Belgaav Kesari

Belgaav Kesari News Media Company

22/07/2025

तिसऱ्या रेल्वे ब्रिज वरील खड्डे बुजविण्यात न आल्याने रांगोळी काढून अनोखे आंदोलन

माजी महापौर अॅड. नागेश सातेरी याना पत्नी वियोग गुरुवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी कॉ. सौ. कला नागेश सातेरी (वय ७२) यांचे...
22/07/2025

माजी महापौर अॅड. नागेश सातेरी याना पत्नी वियोग

गुरुवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी कॉ. सौ. कला नागेश सातेरी (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवार दि. २२ रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती माजी महापौर अॅड. नागेश सातेरी, मुलगा अॅड. अजय सातेरी, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. जायंट्स आय फौडेशनच्या माध्यमातून त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात येणार आहे.

निधनवार्ता गुरुनाथ गंगाराम  मुंचंडी वय वर्षे 70राहणार कडोलकर गल्ली बेळगांव मंगळवार 22-7-2025यांचे राहत्या घरी अल्पशा आजा...
22/07/2025

निधनवार्ता

गुरुनाथ गंगाराम मुंचंडी वय वर्षे 70
राहणार कडोलकर गल्ली बेळगांव मंगळवार 22-7-2025
यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. यांच्या पश्चात पत्नी. दोन चिरंजीव. एक मुलगी सून जावई नातवंडे असा परिवार आहे .अंत्ययात्रा राहत्या घरापासून दुपारी 12.00 सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहे.
रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी आठ वाजता सदाशिव स्मशानभूमी मध्ये होणार आहे

16/07/2025

वीरशैव लिंगायत पंथाचे वीरूपाक्षय्य नीरलागीमठ यांची पत्रकार परिषद

16/07/2025

डिव्हाडरवर चढली गाडी ,वाचला ड्राईव्हर
-चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात

महिला विद्यालय मंड्ळातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरी ते इयत्ता नववी पर्यंतच्या गुणी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व ...
15/07/2025

महिला विद्यालय मंड्ळातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरी ते इयत्ता नववी पर्यंतच्या गुणी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व गुरू पौर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.
या कर्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून विधूश्री रेखा अशोक हेगडे या उपस्थित होत्या. तसेच मंडळाचे अध्यक्ष मधुकर परांजपे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कविता परमाणिक उपस्थित होत्या.
पाहुण्यांचे स्वागत कु. सानिका हनमशेट या विद्यार्थिनिने केला. पाहुण्यांचा परिचय कु.चिन्मय चौगुला तर अहवाल वाचन कु. वैभव कुगजी व कु. समृद्धि शामप्रसाद यांनी केला. तसेच मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यांत आले. व विद्यार्थिनिने भरतनाट्यम 'सादर केले. तसेच कु. स्वराणी घाटगे हीने गुरू पौर्णिमे बद्दल विचार मांड्ले व कु. यश कदोलकर याने आभार मानले. व या कर्यक्रमाची सांगता झाली

15/07/2025

18 महिन्यापूर्वी झालं अरेंज मॅरेज. मात्र मुलाला मुलगी पसंत नव्हतीमुलीचा व्हायचा छळ :शेवटी मच्छे मधील विवाहितेची बेंगळूर मध्ये आत्महत्या

श्री महादेव समाज सेवा बटाला यांच्यावतीने बेळगाव मधील व श्री कपिलेश्वर मंदिराच्या सेवेकऱ्यांचा मान सन्मान करण्यात आला श्र...
15/07/2025

श्री महादेव समाज सेवा बटाला यांच्यावतीने बेळगाव मधील व श्री कपिलेश्वर मंदिराच्या सेवेकऱ्यांचा मान सन्मान करण्यात आला श्री महादेव समाजसेवा यांच्या वतीने गेले 30 वर्ष अन्नदान ( लंगर ) सेवा अमरनाथ यात्रेकरूंच्या साठी प्रतिवर्षी आयोजित केली जाते ही अन्नदान सेवा ( लंगर ) अमरनाथ यात्रा संपते तोपर्यंत दिवस-रात्र अखंड सुरू राहते श्री महादेव समाज सेवा च्या वतीने सातत्याने गेले 25 वर्ष बेळगावचे यात्रेकरू सोमनाथ हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ यात्रेसाठी जात राहतात यावर्षी श्री कपिलेश्वर मंदिराचे महिला सेवेकरी व पदाधिकारी या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत यावेळी सोमनाथ हलगेकर कपिलेश्वर मंदिराचे ट्रस्टीअजित जाधव प्रसाद बाचुळकर तसेच सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांचा सत्कार या श्री महादेव समाज सेवा बटाला यांच्या वतीने करण्यात आला

14/07/2025

कित्तूर राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्दा सहकारी लिमिटेड बैलहोंगल घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी l

मनोहर सुब्राव पाटील (गवळी) यांचे निधनबेळगाव : मूळचे धामणे, सध्या वडगांव बेळगांव येथील श्री. मनोहर सुब्राव पाटील (गवळी) य...
14/07/2025

मनोहर सुब्राव पाटील (गवळी) यांचे निधन

बेळगाव : मूळचे धामणे, सध्या वडगांव बेळगांव येथील श्री. मनोहर सुब्राव पाटील (गवळी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे आहेत.
रक्षा विसर्जन 14/07/2025 ठीक सकाळी 8 वाजता धामणे येथे करण्यात आले

पार्वती शंकर खन्नुकर यांचे निधनपार्वती शंकर खन्नुकर (वय 56 वर्षे) रा. गणेश पेठ गल्ली, जुने बेळगाव, बेळगाव येथील रहिवासी ...
12/07/2025

पार्वती शंकर खन्नुकर यांचे निधन

पार्वती शंकर खन्नुकर (वय 56 वर्षे) रा. गणेश पेठ गल्ली, जुने बेळगाव, बेळगाव येथील रहिवासी यांचे दिनांक 12/07/2025 यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 1 मुलगा, 1 मुलगी, सून, जावई आणि 4 नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन सोमवारी दि. 14/07/2025 या रोजी जुने बेळगाव नाका स्मशानभूमीत येथे होणार आहे.

12/07/2025

लोकमान्य टिळक महामंडळाकडून गणेशोतसवमध्ये विद्युत खांब बदलण्यासाठी हेस्कॉमला निवेदन

Address

Belgaum

Alerts

Be the first to know and let us send you an email when Belgaav Kesari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share