगल्या पद्धतीने केला होता. बार्शी नगरपालिकेने गणेश विसर्जन दिवशी शहरातील विविध भागात त्यांच्या अधिकारी, कर्मचारी यांची दहा पथके तैनात केली होती. त्याद्वारे घरातील व सार्वजनिक मंडळाने असे सुमारे पाच ते सहा हजार गणपती मूर्ती जमा करून नगरपालिकेने तयार केलेल्या विसर्जन हौदात विसर्जन केले. तसेच शहरातील गणेश तलाव व राऊत तळे या ठिकाणी नगरपालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना दिवसभर तैनात केले होते. त्यामूळे विसर्जनाला गेल्या नंतर होणारे अपघात टाळता आले. खऱ्या अर्थाने सन उत्सव निर्विघ्न पार पडले आहेत.
बार्शीतील जनतेनेही प्रशासनाला मोठे सहकार्य केले यात शंका नाही. मागील काळात सुरू असलेली सणांची ही स्पर्धा पुढे ही चालू राहील. पण आज पर्यंतच्या या सणांच्या सामन्यात सर्व बार्शीकर विजेते ठरले त्यांनी सन उत्सव कोणतेही गालबोट न लावता उत्साहात पण तितक्याच शिस्तबध्द साजरे केले आहेत. म्हणूनच या सणांच्या स्पर्धेत सर्वांसाठी झटणारे नगरपालिका व पोलीस प्रशासन हे हिरो ठरले आहेत. म्हणुच बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण मॅन ऑफ द मॅच, तर बार्शी शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी मॅन ऑफ द सिरीज ठरले आहेत.
------
सुदर्शन हांडे,
एक बार्शीकर नगरिक.