23/09/2025
#आयुष्यातील_अविस्मरणीय_क्षण...!
नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात राबवलेल्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबवलेले नाविन्यपूर्ण प्रयोग, लोकसहभागातून शाळेत केलेले इष्ट बदल, वाचन संस्कृतीचा परिपोष होण्यासाठी केलेले प्रयत्न, जागतिक नागरिक तयार करण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न तसेच समाजाभिमुख कार्य या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान या कार्याची दखल घेऊन मला आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरविण्यात आले. हा गौरव संपूर्ण महाराष्ट्रातील समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा हा सन्मान आहे असे मला वाटते. ज्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तळागाळात शिक्षणाची गंगा नेली त्यांच्या जयंती च्या दिवशी हा सन्मान होतोय ही खरचं माझ्यासाठी भाग्याची बाब आहे शिवायू एका आईच्या समोर तिच्या लेकराच्या सन्मानासाठी आयोजित केलेला असा सुखसोहळा संपन्न होणं म्हणजे एका शिक्षकासाठी मला हा जगातील सर्वोच्च सन्मान वाटतो.
या समारंभात माझ्यासोबत , पत्नी प्रिया चिंधालोरे ,आई ताराबाई चिंधालोरे, चिरंजीव शिवांश आणि प्रियांश चिंधालोरे, लहान भाऊ राहुल चिंधालोरे, जावई हेमंत आंबिलढूके, ताई ज्योती आंबिलढूके यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित पवार, मा.ना.श्री यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी दादाजी भुसे, (मंत्री, शालेय शिक्षण), मा. राहुल नार्वेकर (अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा),मा.ना. श्री. डॉ. पंकज भोयर, (राज्यमंत्री, शिक्षण ,गृह ग्रामीण, गृहनिर्माण, सहकार, खनिकर्म), मा.श्री. रणजीतसिंग देओल (भा.प्र.से.), प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मा.श्री. सचिनंद्रप्राताप सिंह (भा.प्र.से.), आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे, मा.श्री. महेश पालकर, ;शिक्षण संचालक,माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे), अनुराधा ओक (बालभारती संचालक), कृष्णकुमार पाटील ( शिक्षण संचालक योजना) हे मान्यवर उपस्थित होते.
हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सुखसोहळा दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता टाटा सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, मरीन ड्राईव्ह येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. राज्यशासनाने समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यथोचित सन्मान केला त्याबद्दल राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार.
#महाराष्ट्र_शासनाच्या_वतीने_आत्तापर्यंत_केलेल्या_शैक्षणिक_कार्याची_दखल...!
Satish Chindhalore Ramkrishn Chachere
#राज्यपुरस्कार #शिक्षकदिन #क्रांतीज्योती_सावित्रीमाई_फुले_राज्य_आदर्श_शिक्षक_गुणगौरव_पुरस्कार_2025