TechNike

TechNike Zilla Parishad Bhandara was established in 1962 along with 13 Panchayat Samiti. In 1999, Bhandara di

18/10/2025

➖➖➖➖➖
👇🏼 ⚠️ *चुकीच्या UPI व्यवहारामुळे पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेले? या सोप्या प्रकारे परत मिळवा तुमचे पैसे!*
➖➖➖➖➖
आजचा काळ पूर्णपणे डिजिटल व्यवहारांचा झाला आहे. आता सुट्टे पैसे घेण्यासाठी दुकानात रांगा नाहीत, चिल्लर पैसे नसण्याची चिंता नाही आणि बँकेत जाण्याची धावपळही राहिलेली नाही. आता हे सगळे व्यवहार मोबाईलवर काही सेकंदात पूर्ण होतात. UPI (Unified Payments Interface) मुळे पैसे पाठवणं इतकं सोपं झालं आहे की अनेकदा आपण विचारही करत नाही आणि सरळ पैसे ट्रान्सफर करून टाकतो. पण काही वेळा हीच घाई आपली मोठी चूक ठरते, कारण कधी कधी पैसे चुकीच्या UPI ID किंवा बँक खात्यात जातात. अशा वेळी मनात पहिला प्रश्न येतो की, “आता आपले पैसे गेले, हे पैसे परत कसे मिळणार, मिळणार की नाही मिळणार?” घाबरू नका! पैसे चुकीच्या खात्यात गेल्याचं कळताच लगेच काही योग्य पावलं उचलल्यास तुम्ही ती रक्कम परत मिळवू शकता. चला, आता आपण याबद्दलची सगळी महत्वाची माहिती जाणून घेऊया.

चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास सर्वात पहिले काय कराल?
जर तुम्ही चुकून पैसे चुकीच्या खात्यात पाठवले असतील, तर सर्वात पहिलं पाऊल म्हणजे वेळ न दवडता आपल्या बँकेशी संपर्क साधणे. बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करा किंवा जवळच्या शाखेत प्रत्यक्ष जाऊन भेट द्या. तिथे त्यांना आपल्या व्यवहाराची सविस्तर माहिती द्या, Transaction ID, तारीख, वेळ, रक्कम आणि ज्यांना पैसे गेले त्यांचा UPI ID किंवा खाते क्रमांक हे सगळं योग्य रित्या सांगा. या माहितीच्या आधारे बँक अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू केली जाईल.

जर चूक सिद्ध झाली, म्हणजेच पैसे चुकीच्या (UPI money transfer mistake refund process) खात्यात गेले असल्याचं स्पष्ट झालं, तर बँक त्या खात्याच्या मालकाशी संपर्क साधून तुमचे पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू करते. पण यासाठी तुम्हाला देखील तुमच्याकडे काही कागदपत्रं तयार ठेवणं आवश्यक आहे, जसे की तुमचं बँक स्टेटमेंट, व्यवहाराचा स्क्रीनशॉट, आणि UPI अ‍ॅपमधील व्यवहाराची पावती. लक्षात ठेवा, जितक्या लवकर तुम्ही तक्रार कराल तितक्या लवकर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते.

चुकीच्या UPI व्यवहाराची तक्रार कशी करावी?
आजकाल PhonePe, Google Pay, Paytm, BHIM UPI अशा अनेक ॲप्सद्वारे व्यवहार केले जातात. पण एखादं चुकीचं अक्षर, नंबर किंवा आयडी टाईप झाला, तर पैसे चुकीच्या (UPI transaction complaint process) व्यक्तीकडे जाऊ शकतात. अशा वेळी पुढील स्टेप्स फॉलो करा,

सगळ्यात आधी UPI App मधून तक्रार नोंदवा. ॲपमधील Help किंवा Report Transaction या पर्यायावर जा आणि चुकीच्या व्यवहाराची तक्रार करा. त्या ठिकाणी व्यवहाराची सविस्तर माहिती द्या आणि Refund Request सबमिट करा.

