
10/08/2025
मराठा नेते मनोज जरांगे आज पुण्यातल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्याला भेट दिली. जरांगे यांनी रिमझिम पावसात, दाट धुक्यामध्ये मराठा बांधावांसोबत किल्ल्याची वळणावळणाची अवघड वाट सर करत किल्ल्याची चढाई केली. गडाची वाट सर केल्यानंतर रायरेश्वर किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची शपत घेतलेल्या शिवमंदिरात शिवलिंगाचा अभिषेक करत केली विधिवत पूजाही केली.