26/07/2024
छत्रपती शिवराय आणि वारकरी संप्रदाय हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्या प्रमाणे वारकऱ्यांमध्ये भेदाभेद अमंगळ आहे, उच्चनीच न पाहता पांडुरंगाचे सर्व लाडके असतात, तो सर्वांसाठी विटेवर उभा आहे. अगदी त्याच आदर्शांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना जवळ करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज. हे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या भावविश्वाचे दीपस्तंभ आहेत. पंढरीचा पांडुरंग आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भक्ती, शक्ती, युक्ती यांचा अनोखा संगम. आपली ही अद्भुत संस्कृती, त्या संस्कृतीचे पाईक असलेल्या महाराष्ट्राचे विराट दर्शन आज आषाढीवारीच्या निमित्ताने सर्वांना होत असते.
आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा! राम कृष्ण हरी! जय हरी विठ्ठल!