REAL News बातमी महाराष्ट्राची

  • Home
  • India
  • Barsi
  • REAL News बातमी महाराष्ट्राची

REAL News बातमी महाराष्ट्राची REAL News | बातमी महाराष्ट्राची
(1)

07/06/2025

🙏 एक मदतीचे आवाहन 🙏
आपल्या मित्र परिवारातील आपला लाडका मित्र हर्षद लोहार सध्या अत्यंत गंभीर आजाराशी झुंज देत आहे. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. मात्र, या उपचारासाठी लागणारा हॉस्पिटल आणि ऑपरेशनचा खर्च खूप मोठा आहे. हर्षदच्या कुटुंबासाठी हा आर्थिक बोजा पेलवणं अत्यंत कठीण आहे.
हर्षद हा मनाने अत्यंत उमदा, हसतमुख आणि मदतीला सदैव धावून जाणारा मित्र आहे. आज हर्षदला आणि त्याच्या कुटुंबाला आपल्या सर्वांच्या आधाराची, प्रेमाची आणि मदतीची खूप गरज आहे.
आपण सर्वांनी मिळून आपापल्या परीने थोडा थोडा हातभार लावला, तर हर्षदच्या उपचारांचा मार्ग थोडा तरी सोपा होईल.

कृपया शक्य ती आर्थिक मदत पुढे येऊन करावी आणि हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा.

💐 एकत्रितपणे आपण आशेचा किरण निर्माण करू शकतो! 💐
खाली दिलेल्या अकाऊंटवर / फोन पे / गूगल पे द्वारे मदत पाठवू शकता: 👉
संपर्क: प्रविण पावले Google pay / Phone pay Number
8983367174

🙏 आपल्या मदतीची वाट पाहतोय... 🙏 -

05/06/2025

विचार करा याच्या आईने ९ व्या महिन्यात किती सेल्फी काढल्या असतील..?

बार्शी-लातूर रोडवरील खड्ड्यांमुळे मोठा अपघात होता होता टळला — प्रशासनाकडून तत्काळ दखल घेण्याची मागणीबार्शी: बार्शी-लातूर...
04/06/2025

बार्शी-लातूर रोडवरील खड्ड्यांमुळे मोठा अपघात होता होता टळला — प्रशासनाकडून तत्काळ दखल घेण्याची मागणी

बार्शी: बार्शी-लातूर रोडवरील MIT शाळेसमोरच्या मोठ्या खड्ड्यांमुळे एक गंभीर अपघात होता होता टळल्याची घटना आज घडली. खड्ड्यांमुळे एक दुचाकीस्वार अचानक मार्ग बदलून समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स समोर आला. सुदैवाने ट्रॅव्हल्स चालकाने प्रसंगावधान राखून गाडी वेळीच थांबवली आणि मोठा अनर्थ टळला.

ही घटना पाहणाऱ्या नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अशा घटना पुन्हा होण्याची भीती व्यक्त केली आहे. स्थानिक प्रशासनाकडे विनंती करण्यात येत आहे की, अपघात टाळण्यासाठी आणि नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी हे खड्डे लवकरात लवकर भरावेत.

नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना अपेक्षित असून, भविष्यातील संभाव्य दुर्घटनांना आळा घालण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

या बाईचा Divorce होता होता वाचला "RCB अगर फायनल नाही जीती तो मै अपने पती को तलाक दुंगी" असा बोर्ड झळकला होता.
04/06/2025

या बाईचा Divorce होता होता वाचला

"RCB अगर फायनल नाही जीती तो मै अपने पती को तलाक दुंगी" असा बोर्ड झळकला होता.

"E sala Cup namde" ही कन्नड भाषेतील एक लोकप्रिय वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ:"या वेळी कप आपलाच!"E sala = "या वेळी" (This t...
04/06/2025

"E sala Cup namde" ही कन्नड भाषेतील एक लोकप्रिय वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ:

"या वेळी कप आपलाच!"

E sala = "या वेळी" (This time)

Cup namde = "कप आपलाच" (Cup is ours)

ही घोषणा विशेषतः IPL (Indian Premier League) मधील Royal Challengers Bangalore (RCB) संघाच्या चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. दरवेळी RCB चाहत्यांना वाटतं की "या वेळेस तरी आपला संघ IPL जिंकेल" – म्हणून ते म्हणतात: "E sala Cup namde!"

