08/09/2025
भूम शहरात मुहंमद पैगबर यांची जयंती उत्साहात साजरी.
भूमः शहरात हजरत महंमद पैगंबर यांची जयंती सोमवारी (दि.8 सप्टेंबर) उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांकडून पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणुकीची जोरदार तयारी करण्यात आली होती. मिरवणुक शांततेत पार पडली.
शहरातील विविध भागात ठिकठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या बालकांना खाऊ व शरबतचे वाटप करण्यात आले.
मिरवणुकीच्या निमित्ताने पोलिसांचाही चोख बंदोबस्त तैनात होता. हजरत मुहंमद पैगंबर यांनी जगाला दिलेला शांतीचा संदेश म्हणजेच आपल्या आई वडिलांशी चांगले वागा. तरच तुमची मुल तुमच्याशी चांगले वागतील. पिडीत व्यक्तीला
मदत करताना तो व्यक्ति मुस्लिम असो किंवा नसो याचा विचार करू नका. आपसात समझोता घडवून आणा, आपल्या शेजाऱ्यांना त्यांचा आधिकार द्या. जातीपातीच्या पुढे जाऊन त्याला उपाशी झोपु देऊ नका. मुहंम्मद पैगंबर यांची संकल्पना उराशी बाळगून हजारो मुस्लिम बांधव आज मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
पैगंबर जयंतीनिमित्त भूम शहरातील मेहंतीशावली दर्गाह येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला.
मिरवणुकीमध्ये आखतर जमादार, वस्ताद मामु जमादार, माजी नगर अध्यक्ष शाकीर शेख, तौफिक कुरेशी माजी उपनगर अध्यक्ष,बबलु बागवान, आसिफ जमादार,नदीम कुरेशी,आज्जु जमादार, राजु कुरेशी,मोईन शेख,फिरोज फकीर, रफीक फकीर, यजाज काझी, आमर जमादार, पैलवान चांद सय्यद,बाबा मोमीन, समीर शेख, मुश्ताक कुरेशी, जुबेर चाऊस,आदील चाऊस यांनी परिश्रम घेतले होते. मिरवणुकी दरम्यान मुजावर गल्ली, गराडा गल्ली, संजय गाढवे मित्र मंडळ, वसीम काजळेकर यांच्या वतीने मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या बालकांना, शरबत, फळ, बिस्किट वाटप करण्यात आले.
तसेच यावेळेस भुम शहर जुलुस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
पैगंबर जयंतीच्या निमित्ताने पोलीस निरीक्षक कानगुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.