
15/06/2025
जागृती + संघटन + ताकद = सत्ता - अजिंक्य चांदणे
बीड /-
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रशिक्षणातून शिक्षित होईल जागृत होईल
जागृत कार्यकर्ताच संघटन बांधू शकतो संघटन बन्याने ताकद बनते आणि ताकतीने सत्ता मिळते
हे सर्व मिळवण्यासाठी पहिल्यांदा प्रशिक्षणातून जागृती आणणे गरजेचे आहे
आपला इतिहास आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे
जे आपला इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत
डी पी आय चे संघटन राज्यामध्ये वेगाने वाढत आहे परंतु कार्यकर्ता जर प्रशिक्षित आणि जागृत नसेल
तर संघटन नाकाम होते असे परखड मत डेमोक्रॅटिक पार्टीचे राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी
बीड येथे केले
स्मृतीशेष आत्मारामजी चांदणे यांच्या जयंतीनिमित्त प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते ..!
यावेळी DPI चे संस्थापक अध्यक्ष यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना म्हटले की,
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हे राज्यात वेगाने वाढणारे आंबेडकरी विचारधारेची संघटन आहे
फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ यांच्या विचारावर चालणारे हे संघटन जागृत आणि प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे संघटन म्हणून राज्यात मार्गक्रमण करत आहे सध्या राज्यामध्ये पक्षाचा कास्ट बेस बांधण्याचे काम चालू आहे ...!
यावेळी जिल्हाभरातून डीपीआयचे प्रमुख पदाधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न झाले...!