मजेशीर गोष्ट अशी की, RCB अजूनही (२०२५ पर्यंत) IPL विजेते झालेले न्हवते, त्यामुळे हे वाक्य थोडंसं विनोदी आणि मीम्समध्येही वापरलं गेलं.









03/06/2025

RCB ने IPL मॅच जिंकल्यावर बंगळुरूच्या आकाशात फटाक्यांची आतषबाजी

िजयआतषबाजी
#बंगळुरूचाआकाशलाल
ाकेमोड
#आकाशातRCBचाझळाळ
#विजयाचीआतषबाजीRCB
ा विजयसोहळा
#बंगळुरूतफटाकेRCBसाठी
ीआकाशातजादू
#आतषबाजीRCBशैलीत
िजयीबंगळुरू

जितका मोठा संघर्ष असतो...विजयही तितकाच भव्य असतो !विराट कोहली आणि टीम RCB ने हेच पुन्हा एकदा सिद्ध करत तब्बल १८ वर्षांची...
03/06/2025

जितका मोठा संघर्ष असतो...
विजयही तितकाच भव्य असतो !

विराट कोहली आणि टीम RCB ने हेच पुन्हा एकदा सिद्ध करत तब्बल १८ वर्षांची तपस्या पूर्णत्वास नेली.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे व संघाच्या तमाम चाहत्यांचे हार्दिक अभिनंदन !

Virat Kohli Royal Challengers Bengaluru

व्हॉईस ऑफ मीडिया च्या मागणीला यश,महाराष्ट्र शासनाकडून डिजिटल माध्यम जाहिरात धोरण जाहीरमुंबई, बारामती व शिर्डी येथे झालेल...
03/06/2025

व्हॉईस ऑफ मीडिया च्या मागणीला यश,महाराष्ट्र शासनाकडून डिजिटल माध्यम जाहिरात धोरण जाहीर

मुंबई, बारामती व शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनात केली होती मागणी.

#मुंबई, ३ जून २०२५ डिजिटल मिडियासाठी ऐतिहासिक निर्णय! राज्य शासनाने अखेर व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल माध्यमांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. "डिजिटल माध्यम शासकीय जाहिरात मार्गदर्शक सूचना" आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या असून त्या आजच्या तारखेपासून अमलात येणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून माहितीच्या प्रसारात डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता, व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेनी मुंबई, बारामती व शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनात शासनाकडे डिजिटल माध्यमांना शासकीय जाहिराती मिळाव्यात, अशी मागणी सातत्याने केली होती.

या मागणीचा विषय आमदार सत्यजित तांबे, हेमंत पाटील यांनी उचलून धरला. या मागणीची दखल घेत सामान्य प्रशासन विभागाने आज शासन परिपत्रक क्रमांक मावज-२०२५/२५१/प्र.क्र. १३२/मावज १ द्वारे हा निर्णय घोषित केला.

शासन परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, या मार्गदर्शक सूचनांचा लाभ सर्व विभाग, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय कंपन्यांना होणार असून, ते आता डिजिटल माध्यमांना अधिकृतरित्या शासकीय जाहिराती देऊ शकतात.

या निर्णयामुळे डिजिटल माध्यमांना आर्थिक स्थैर्य मिळेल,शासनाच्या योजना आणि धोरणांचा प्रसार अधिक प्रभावीपणे होईल,माहितीचा लोकांपर्यंत जलद आणि पारदर्शक पोहोच होईल.शासनाचे हे परिपत्रक अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध असून, त्याचा संकेतांक २०२५०६०३१५१४०९८७०७ आहे.

हा आदेश अवर सचिव अ. धों. भोसले यांच्या डिजीटल स्वाक्षरीसह निर्गमित करण्यात आला आहे.

व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशअध्यक्ष अनिल मस्के, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, डिजिटल विंगचे प्रदेशअध्यक्ष हर्षद लोहार, उपाध्यक्ष अश्विनी पुरी, सचिव इर्शाद शेख कार्याध्यक्ष अशोक घावटे, प्रविण पावले यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि राज्य शासनाचे आभार मानले. की त्यांनी नवमाध्यमांच्या अस्तित्वाला मान्यता देत एक सकारात्मक पाऊल उचलले आहे.

