MLA News

MLA News MLA News | सत्य • स्पष्ट • निर्भीड

मुख्य संपादक : मुकुंद लगाडे
सहसंपादक व पेज व्यवस्थापक : कुणाल लगाडे

जिल्हा परिषद हायस्कूल भूमच्या शिरपेचात मानाचा तुराभूम (कुणाल लगाडे).  येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात श...
14/08/2026

जिल्हा परिषद हायस्कूल भूमच्या शिरपेचात मानाचा तुरा

भूम (कुणाल लगाडे). येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला चंदन अमोल जगदाळे याने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा परिषद शाळेतील वीस विद्यार्थी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (NASA) येथे भेट देण्यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केलेले आहे . यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून तालुकास्तर व जिल्हा स्तरावर परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत चंदन जगदाळे याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला . या मुलांच्या सहलीचा संपूर्ण खर्च जिल्हा परिषदेमार्फत केला जाणार आहे . पवार काकासाहेब, उत्तरेश्वर पायघन, दत्तात्रय गुंजाळ यांनी त्याला मार्गदर्शन केले या यशाबद्दल मुख्याध्यापक तात्या कांबळे व सर्व शिक्षकांच्या हस्ते चंदन व त्याच्या पालकाचा गुलाल उधळून व आदल्या वाजवून अभिनंदन केले .कार्यक्रमाला काकासाहेब पवार ,उत्रेश्वर पायघन ,अविनाश जोशी, दत्तात्रय गुंजाळ ,श्रीमती प्रतिभा मुकटे , नितीन पवार, कैलास शिंदे ,सुनिल जाधवर , हरीश साठे ,अनंता झरकर उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले .

दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे व्याख्यान विधिज्ञ मंडळ भूम यांनी लाभ घेण्याचे केले आव्हान भूम (कुणाल लगाडे)  दंगलकार नितीन ...
13/08/2026

दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे व्याख्यान विधिज्ञ मंडळ भूम यांनी लाभ घेण्याचे केले आव्हान

भूम (कुणाल लगाडे) दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे व्याख्यान विधीज्ञ मंडळ भूम यांच्यावतीने दि. १९/ ८/२०२६ बुधवारी दुपारी २:०० वाजता विधिज्ञ मंडळ कक्षामध्ये ठेवण्यात आलेले आहे.
दंगल कार नितीन चंदनशिवे यांचा आमचा कांबळे तसेच महाराष्ट्रात विविध विषयावर व्याख्यान देऊन समाज प्रबोधन करत असतात त्यांचे व्याख्यान वकील मंडळ भूमच्या वतीने ठेवण्यात आलेले आहे याचा सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे वकील मंडळाचे अध्यक्ष तथा विशेष सरकारी वकील हृदयानंद सुकाळे यांनी आवाहन केले आहे.

उत्पन्न प्रमाणत्र तात्काळ देण्याचे चालू करा:,भूम तालुका काँग्रेस कमिटीची उपविभागीय अधिकारी भूम यांच्याकडे मागणीभूम (कुणा...
13/08/2026

उत्पन्न प्रमाणत्र तात्काळ देण्याचे चालू करा:,भूम तालुका काँग्रेस कमिटीची उपविभागीय अधिकारी भूम यांच्याकडे मागणी

भूम (कुणाल लगाडे) - विद्यार्थी, शेतकरी तसेच गरजू नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मात्र ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेला पंचनामा व अहवाल देण्यास अडचणी निर्माण होत असल्याने नागरिकांना तहसील कार्यालयातून उत्पन्न प्रमाणपत्र मिळवताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर भूम तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी, भूम यांना निवेदन देऊन उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शासनाच्या नियमानुसार विद्यार्थी, शेतकरी व गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक असते. यासाठी पूर्वी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांसोबत उत्पन्नाचा पंचनामा करून प्रमाणपत्रासाठी अहवाल देण्यात येत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे बंद करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी व इतर गरजू नागरिकांना तहसीलदार कार्यालयातून उत्पन्न प्रमाणपत्र मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, तालुका शाखा भूम यांनी दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी तहसीलदार, भूम यांना निवेदन देऊन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना उत्पन्न प्रमाणपत्रासाठी अहवाल देताना येणाऱ्या अडचणी निदर्शनास आणून दिल्याचेही काँग्रेसच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संदर्भित परिपत्रकाचा उल्लेख करून ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राऐवजी अर्जदारांचे स्वयंघोषणापत्र स्वीकारून उत्पन्न प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि इतर गरजू नागरिकांना उत्पन्न प्रमाणपत्र वेळेत मिळून त्यांची शासकीय कामे सुलभ होतील, असे निवेदनात म्हटले आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित तहसीलदारांना अर्जदारांचे स्वयंघोषणापत्र स्वीकारून उत्पन्न प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी भूम तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. अन्यथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनासोबत संबंधित परिपत्रकाची प्रत जोडण्यात आली असून, नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.सिराज मोगल, धाराशिव एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष ॲड.मुशरफ सय्यद, युवक काँग्रेसचे मोईज सय्यद, व्ही जे एन टी तालुकाध्यक्ष महादेव जाधव काँग्रेसचे सरिपुत भोसले, माजी सरपंच अजिज शेख,दगडू वेदपाठक,युसूफ सय्यद,अस्लम बागवान सर्फराज मोगल आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

भूम पोलिस स्टेशन येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमोल मोहिते यांचा सत्कार.भूम नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा.संजय नाना गाढ...
12/08/2026

भूम पोलिस स्टेशन येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमोल मोहिते यांचा सत्कार.