दुसरं म्हणजे कस्टमर केअरशी संपर्क साधा. प्रत्येक ॲपचा स्वतःचा एक ग्राहक सेवा विभाग असतो. त्यांच्याशी संपर्क साधून झालेल्या चुकीच्या व्यवहाराची स्पष्ट माहिती द्या. उदाहरणार्थ, Google Pay साठी “Help and Feedback” मध्ये जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे NPCI कडे तक्रार करा. जर बँक किंवा ॲपकडून 30 दिवसांत काहीही प्रतिसाद आला नाही, तर तुम्ही थेट National Payments Corporation of India (NPCI) कडे तक्रार करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या टोल फ्री क्रमांक किंवा ई-मेल वर संपर्क करा.

टोल फ्री क्रमांक: 1800 120 1740

ई-मेल: [email protected]

NPCI हे UPI व्यवहारांचं नियामक संस्थान आहे आणि ते तुमच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित बँकांना (UPI wrong payment refund NPCI) निर्देश देतात.

पैसे परत मिळण्याची शक्यता किती आहे?

UPI व्यवहारांमध्ये पैसे सेकंदांत दुसऱ्या खात्यात पोहचतात, त्यामुळे हा व्यवहार मधेच थांबवणं अशक्य असतं. पण जर receiver ने पैसे काढले नसतील, तर बँक ते reverse transaction करून परत देऊ शकते. जर प्राप्तकर्त्याने पैसे वापरले असतील, तर बँकेला त्याच्या परवानगीशिवाय पैसे काढता येत नाहीत. अशा वेळी बँक कायदेशीर (Bank refund for wrong UPI transfer) प्रक्रिया राबवते, म्हणजेच त्या व्यक्तीला ई-मेल, नोटीस पाठवून परतावा मागते. कधी कधी पैसे परत मिळण्यास काही दिवस लागतात, पण योग्य मार्गाने प्रयत्न केले तर बहुतांश प्रकरणांमध्ये refund मिळून जातो.

चुकीचा व्यवहार होऊ नये यासाठी काही सोप्या टिप्स:
पैसे पाठवण्यापूर्वी UPI ID आणि नाव नीट तपासा.
व्यवहार करण्यापूर्वी Screen वर दिसणारे नाव तुमच्या ओळखीचं आहे का ते पहा.
मोठ्या रकमेचे व्यवहार करताना नेहमी QR Code स्कॅन करण्याऐवजी verified contact list वापरा.
जर पहिल्यांदा कोणाला पैसे पाठवत असाल, तर अगोदर ₹1 टेस्ट ट्रान्सफर करा.
तुमचं UPI App सुरक्षित ठेवा, PIN कोणालाही सांगू नका.
डिजिटल युगात वेग आणि सोय या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण त्याचसोबत जागरूकताही तितकीच आवश्यक आहे. चुकीचा व्यवहार झाल्यास घाबरून जाऊ नका.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.किंव...
22/09/2025

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
किंवा आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत मध्ये भेट द्यावी.

01/07/2025
 #काबिलियत
20/06/2025

#काबिलियत

आशीर्वाद।।।।।
14/06/2025

आशीर्वाद।।।।।

समय का चक्र
05/06/2025

समय का चक्र

घरी RO लावलाय की लावायचा आहे.तर खालील पोस्ट नक्की वाचा.
27/05/2025

घरी RO लावलाय की लावायचा आहे.
तर खालील पोस्ट नक्की वाचा.

विविध दाखल्यांसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
24/05/2025

विविध दाखल्यांसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

वैक्तिक लाभ योजना सुरू झाली आहे, गरजू लोकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा.
23/05/2025

वैक्तिक लाभ योजना सुरू झाली आहे, गरजू लोकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा.

11/04/2025

Address

Maharashtara
Bhandara
441904

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

07184-252326

Alerts

Be the first to know and let us send you an email when TechNike posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to TechNike:

Share