#व्हॉईसऑफमीडियाच्या_मागणीला_यश
#डिजिटलमाध्यमजाहिरातधोरण
#महाराष्ट्रशासननिर्णय
#नवमाध्यमांचीमान्यता
#डिजिटलमीडियासाठीयश
#व्हॉईसऑफमीडिया
#माहितीचा_प्रसार_डिजिटलने
#शासकीयजाहिराती_डिजिटलमाध्यमांना

श्रीधर कांबळे यांचा सेवानिवृत्त  कार्यक्रम उत्साहात पारबार्शी : श्रीधर कांबळे यांनी आपल्या शिक्षण सेवेमध्ये सातत्याने नव...
02/06/2025

श्रीधर कांबळे यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम उत्साहात पार

बार्शी : श्रीधर कांबळे यांनी आपल्या शिक्षण सेवेमध्ये सातत्याने नवनवीन उपक्रम करून बार्शी शहर व परिसरामध्ये आपल्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक उपक्रमशील शिक्षक असलेले श्रीधर कांबळे हे विद्यार्थी प्रिय शिक्षक, कला प्रिय शिक्षक, समाजसेवक ,क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे, रक्तदानाच्या चळवळीमध्ये काम करणारे अशा विविध रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात .त्यांचे विद्यार्थी समाजातल्या अनेक ठिकाणी उत्तम कार्य करीत आहेत. समाजाला समृद्ध करणाऱ्या शिक्षकांची आज गरज आहे. श्रीधर कांबळे यांच्या कार्याचे अनुकरण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी केलं पाहिजे. कांबळे यांचं काम शब्दांमध्ये मावत नाही. श्रीधर कांबळे यांनी बार्शी शहराच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. श्रीधर कांबळे यांनी 'हाती जे घ्याल, ते तडीस न्याल' अशा प्रकारची भूमिका सातत्याने ठेवल्यामुळे आज त्यांचा गौरव करत असताना आम्हाला आनंद होत आहे." असे गौरवोद्गार विधान परिषदेचे सदस्य शिक्षक आमदार प्रा. जयंत आजगावकर यांनी काढले.

31 मे 2025 रोजी नियत वयोमानानुसार श्रीधर कांबळे हे आपल्या शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने बार्शीच्या आदर्श मंगल कार्यालयामध्ये सिल्वर जुबली शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती समारंभप्रसंगी आ. आजगावकर बोलत होते.

याप्रसंगी माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, माजी आमदार राजेंद्र राऊत , शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, शिवसेनेचे शिंदे सेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे ,वरिष्ठ शिक्षण निरीक्षक रावसाहेब मिरगणे, स्थानिक नियामक मंडळाच्या चेअरमन वर्षाताई ठोंबरे, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, आसिफ भाई तांबोळी, जेष्ठ पत्रकार राजा माने, प्रा. तानाजीराव ठोंबरे ,यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण दादा बारबोले ,यशदाचे संचालक शिवाजीराव पवार ,माजी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, माजी शिक्षणाधिकारी श्री शिवदास नलवडे, माजी गटशिक्षणाधिकारी श्री धावणे, पुणे महापालिकेचे नगरसेवक रवी पाटोळे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दयानंद आढागळे, बार्शी शहरातील जेष्ठ नेते एड. अनिल पाटील, निवृत्त पोलीस निरीक्षक श्रीमती मीनाक्षी पेठे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते .

या कार्यक्रमांमध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी श्रीधर कांबळे यांच्या कारकिर्दीचा गौरव करत असताना बार्शीच्या भगवंत महोत्सवातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला .पत्रकार राजा माने प्रा. तानाजीराव ठोंबरे यांनी श्रीधर कांबळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत असताना काम पुढे चालू ठेवा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करत यापुढील काळात बार्शी शहर व तालुक्यामध्ये निराळ्या प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून आपले काम सातत्याने पुढे राहावे यासाठी योगदान देण्याचा आवाहन केले.

माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी श्रीधर कांबळे यांच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव करत बार्शी शहरातील गेल्या 35 वर्षांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा सविस्तर आलेख मांडला. माजी विद्यार्थी पत्रकार सचिन अपसिंगकर, सोशल मीडिया क्षेत्रामध्ये काम करणारे निरंजन सवने यांनीही समयोचित विचार व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना श्रीधर कांबळे यांनी बार्शीकर यांनी आजवर दिलेल्या सहकार्याचा उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली आणि यापुढील ही काळात आपण आपले काम असेच पुढे ठेवू ,अधिक जोमाने हे काम करत राहू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक अनिरुद्ध चाटी यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पतसंस्थेचे चेअरमन सतीश होनराव व कांबळे परिवाराचे संजय कांबळे यांनी केले.
सूत्रसंचालन नीता देव व सूर्यकांत आदलिंगे यांनी केले. या कार्यक्रमास बार्शी शहर व परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या साहित्य, कला क्रीडा, सामाजिक ,राजकीय ,उद्योग ,आरोग्य या सर्व क्षेत्रातील मंडळींनी मोठी गर्दी केली होती. सुरुवातीला श्रीधर कांबळे यांच्या आई वडिलांच्या लग्नाला 63 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा लग्न वाढदिवसाच्या केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.श्रीधर कांबळे यांच्या सेवापुर्ती निमित्त त्यांचा सत्कार करताना शिक्षक आमदार प्रा. जयंत तासगावकर आसगावकर, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे ,माजी आमदार राजेंद्र राऊत ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी , वर्षा ठोंबरे विश्वास बारबोले यांच्यासह अनेक मान्यवर छायाचित्र दिसत आहेत.

31/05/2025

लग्ना अगोदर हिचे पप्पा शेती आहे का विचारत होते.

पत्रकार पाल्यांचा सन्मान, शालेय साहित्यवाटप अन स्नेहमेळावा, बार्शीत व्हाईस ऑफ मीडियाचा उपक्रमराज्य उपाध्यक्ष अजित कुंकूल...
31/05/2025

पत्रकार पाल्यांचा सन्मान, शालेय साहित्यवाटप अन स्नेहमेळावा, बार्शीत व्हाईस ऑफ मीडियाचा उपक्रम
राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांची माहिती.

#बार्शी, प्रतिनिधी : बार्शी शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि पत्रकारांच्या परिवाराचा स्नेहमेळावा शनिवारी (दि. ७) होणार असल्याची माहिती व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी दिली. राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्याध्यक्ष अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यउपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांच्या पुढाकाराने सुमारे १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाणार आहे.

रेल्वे स्टेशन रोडवरील माऊली लॉन्स येथे शनिवारी (ता. ७) जून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सुयश विद्यालयाचे संस्थापक शिवदास नलावडे, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अरुण बारबोले, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वर्षा ठोंबरे, श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पी.टी.पाटील,जयकुमार शिरोळे, व्हाईस ऑफ मीडियाचे शिक्षण विंग प्रमुख चेतन कात्रे आदी उपस्थित राहणार आहेत.

दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेले पत्रकार पाल्य हर्षद आनंद शेटे (दहावी ९२ टक्के), कु. तन्वी उमेश काळे (दहावी ९० टक्के) कु. सुरभी चंद्रकांत करडे,(दहावी ८४ टक्के), कु. साक्षी प्रदीप माळी (बारावी ७८ टक्के) सिद्धांत अमोल आजबे (बारावी ७२ टक्के) यांचा आणि कु. साक्षी प्रशांत काळे (फिजिओथेरपिस्ट) हिने वैद्यकीय परीक्षेत उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार केला जाणार आहे.

व्हाईस ऑफ मीडिया संघटनेतील सदस्यांच्या पाल्यांनाच नव्हे तर शहर व तालुक्यातील इतर पत्रकारांच्या मुलांना देखील सुमारे एक लाख रुपयाचे शालेय साहित्य वाटप केले जाणार आहे. पत्रकार नेहमीच धावपळीच्या वातावरणात वावरत असतात. त्यामुळे पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांचाही स्नेहभोजनासह मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अजित कुंकूलोळ यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डिजीटल विंगचे प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार, शहराध्यक्ष शाम थोरात, तालुकाध्यक्ष अस्लम काझी, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष अमोल आजबे प्रयत्न करीत आहेत.

30/05/2025

● उजनी धरणाची ३० मे ची परिस्थिती
सन २०१९: -५४%
सन २०२४: -५९%
सन २०२५: +२०.५०% (सकाळी ६ वाजता)

Address

4081 Bhawani Peth
Barsi
413401

Alerts

Be the first to know and let us send you an email when REAL News बातमी महाराष्ट्राची posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share