भूम नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा.संजय नाना गाढवे यांच्या हस्ते भूम पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमोल रामचंद्र मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी नगरसेवक तथा गटनेते सुरज सुभाष गाढवे, नगरसेवक अभिजीत रमाकांत शेटे, नगरसेवक तौफिक सत्तार कुरेशी, आलमप्रभू भूम शहर विकास आघाडीचे अध्यक्ष संजय साबळे, माजी नगरसेवक संदीप मोटे, बाळासाहेब सुर्वे, प्रभाकर शेटे सर, प्रदीप चौधरी, रामभाऊ बागडे तसेच इतर सहकारी उपस्थित होते.

11/08/2026

भूम शहरात मरीआई यात्रा मिरवणूक उत्सवात संपन्न.

11/08/2026

भूम शहरात मरीआई यात्रा मिरवणूक उत्सवात संपन्न

हातमाग विणकर महामंडळाला बळकटी द्या                 ज्येष्ठ हातमाग विणकर राजभाऊ पाकले भूम      कोष्टी समाजाच सर्वस्व असले...
10/08/2026

हातमाग विणकर महामंडळाला बळकटी द्या
ज्येष्ठ हातमाग विणकर राजभाऊ पाकले

भूम
कोष्टी समाजाच सर्वस्व असलेला हातमाग विणकर व्यवसाय शासनाचा दुर्लक्षितपणा अन् आधुनिकी करणामुळे संपुष्टात येऊ लागला आहे . याला पूर्व वैभव मिळवून देण्यासाठी हातमाग विणकर महामंडळाला मोठ स्थैर्य मिळवून द्यावे अशी अपेक्षा ज्येष्ठ हातमाग विणकर राजाभाऊ पाकले यांनी हातमाग विणकर दिनी बोलताना केले .
शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी सर्वत्र हातमाग विणकर दिन साजरा केला . भूम येथील कोष्टी समाज बांधवांनी देखील श्री चौंडेश्वरी देवी मंदिरमध्ये मोठ्या उत्साहात हातमागाचे विविध सुटे भाग एकत्रित संकलित करून त्याची विधिवत पूजाअर्चा करून हातमाग विणकर दिन साजरा करत हा व्यवसाय सद्यस्थितीत संपुष्टात येऊ लागला असला तरी प्रत्यक्षात ज्यांनी हातमागावर विणकाम केलेले आहे त्यांनी आपला अनुभव या ठिकाणी व्यक्त केला आणि हातमाग व्यवसाय संपुष्टात येऊ लागल्यामुळे दुःखही व्यक्त केले .
या दरम्यान हातमागाचा मोठा चरखा , छोटा चरखा , फणी , कांड्या, भरणेचे यंत्र, माग , कळी , वाकपट्टी , थापा या सुट्या भागाचे पूजन केले . यानंतर ज्येष्ठ हातमाग
विणकरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यामध्ये श्रीमती पार्वतीबाई दाते , श्रीमती कमलबाई म्हेत्रे
सौ गोदावरीबाई वरवडे, श्रीमती सिंधुबाई बागडे सौ. जाईबाई होगाडे , सौ मंगलबाई नवले , श्रीमती मंगलबाई भसाकरे. , सो राधाबाई दिवटे , चंद्रकला सोनटक्के
मिनाबाई बागडे , पद्मीनबाई आसलकर तसेच सुभाष ऊपरे
बाबूराव आलगट , कांतलिंग खामकर , आबा नवले बाळासाहेब फासे , राजाभाऊ पाकले. , विजय खामकर
पांडूरंग वखडे , पांडूरंग बुगड , भारत बागडे , मधूकर ऊपरे , हरिभऊ बागडे , सातिश कोकणे , शंकर बोत्रे , शाम दिवटे , प्रकाश बागडे आदींचा सत्कार केला
विणकर दिन साजरा करण्यासाठी गोष्टी समाज ट्रस्ट अध्यक्ष तथा नगरसेवक विठल बागडे , उपाध्यक्ष शाम वारे, सचिव शंकर खामकर , नवनाथ रोकडे , योगेश आसलकर , सतिश दाते यांनी पुढाकार घेऊन परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शंकर खामकर यांनी करून आभार मानले .

अभ्यासाच्या जोरावर जगात जाता येते- उल्लास शिनगारे
09/08/2026

अभ्यासाच्या जोरावर जगात जाता येते- उल्लास शिनगारे

09/08/2026
06/08/2026

बावनकुळेसाठी फडणवीस मी तुमचे 15 ते 20 आमदार पाडेल मनोज जरांगे पाटील यांचा इशारा.

Address

Bhum

Alerts

Be the first to know and let us send you an email when MLA News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share